Thursday, May 31, 2007

सलाम मुंबई.................

आमची मुंबई...........

Monday, May 21, 2007

भारत @ ६० सेकंद.................

Saturday, May 19, 2007

चुकलो दिशा तरीही................

सखाराम गटणे - पु.लं. देशपांडे

"सर, हे पेढे--" सखाराम गटण्याने माझ्या हातात एक पुडी ठेवली.
"कसले रे?"
"प्राज्ञ परीक्षेत पास झालो."
"छान!" प्राज्ञ परीक्षेची पातळी झटकन माझ्या लक्षात आली. "किती पर्सेंट
मार्क मिळाले?"
"अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन. पण निदान पासष्ट
प्रतीशत तरी मिळावेत."
सखाराम गटणे प्राज्ञ मराठी बोलतो. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यात भिजलेले
एखादे दिनवाणे कुत्रे उचलून आपण घरी आणावे, तसाच या गटण्याचा आणि माझा
योग आला. ज्यांच्याकडे पाहिले म्हणजे अतीव करूणा खेरीज दुसरी कोणतीही
भावना जाग्रूत होत नाही अशा कारूण्यभजनांपैकी तो एक आहे. बाकी माणसे तरी
चेह-यावर काय काय भाव घेऊन जन्माला येतात! कूणी सदैव अनाथालयाची वर्गणी
मागायला आल्यसारखा, कुणी नुकतीच बस चुकल्यासारखा , कुणी सदैव आश्र्चर्यचकित,
कुणी उगीचच अंतराळात, तर कुणी निष्कारण कपाळावर आठ्यांचे उभे गंध लावून.
सखाराम गटणेच्या चेह-यावर हवा गेलेल्या फुटबॉलचा भाव आहे. त्याचे प्रथम
दर्शन झाले तेदेखील त्याच भावात. वास्तवीक हा मुलगा माझा कोणीही नव्हे. माझ्या
एका व्याख्यानानंतर ह्याची आणि माझी ओळख झाली. हा त्या वेळी मॅट्रीकच्या
वर्गात होता. अर्ध्या विजारीत पांढरा सद्रा खोचलेला, त्याला नाकासमोर गांधीटोपी घातलेला,
लहानसेसे भावशुन्य डोळे, काळा रंग, वेडेवाकडे दात- अशा थाटात हा मुलगा
त्या हॉलच्या दारात उभा राहिला होता. मी हारतुरे घेऊन बाहेर आलो आणि
त्याच्यावर नजर गेली. त्याने अत्यंत आदराने मला नमस्कार केला.
"स्वाक्षरी---" आपली वही पुढे करीत तो म्हणाला.
"छे छे, मी स्वाक्षरीबिक्षरी देत नाही." मी उगीचच टाफरलो.
"जशी आपली इच्छा--"
त्याने दोन्ही हात जोडुन मला नम्स्कार केला. अगदी देवाला नमस्कार
करावा तसा. दुस-या एखाद्याने मला तसला नमस्कार केला असता तर मी चिडलोच
असतो. पण सखाराम गटण्याचाअ नमस्कार इतका प्रामाणिक होता की, तो नमस्कार
मला कुठेतरी जाऊन लागला. स्वाक्षरी नाकारण्याचा माझा हा काही पहीला प्रसंग
नव्हता. वास्तविक मी स्वाक्षरी नेहमीच नाकारतो असे नाही. पण कधीकधी
छ्योट्याछ्योट्या पोरांपुढे उगीचच शिष्टपणा करायची हुक्की येते. स्वाक्षरी देण्यात अर्थ
नाही हे खरे; पण न देण्यातही काही खास अर्थ आहे असे नाही. सखाराम
गटणे कोप-यात उभा होता. तेवढ्यात संस्थेचे चिटणीस एक मोठे रजिस्टर घेऊन
माझ्यापुढे आले.
"संस्थेला भेट देण्या-या सर्व थोरामोठ्यांच्या हात आम्ही सह्या घेतो. पुण्यातल्या
पुण्यात असून आपल्या भेटीचा स्योग असा आजच येतोय."
मी ते रजिस्टर चाळू लागलो. त-हेत-हेच्या लोकांनी संस्था पाहून संतोष व्यक्त
केला होता. मीदेखील असंतोष व्यक्त करावा असे काहीच घडते नव्हते, त्यामुळे
दोनचार ओळीत संतोष व्यक्त केला. त्यानतंर आर्य्कारी मंडळाच्या सभासदांबरोबर
चहापान (ग्लूको बिस्कीट, चिवडा आणि केळी!!) झाले. सभासंदाचा माफक
विनोदही सहन करीत होतो. पण खिडकीबाहेर आपली वही घेऊन उभा असलेला
सखाराम गटणे मला उगीचच अस्वस्थ करायला लागला होता. अगदी अनिमिष
उभा असलेला तो चार-साडेचार फूट उंचीचा जीव--एखादी केरसूणी ठेवावी तसा
राहीला होता. त्या मुलाकडे आता पाह्यचे नाही असे दहाबारा वेळा ठरवले. पण
हट्टी असह्य झाले आणी मी चिटणीसांना त्याला बोलावून घ्यायला सांगितले.
"कुणाला? सख्याला?" चिटणीस आश्चर्याने म्हणाले.
"मला त्याचं नाव ठाऊक नाही. प्ण तो तिथे उभा आहे तो--"
"सख्याच तो. अरे ए गटण्या--"इतक्या लाबूंनदेखील सखाराम गटण्याचे दचकणे मला दिसू शकले, इतक्या जोरात तो दचकला. एखाद्या अपराध्यासारखा तो माझ्यासमोर उभा राहीला.
"काय नाव तुझं बाळ?" मी आवाजात जमेल तितका मऊपणा आणित विचारले.
"सखाराम आप्पाजी गटणे."
"अक्षर झकास आहे बंर का ह्याचं! आमच्या व्याख्यानमालेच्या जाहिराती, बोर्डहाच लिहीतो. वडलांचं साइनबोर्डपेंटरचं दुकानच आहे, आप्पा बळवतं चोकात.""अरे, तुझं अक्षर इतकं झकास आहे मग स्वाक्ष-या कशाला गोळा करतोस?" ह्यात इतकं खास मोट्याने हसण्यासारखे नव्हते, पण मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद हसले. "कोणाकोणाच्या सह्या गोळा केल्या आहेस बघूं---"
"मी फक्त साहित्यिकांच्याच स्वाक्ष-या घेतो." स्वाक्ष-यांचे पुस्तक माझ्या हातीदेत सखाराम गटणे म्हणाला.
मी त्याचे स्वाक्ष-यांचे पुस्तक चाळू लागलो. प्र्त्येक साहित्यिकाच्या लिखाणातून
एक-एक वाक्य निवडून काढून गटण्याने त्याखाली त्या त्या साहित्यिकाची सही घेतली
होती. मी शेवटले माझे पान उघडले. तिथल्या वाक्याखाली सही नव्हती.
"हे वाक्य कोणाचं आहे?"
"आपल्याच एका नाटकातलं!" सखाराम गटणे अत्यादरपूर्वक म्हणाला.
संदर्भ सोडून काढलेले ते माझे वाक्य वाचताना माझी मलाच दया आली.
"हे वाक्य का निवडलंस तू बाळ?"
"हे वाक्य मला आपलं जिवनविषयक सूत्र वाटतं."
"बापरे!" मी मनात म्हणालो. त्या चार-साडेचार फुटी उंचीच्या दिनदुबळ्यादेहातून
जीवनविषयक सूत्र वैगेरे श्ब्दांची अपेक्षा नव्हती. मी सखारामच्या चेह-याकडे
पाहत राहिलो. कार्यकारी मंडळाच्या एका म्हाता-याशा सभासदावर गटण्याच्या
'जीवनविषयक सूत्र' ह्या शब्दामुळे काहीतरी परिणाम झाला असावा. त्यांनी
गटण्याला खुर्चीवर बसायला सांगितले.
"कशावरून? तू माझी पुस्तकं वाचली आहेस का?"
"आपली छापून आलेली ओळ न ओळ मी वाचली आहे. आपण आणि
सानेगुरूजी हे माझे आदर्श लेखक आहात."
"अरेम पण गेल्या खेपेला ते कोण आले होते त्यांना तू ते आणि सानेगुरूजी
म्हणालास--"

