Sunday, April 29, 2007

संध्याकाळचा पाऊस मला...........!


संध्याकाळचा पाऊस मला...........
संध्याकाळचा पाऊस मला गाणं गायला सांगायचा

माझे गाणे ऐकून त्यातले चार शब्द मागायचा

मी शब्द दिल्यावरती पाऊस अगदी खुश होईनख

शिखान्त भिजवून मला ओलाचिंब करुन जाई

संध्याकाळचा पाऊस मग रिमझिम रिमझिम बरसायचा

माझं घर भिजवून पुन्हा अंगणभर पसरायचा

इंद्रधनु होऊन पाऊस सात रंगात फुलत असे

ऊन्हात पाऊस पावसात ऊन छप्पापाणि खेळत असे

पावसात चिंब चिंब भिजुन मनामध्ये मोहोर फुटत असे

पावसामुळे पावसासकट संध्याकाळ हवी वाटे

संध्याकाळचा पाऊस मला थेंब न थेंब आठवतो

संध्याकाळचा पाऊस मला थेंब न थेंब आठवतो

अजूनसुध्दा माझ्यासाठी पाऊस गाणी पाठवतो

No comments: