आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही
आता तुला सगळं जुने आठवेल की नाही कुणास ठाऊक नाही
सारे प्रहर
आपले शहर
गर्दीचा कहर
त्या गर्दीत तु मला आणि मी तुला शोधायचो
शोधता शोधता आपणच मग हरवायचो
एकमेकांची आठवण काढत खुप एकटे फिरायचो
जसे एकाच ट्रेनमध्ये वेगळ्या डब्यात शिरायचो
अधुन मधून दुर जायची आपली सवय तिथली
तुझं गाव कुठलं आणि पायवाट कुठली
एकमेकांची ऊगीच अशी चेष्टा करायचो
गोधंळलेले आपले चेहरे हसत हसत पहायचो
तीच चेष्टा खरी होईल कधीच वाटलं नव्हतं
गर्दीत तेव्हा डोळ्यात पाणि दाटलं नव्हतं
आता वय निघून चाललयं हलक्या हलक्या पावालान्नी
त्यातमला वेढलंय पुन्हा तुझ्या जुन्या सावाल्यान्नी
त्यातमला वेढलंय पुन्हा तुझ्या जुन्या सावाल्यान्नी
आता एक एक सावलीत ऊन्हासारखे सारं लख्ख आठवतयं
एकट्यामधुन ऊठुन मला गर्दीत कोणी पाठवतेय
मी ऊठुन येईनही
मागे वळुन पाहीनही
मलाच शोधत राहीनही
गर्दीत हरवून जाईनही
तुला मात्र कुणी तुझे पाठवेल की नाही कुणास ठाऊक
तुला मात्र कुणी तुझे पाठवेल की नाही कुणास ठाऊक
आलीस तरी तुला सगळं काही आठवेल की!!!!!
No comments:
Post a Comment