सेक्रेटरी ह्या मनुष्यविशेषाला पोच असता कामा नये असा अलिखित दंडक
असावा. वास्तविक गटण्याने दुस-या एखाद्या लेखकालाही सानेगुरूजींच्या जोडीने
बसवले असेल, किंबहुना आणखी एकदोन आडवड्यांत एखादा तिसरा साहित्यिक
आला की तो आणि सानेगुरूजी अशीही जोडी होईल. ह्याचे मुख्य कारण गटणे
अजून सानेगुरुजींच्या इयत्तेतून बाहेर पडला नव्हता; पण खिडकी बाहेरची इतर दुश्येही
आता त्याला आवडायला लागली होती.
सेक्रेटरीच्या बोलण्याने सखाराम हिरमुसला. मी विषय बदलण्याच्या द्रूष्टीने
म्हणालो,
"काय शिकतोस?"
"यदां एसेस्सीला बसणार आहे."
"अस्सं!" मी त्याची ती अनेक साहीत्यिकांच्या जिवनविषयक सुत्रांच्या
गुडांळ्यांनी भरलेली वही पाहत म्हणालो. स्वाक्षरीसाठी भित भित पुढे येणारा
सखाराम गटणे हा काही पहीला नमूना नव्हता. अमुक अमुक इसम हा स्वाक्षरी
घेण्यालायक आहे असा गैरसमज एखाद्या अफवेसारखा पसरतो. पण स्वाक्ष-या
जमवण्या-या पुष्कळ पोरांच्या आणि पोरींच्या चेह-यावर बहुधा एक खट्याळ भाव
असतो. वही पुढे सरकवताना चेह-याव्र असतो तो आदरांच्या बिलंदर अभिनय!
सराईत स्वाक्षरी करणारांना तो ओळखू येतो. सखाराम गटण्याच्या चेह-यावरची रेषा
न रेषा कमालीची करी होती. त्याचे ते लहानसहान डोळे काही खोटा, दडवलेला,
लुच्चा व्यक्त करायला केवळ असमर्थ होते.
"आपण स्वाक्षरी दिलीत तर मी आजन्म अपकृत होईन."
सखाराम गटण्याच्या तोडूंन हे वाक्य ऎकताना त्याच्या तोंडात दातांऎवजी छाप-खान्याचे
खिळे बसवले आहेत असे मला वाटते. हा मुलगा विलक्षण छापील बोलतो,
पण भाषेचा तो छापीलपणा कमालीचा खरा वाटतो. मी त्याची वही उघडून माझ्या
जीवनविषयक सूत्राखाली निमूटपणे सही केली. त्यानंतरचा सखाराम गटण्याच्या
नमस्काराने माझ्या पोटात अक्षरशः कालवल्यासारखे झाले. साडेसातीने पछाडलेली
माणसे शनीचा काटा काढणा-या मारूतीलादेखील इतका करूण आणि भाविक नमस्कार
करीत नसतील. माझ्या आयूष्यात मी इतका कधीही ओशाळलो नव्हतो.
'सखाराम गटणे' हा प्रकार त्या दिवशी माझ्या आयूष्याच्या खातेवहीत नोंदला
गेला. ह्या घटनेला आता खूप वर्षे झाली. सखाराम गटणे त्यानंतर माझ्या घरी येऊ
लागला. प्रथम आला तो दस-याच्या दिवशी सोने वाटायला. माझे काही मित्र घरी
आले होते. त्यांतला एकानेही मी लिहीलेली एकही ओळ वाचलेली नाही आणि
यापुढेही ते वाचणार नाहीत. त्यामुळे मैत्री अबाधीत आहे. रमी, फालतू गप्पा,
जागरणे करण्याची अमर्याद ताकद, असल्या भक्कम पायावर ती उभी आहे. साहित्यीक
मंडळीत एकूण माझा राबता कमीच! त्यामुळे एकटादुकटा अस्लो तर ह्या साहित्यविषयक
गोष्टी मी सहन करू श्कतो. पण माझ्या ह्या खास मित्रांच्या अड्ड्यात मला माझा वाचकच
काय, पण प्रकाशदेखील नको वाटतो.
सखाराम गटणे आत आला आणि त्याने अत्यंत आदराने माझ्या पायाला हात लावून
नमस्कार करून मला दस-याचे सोने दिले. माझे वाह्यात मित्र हे द्रुश्य पाहत होते.
"आपण मला कदाचित ओळखलं नसेल--"
"वा वा ! ओळखलं की! मागे एकदा व्याख्यानाला होता तुम्ही --"
"हे सुर्यानं काजव्याचं स्मरण ठेवण्यासारखं आहे!" गटण्याने सरवाप्रमाणे एक
लेखी वाक्य टाकले.आता ह्या मुलाला काय करावे ते कळेना. बरे, मुद्दाम सोने द्यायला घरी आलेला.
त्याला कपभर चहा तरी द्यायला हवा होता. गटण्याच्या चेह-यावरच्या भक्तिभावाने मी
हैराण झालो होतो.
"मला आपल्याला काही प्रश्न विचारायचे होते."
"आपण पुन्हा केव्हा तरी भेटु या. चालेल का?"
"केव्हा येऊ? आपल्या प्रतिभासाधनेच्या वेळा सोडुन कोणत्याही वेळा सांगा!"
मला त्याला ओरडून सांगावेसे वाटले, "मुला---अरे माणसासारखा बोल की रे.
तुझ्या जिभेला हे छापील वळण कुठल्या गाढवानं लावलं? प्रतीभासाधनाची कसली
डोंबलाची वेळ?... "पण ह्यातले काहीही मी म्हटले नाही. गटण्याच्या डोळ्यांत
छप्पन्न संशाची व्याकुळता साठली होती. बोलताना त्याचे डोळे असे काही होत,
त्याच्या कपाळावरच्या आणि गळ्याच्या शिरा अशा काही विचित्रपणे ताणल्या जात,
की असल्या आविर्भावात त्या मुलाने एखाद्या शिव्या दिल्या तरी देखील त्या
घेणा-याला ह्या देणा-याची दया आली असती. एथे तर त्याच्या जिभेवर साक्षात
सरस्वतीने मराठी भाषेचा 'क्लास' उघडला होता."
हे पाहा, पुढल्या आठवड्यात एखाद्या संध्याकाळी या."
"निश्चित वार सांगू शकाल का आपण? नाही सांगितला तरी चालेल. मी रोज येत जाईन. प्रयास हा प्रतीभेच्या प्राणवायू आहे असं कुडचेडकरांनी म्हटलचं आहे."
"कुणी?"
"स.तं. कुडचेडकर ---'केतकी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक."
"अस्सं!" कुडचेडकर नावाचा मराठीत कुणी साहित्यिक आहे, याचा मला
पत्ताही नव्हता. आणि गटण्याला त्याच्या 'केतकी पिवळी पडली' (हे नाटक होते,
कादंबरी होती की आणखी काय होते देव जाणे) पुस्तकातली वाक्ये पाठ होती. ह्या
गटण्याची केस अगदीच हाताबाहेर गेली होती.
गटणे त्यानंतर असाच सणासुदीला येत गेला. संक्रांतीची कार्डे, दिवाळिचे
अभीष्टचिंतन, नववर्षाच्या सुभेच्छा वगैरे न चुकता पाठवीत असे. माझे कुठेही
काही लिहून आले की आपल्या सुंदर अक्षरात ते वाचल्याचे कळवीत असे.
अधूनमधून भेटातही असे.
त्यानंतर एका संध्याकाळी सखाराम गटणे घरी आला. नेहमीप्रामाणे नाकासमोर
टोपी, हातात पिशवी, असे त्याचे ते हडकुळे आणि डोळ्यावर घालीन लोटांगण
असा भाव असलेले ध्यान येऊन दारात उभे राहिले.
"या!" मी त्याला आत बोलावले."
आपल्या साधनेत व्यत्यय तर नाही ना आणला?"
"अहो, साधना कसली? आराम करीत पडलो होतो--"
"चिंतन वगैरे चालंल होतं का?"
"छे हो! चिंतनविंतन काही नाही. हं, काय, चहा घेणार?"
"नको. मी चहा घेत नाही. उत्तेजक पेयांपासून मी पहील्यापासून अलिप्त आहे."
ह्या मुलाच्या मेंदूत पाण्याचे फवारे सोडून त्यातून ही सारी साहित्यीक श्ब्दांची
जळमुटे धूऊन काढता येतील का, अशा विचारात मी पडलो.
"अहो, चहा हे उत्तेजक पेय आहे म्हणून कोणी सांगितलं?"
"उन्नती मासिकाच्या विजयादशमी अंकात चोखुरेगुरूजींच्या लेख आहे. 'जीवनोन्नतीचे
सहा सोपान!'" 'जीवनोन्नतीचे सहा सोपान; हे शब्द गटण्याच्या वेद्यावाकड्या
दातांतून पोरांच्या चड्ड्यांतून खिसे उलट केल्यावर गोट्या पडाव्यात तसे पडले!
"माझं ऎकाल का गटणे--असले लेख नका वाचत जाऊ."
"मी आपलं ह्याच बाबतीत योग्य मार्गदर्शन घ्यावं म्हणून आलो होतो."
"कसलं मार्गदर्शन?"
"मला माझा व्यासंग वाढवायचा आहे. योग्य व्यासंगाशिवाय व्यक्यिमत्वाचा पैलू
पडत नाहीत."
"कुठल्या गाढवानं सांगितलं हे तुम्हाला?"
गटणे दचकला. त्याच्या असंख्य गुरूजीपैकी कुठल्यातरी गुरूजीच्या पंच्याला मी
नकळत हात घातला होता. गटणे गप्प उभा होता. त्याच्या त्या केविलवाण्या
डोंळ्यात फक्त आसवे जमा व्हायची राहिली होती. मलाहे माझ्या उद्गारांचा राग
आला होता. पण गटण्याने एक एक वाक्य माझा अतं पाहत होत. ह्या मुलाला
आता नीट बिघडवायचा कसा ह्या विचारात मी पडलो.
"हे बघा, प्याच थोडा चहा. यापूर्वी कधी प्यायला होतात ना?"
"हो-- पूर्वी पीत होतो." एखद्या महान पातकाची कबुली द्यावी तसा चेहरा
करून गटणे म्हणाला.
माझ्या आदेशानुसार तो चहा प्यायला. त्याच्या अनेक गुरूजीपैकी मीही एक
होतो. चहा पिताना त्याच्या चेह-याकडे पाहवत नव्हते. सर्कशीत वाघाच्या ताटात
शेळीला जेवायला लावतात त्या वेळी शेळीचा चेहरा कदाचीत तसा होत असेल.
बाकी गटण्यात आणि शेळीत काहीतरी साम्य होते. शेळी झाडाची पाने खाते, हा
पुस्तकांची पाने खात होता. त्याला मी जी जी काही आठवतील ती पुस्तके लिहून
त्यांची यादी दिली. ती यादी वाचताना त्याच्या चेह-यावर विलक्षण कृतज्ञतेचा भाव
दाडला होता. त्यांची यादी दिली. काहीतरी विस पुस्तकांची नावे असावित.
"ही मी वाचली आहेत.!"
"सगळी?" मी ख्रुर्चीवरून कोलमडायच्या बेतात आलो होतो.
"हो! पण पुन्हा एकदा वाचून काढीन."
"छे छे-- पुन्हा कशाला वाचता?" वास्तविक मला त्याला सांगायचे होते की,
"मित्रा, आणखी पाच वर्षे रोजचं वर्तमानपत्रदेखील वाचू नकोस."
'भस्म्या' नावाचा एक रोग असतो म्हणतात. त्यात माणसाला म्हणे 'खाय
खाय' सुटते आणि खाल्ले की भस्म, खाल्ले की भस्म, अशी रोग्याची अवस्था होते.
गटण्याला असलाच पुस्तकांचा भस्म्या रोग झाला असावा. ह्या मुलाला काय करावे
मला कळेना. शेवटी मी माझे कपाट उघडले. त्यातली पुस्तके पाहिल्यावर खेळण्यांच्या
दुकानात गेल्यावर पोरांचे चेहरे होतात तसा त्याचा चेहरा झाला.
"ह्यांतली वाटेल ती पुस्तकं घेऊन जा." वस्ता, तुजप्रत कल्याण असो'च्या
चालीवर मी त्याला सांगितले.
"असा व्यासंग करायची इच्छा आहे माझी--"
गटण्याच्या उद्गारांनी मला भयंकर शरमल्यासारखे झाले. त्या पुस्तकांतल्या निम्म्या
हूनअधिक पुस्तकांची मी पानेही फाडली नव्हती. आपल्या थैलीत पुस्तके भरून
घेऊन गटणॆ गेला आणि मी सुटकेचा निःश्र्वास टाकला.
आठ्दहा दिवसांनंतर एके दिवशी संध्याकाळी त्याचे ते "आपल्या साधनेत
व्यत्यय तर आणित नाही ना मी?" हे वाक्य पुन्हा मला येऊन टोचले. त्याच्या
हातात पुस्तकांनी भरलेली पिशवी होती. गटण्याने आठदहा दिवसांत ती सत्राअठराशे
पाने खाल्ली होती. हा म्हणजे अल्लाउद्दिनच्या दिव्यातल्या राक्षचाच प्रकार झाला
होता. 'दिलं पुस्तक की खा-- दिलं पुस्तक की खा--' हे काम कठीण होते.
"'काय, कशी काय वाटली पुस्तकं?" त्याला काहीतरी विचारणे प्राप्त होते.
गटणे एक अक्षरही न बोलता उभा होता. मला वाटले माझा प्रश्र्न ऎकला
नाही. म्हणून मी पुन्हा त्याला विचारले. गटण्याच्या डोळ्यांत पाणी तरारले होत्ते.
मला कुणी रडायबिडायला लागले की काही सुचेनासेच होते. "काय रे, काय झालं?"
एकदम त्याला अरेतुरे करायला लागलो. त्या आपुलकीने गटणे अधिकच मुसमुसायला
लागला.
रडताना तो एखाद्या लहान शाळकरी पोरासारखा दिसत होता. वास्तविक आता
तो विशीच्या पलीकडे गेलेला होता. पण त्याला मी प्रथम पाहिला त्यानंतर त्याच्यात
मला काहिच फरक वाटत नव्हता. अर्धी विजार जाऊन पायजमा-कोट आला होता.
टोपीचे टोक अगदी तसेच नाकासमोर होते. आणि डोळ्यातंला भावदेखील कायम होता.
"काय झालें गटणे? रडू नकोस---"
"मला क्षमा करा."
"पुस्तकं वाचायला वेळ नाही का झाला?"
"नाही, रात्रीचा दिवस करून आपल्या अनुज्ञेप्रमाणं मी पुस्तकं वाचून काढली---
हे पहा." एक वही माझ्या हातात देत तो म्हणाला.
"मग--" त्या तशा अवस्थेतदेखील त्याच्या 'अनुज्ञा' हा शब्द ऎकून मौज
वाटली. ज्या वयात पाचपंचवीस इरसाल शिव्या तोंडात असाव्यात तिथे 'अनुज्ञा'',
"मार्गदर्शन', 'जीवनानुभूती', 'साकल्याने मिळणारे समाधान' असली छापील
शब्दांची अडगळ त्याच्या तोंडात आठली होती. मी त्याने अत्यंत सुवाच्य अक्षरात
लिहीलेली वही उघडली.
"त्यात मी आपण दिलेल्या प्रत्येक पुस्तकाचं समालोचन लिहिलं आहे."
गटण्याने प्रत्येक पानावर 'समालोचन' लिहीले होते. "पुस्तकाच्या वाचनाला
लागलेला समय रात्री साडेआठ ते एक वाजून पस्तीस मिनीटे. पृष्ठसंख्या दोनशे
बत्तीस पाने." अशा थाटात सुरूवातीचे कॉलम भरले होते. पुढे लेखकाचे संपूर्ण
नाव, प्रकाशकाचे नाव, पत्ता, किंमत अस्ली माहीती होती--आणि मग खाली
समालोचन होते. "कथावस्तू आकर्षक आहे. पात्रनिर्मीती वोलोभनीय आहे. कथा
मुंबई, नागपुर व लखनौ ह्या तीन स्थळांत घडते..." असा प्रत्येक पुस्तकाचा सुंदर
अक्षरात पंचनामा केला होता. गटण्याचा हा 'व्यासंग' पाहून मी थक्क झालो.
शब्द तर डबक्यावर शेवाळ माजावे तसे माजले होते. नेत्रदीपक काय, आल्हाद
काय, मनाची प्रगाढ खोली काय--छे! पोट साफ करायच्या औषधासारखे तोंडातले
हे शब्द साफ करणारे एखादे ओषध का नाही निघत, ह्या विचारात मी पडलो.
शेवटी काही तरी बोलायचे म्हणून मी म्हटले, "वा! खूप बारकाईअनं अभ्यास
चालवला आहेस--"
"माझ्या जिवनातल्या वाडःयीन कालखंडातलं शेवटलं प्रकरण आहे."
"म्हणजे?" हा मुलगा आता जीवजीव देणार आहे की काय अशी मला भीती
वाटली, कारण असली पुस्तके खाऊन जगणारी मुले भलत्याच कुठल्यातरी श्रीमंताच्या
नुसत्याच गो-या म्हणून सुंदर मानल्या गेलेल्या पोरींच्या प्रेमात पडतात आणि जीव
तरी देतात किंवा डरपोक असली तर 'ऍंग्री यंग मेन' म्हणून चित्रविचीत्र पोशाख
करून हिंडतात आणि दुस-याच्या खर्चाने कॉफीहाऊसमध्ये कॉफी पीत भयाण
दिसणा-या, रोडक्या, माफक मिशीवाल्या पोरींबरोबर घाणेरड्या चित्रांतली आणि
कवितांतली कला शोधत बसतात. पण गटण्या त्यांपैकी कशातच बसण्यासारखा नव्हता.
नुसता फटाका फुटल्याचा आवाज सांगण्याचा प्रयास करीत होता, पण त्याला पुन्हा एकदा
रडू फुटत होते. एकूण चमत्कारिकच प्रसंग होता.
शेवटी गटण्याने आपले रडू आवरीत बोलायला सूरूवात केली.
"मला क्षमा करा. यापुढं मी अपल्याला कसलीच तसदी देणार नाही."
"म्हणजे?" मी आपल्या मित्रमंदळीत ह्या गटण्याची कधी तरी चेष्टा केली होती.
ती ह्याच्या कानावर गेली की काय? पण ते शक्य नव्हते. आमचे मित्र आणि
गटणे यांचा सबधंच येणे सभंवत नव्हते. एक पोलीस प्रॉसिक्युटर, एक मोटारीचे
स्पेअर पार्ट विकणारा, कोणी फायर इन्शुरन्स एजंत, तर कुणी मिलीटरीतला कप्तान
असल्या माझ्या कथाकाव्याच्या वाटेलादेखील चुकून न जाणा-या निरोगी मित्रांत
मीच फक्त लेखनकामासाठी करणारा होतो. ते जगत होते आणि मी लिहीत होतो.
आमच्या मित्रांच्या वासाने गटण्याला घेरी आली असती. मी गटण्याची समजूत काढायची
म्हणून म्हटले, "अरे तसदी कसली?"
"तसं नाही. तुम्ही फार केलंत माझ्यासाठी. वटवृक्षाच्या शितल छायेत अनेक पांथस्थ येतात
त्याची वटवृक्षाला काय कल्पना?"
गटण्य़ाच्या ह्या वाक्याने गटणे 'नॉर्मल'वर आला हे मी ओळखले. मला
वटवृक्षाची दिलेली उपमा पाहून उगीचच माझ्या नाकाखाली एक पांरबी लोंबायला
लागली आहे असे मला वाटले आणी हसू आले.
"आपण माझ्या ह्या मुग्ध वाक्याला हसणं साहजिकच आहे. पण आपल्या मायेच्या
शीतल छायेत बसणं माझ्या नशिबात नाही. जीवनात--"
"अरे पण--" मला ह्या 'जीवन' वगैरे शब्दांची भयंकर धास्ती वाटते.
जगण्याला 'जीवन' म्हणावे अशी माणसे हजार वर्षातून एकदा जन्माला येतात.
गटण्याने स्वतःच्या जगण्याला 'जीवन' म्हणणे म्हणजे सशाने स्वतःच्या टाळूला
गंडस्थळ म्हणण्यापैकी होते. त्याचे ते जीवनापासून सूरू होणारे वाक्य मध्येच तोडून
मी म्ह्टले, "अरे पण गटणे, झालं काय असं?"
"माझ्या जीवनात आता एक नवं पर्व सुरू होतंय!"
मुलगा अगदीच हाताबाहेर गेला होता. साइनबोर्ड पेंटरचा हा मुलगा स्वतः जणू
काही महाभारताचा नायक असल्यासारखा पर्वविर्व म्हणायला लागला होता.
"कसलं पर्व?"
"कसं सांगू?" आपले भित्रे डोळे पायच्या आंगठ्याला लावून गटणे म्हणाला.
मग माझी खात्री झाली की, बापाच्या नावाचा बोर्ड रंगवून घ्यायला आलेल्या
कुठल्या तरी मोटारीतून उतरणा-या गो-या तरूणीने गटाण्याचा खातमा केला. आजवर
वाचलेल्या सर्व कादंब-यांचा कथानकांचे तात्पर्य ह्याच्या बापाच्या ध्यानी आले
असणार आणि सखाराम गटणे तिथेच समात्प झाला असणार! शेवटी मीच होऊन
त्याला विचारले,
"कुठे प्रेमाविमात पडलास की काय?"
"नाही!" विजापूरच्या चिमुकल्या शिवाजीने छाती काढून बादशहाला सांगावे
तशी आपली अठ्ठावीस इंची छाती काढुन तो म्हणाला, "आजच्या जगात
विशुद्ध प्रेम कुठंच मिळत नाही."
"कुणी सांगितलं तुला?"
"आपल्याच 'पाखरांची शाळा' नाटकातल्या नायकांच्या वाक्य आहे हे!"
मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. 'पाखरांच्या शाळे' तले एक
विनोदी पात्र हे वाक्य म्हणते. शेवटी मलाही हा प्रकार असह्य झाला आणि
मी म्हटले,
"मग झालं काय तुला? एवढा तरुण तू, इतका व्यासंगी--माझ्यापेक्षादेखील तुंझ
वाचन दांडगं--आणि रडतोस?"
"काय करू? परिस्थिती हा अश्रूंचा सर्वात मोठा कारखाना आहे असं वाळिंबे
म्हणत असत."
"कोण वाळिंबे?"
"आमच्या प्राज्ञेचे सर!"
तो कोण वाळिंबे भेटला असता तर जुन्या सुलतानासारखा मी त्याला उलटा
टांगून पुस्तके जाळून त्याची धूरी दिली असती.
"असली काय परीस्थीती आली तुझ्यावर?"
"माझ्या वडिलांना माझ्या जीवनाचं ध्येय कळत नाही."
माझ्या डोळ्यांपुढे सखाराम गटण्याचा पेंटर बाप आला. मी त्याला काळा की
गोरा ते पाहिले नव्हते. बाकी पेंटर असल्यामुळे काळागोराच काय, तो अनेकरंगी
असेल. त्या, अक्ष्ररे इंचावर मोजून रंग भरणा-या इसमाला त्याच्या घरात जन्माला
आलेल्या ह्या बालबृहस्पतीचे जीवनध्येय काय कळणार? 'जीवनध्येय' म्हटल्यावर
"कुठल्या साइजमध्ये लिहू साहेब?" म्हणणारा इसम तो!
"काय जीवनध्येय कळंल नाही त्यानां?"
"त्यांनी माझं लग्न करायचं कुटील कारस्थान रचलंय!" गटण्याचे लहानसे
जांभळट ओठ थरथरत होते.
"अरे, मग कुटील कारस्थान कसंल त्यात? तुला लग्न करायचं नसल तर नाही
म्हणून सांग!"
"तिच विनंती करायला मी आलो होतो. मला माझं काही वाटत नाही
जीवनाच्या समरात..."
पुन्हा 'जीवन'! गटणे आता बाधं फोडून बोलत होता.
"...जीवनाच्या समरात रक्तबंबाळ व्हायचे प्रसंग यायचेच."
"अरे, चांगलं लग्न ठरवताहेत वडील तर रक्तबंबाळ कसाला होतोस?"
"मला माझं काही वाटत नाही. मी वडिलांच्या आज्ञेनुसार विवाहबंधनात स्वतःला
जखडून घेईनही! प्रभू रामचंद्र हा माझा आदर्श आहे! मीही वडिलांची अनुज्ञा
पाळीन."
प्रभू रामचंद्राने लग्न झाल्यावर अनुज्ञा पाळली होती हा तपशील गटणे विसरला.
त्या एवढ्याशा देहातून प्रभू रामचंद्र वगैरे शब्द ऎकताना मला हसू आवरेना.
"बरं मग तुझं काय म्हणणं? मी तुझ्या वडलांना येऊन भेटू?"
"हे मी आपल्यावर सोपवतो. मी लग्नाला तयार आहे."
आता मात्र मला कळेना की हा वीर जर मान उतरवून द्यायला तयार आहे तर
मी जाऊन काय शत्रूच्या तलवारीला धार काढून देऊ?
"मी एकदा सोडून दहादा लग्नाला तयार आहे--पण मी आपणाशी प्रतारणा
करू इच्छीत नाही."
मी गटण्याच्या डोळ्यातं काही वेडाबिडाची झाक दिसते की काय ते पाहू लागलो.
"माझ्याशी कसली प्रतारणा?"
"आपण विसरलात म्हणून मी विसरणार नाही. आपल्या पहिल्या भेटीत दिलेलीस्वाक्षरी मी रोज वाचतो. त्याच्यावर आपण संदेश दिला आहे--
'साहीत्याशी एकनिष्ठ राहा!'"
मी कोटटोपी घालून निमूटपणे त्याच्या वडलांना भेटायला गेलो. एका जुनाट
वाड्यापुढे आमचा टांगा थांबला. वाड्यातल्या कुठल्या अंधे-या खोलीत आता मला
हा माझा हनुमंत नेतो याची मी वाट पाहू लागलो. इतक्यात डाव्या बाजूच्या
जिन्याच्या अंधारातून एक भरभक्कम गृहस्थ उतरला. चांगले भरघोस टक्कल
,करवती मिश्या, कानाम्वर घनदाट केस, कपाळाला दुबोती उभे गंध, पोटाचा विस्तार
पंच्यात्न डोकावणारा, पांढरे स्वच्छ धोतर नेसलेलाअ. हा पन्नाशीतला धष्टपुष्ट गृहस्थ
गटण्याचा बाप आहे हे कळल्यावर माझी छातीच धडधडायला लागली. मी त्यांना
नमस्कार केला.
गटण्याचा घराबद्दलची माझी कल्पना साफ खोटी ठरली. पेंटिंगचे दुकान हा
गटण्यांचा अनेक व्यवसायापैकी एक होता. त्याच्या बापाने, रंगाचा तर सोडाच पण
दाढीचा ब्रशदेखील हातात धरला नव्हता. कारण खाली उतरल्याबरोबर त्यांनी
ओसरीवर उभ्या न्हाव्ह्याला आपण आज दाढी करणार नसल्याचे
सांगितले, असल्या घनघोर माणसाच्या घरात साहित्याची मुळी कशी उगवली
मला कळेना.
"या साहेब!" गटण्याच्या बापाने माझे रुंद आवाजात स्वागत केले.
"सख्या,आज जाऊन चहा सांग."
बिळात उंदीर शिरावा तसा सख्या आत पळाला. अर्ध्या तासाच्या मुलाखतीनंतर
पुण्यात गटण्यांच्या सहा इमारती आहेत ही माहिती मिळाली. गटण्याच्या घरात
म्हता-या विधवा आतेखेरीज बाईमाणूस नाही हे समजले. आणि ती म्हातारी
सध्या दम्याने हलकी होत चालल्यामुळे घरात बाईमाणूस येणे हे किती आवश्यक
आहे ते कळाले. त्या वाघासारख्या चेह-याच्या बापाने सख्याची आई त्याच्या वयाच्या
बाराव्या दिवशी वारल्यानंतर पुन्हा लग्न केले नव्हते.
"सावत्र आई म्हणजे काय साहेब मी स्वानुभवानं जाणतो. तुमच्यासारख्या
विद्वान माणसाशी खोटं का बोलू? आजवर तीन बाया ठेवल्या!" बोटांतल्या पोवळ्याच्या
आंगठीकडे पाहत गटण्याचा बाप म्हणाला," आज आपल्यासारख्यांचा
आर्शीवादानं सारं काही आहे." गटण्याच्या बापची श्रीमंती आणि माझ्यासारख्याचा
आर्शीवाद ही जोडी अजब होती. हे म्हणजे नळाच्या आर्शीवादाने पाऊस पडण्यापैकी
होते. "काय वाटेल ते करा, पन पोराला लग्नाला उभा करा!" एवढा धिप्पाड
माणूस माझ्यापुढे कोकरू झाला होता. "मुलगी नक्षत्रासारखी आहे साहेब!
सोनगावकर सराफांच नाव ऎकल असेल आपण--" मी सराफांच फक्त नावच
ऎकतो हे मी गटण्याच्या बापाला सांगण्याचा मोह आवरला. "बुधवारात पाच घंर
आहेत--- एकुलती एक मुलगी. चांगली शिकली आहे चारपाच यत्ता. शिवाय कूंडली
जुळते आहे आणि सखा काहीतरीच खुळ्यासारखं धरून बसलाय. तुम्हाला वचन
गेलंय म्हणतो."

"छे छे!"
"वर या साहेब--"
मग चारपाच काळोखे जिने चढून आम्ही सख्याच्या खोलीत गेलो. माझ्या
खोलीत पुस्तकांचे एक कपाट होते; सख्याच्या भिंती पुस्तकांच्या कपाटांनी भरल्या
होत्या. आणि भिंतीवर सानेगुरूजींच्या शेजारी माझ फोटो होता. त्याच्याखाली थेट
माझ्या अक्षरात बोर्ड होता-- 'साहीत्याशी एकनिष्ठ राहा!' खाली माझ्या सही-
सारखी सही होती.
सख्याच्या लग्नात मी माझे सर्व पुस्तके त्याला भेट म्हणून दिली. प्रत्येक पुस्तकावर
नवा संदेश लिहून दिला होता-- 'साहित्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवनाशीही!'
माझ्या हाताने 'जीवन' हा शब्द त्यानंतर लिहीला नाही. सख्या जीवनाशी
एकनिष्ठ राहू लागल्याचे वर्षभरातच मला कळले. सख्याचे वडील स्वतः चांदीच्या
वाटीतून नातवाचे पेढे घेऊन आले. काही वर्षापूर्वी सख्याने प्राज्ञेचे पेढे दिले होते;
त्याच्या बापाने नातवाचे दिले.
सखाराम गटणे मार्गाला लागला. त्याच्या 'जीवनातला' साहित्याचा बोळा निघाला.
पाणी वाहते झाले!
******************************************************

Thursday, May 17, 2007

बेबी विरुध कोबरा............

एलोरा गुंफा.............

तूच स्वप्नातली परी होती !!!..................


वेदना कोणती तरी होती ...तू दिलेली दवा बरी होती ॥!!
भेटली ना मने तुझीमाझी भोवती आडवी दरी होती !!!
हासतो आजही जरी खोटा कालची आसबे खरी होती .....
नाव घेतेस का कधी माझे ??तू तशी फार लाजरी होती !!!
हात मागू नवा कशासाठी ??जिंदगानीच आखरी होती !!!
बोललो ना जरी कधी तेंव्हातूच स्वप्नातली परी होती !!!

एका सागराची कथा..............


एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस।
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता।
येणारही नाही।
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच।
बघच मग।

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली।
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला।
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने

लोक येडे।
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!

Sunday, May 13, 2007

मी हसतो - माझ्यावर..............

काही दिवसांपुर्वी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मित्र मैत्रिणींसोबत जेवायला गेलो होतो। बऱ्याच दिवसांनी सर्वजण भेटत असल्यामुळे जेवणाच्या साथीने गप्पा रंगत गेल्या. प्रत्येक जण आपापल्या ऑफिस मधुनच तिकडे येउन पोहोचला होता. जेवण झाल्यावर सगळे बाहेर आले, आणि मी सर्वात शेवटी निघालो. निघतांना टेबलावर एक फाईल दिसली, आणि आपल्यातल्याच कुणाची तरी फाईल विसरुन राहिली असे वाटल्यामुळे ती फाईल घेउन मी बाहेर आलो. बाहेर येताच एका मैत्रिणीला, "काय गं, काय हा वेंधळेपणा? असे काम करतात का? फाईल इथेच विसरुन चालली होतीस ना ?", असे विचारुन ती फाईल पुढे केली. माझे वाक्य संपत असतांनाच सर्वांनी माझ्याकडे पाहिले, काही क्षण सगळे स्तब्ध झाले आणि दुसऱ्याच क्षणी हास्याचा कल्लोळ उडाला. मला मात्र काय घडले याची काहीच कल्पना न आल्याने मी बावरुन त्यांच्याकडे बघत होतो. हळूच लक्ष हातातल्या फाईल कडे गेले, मी फाईल उघडुन बघितली आणि आता मात्र त्याच फाईल मागे डोके लपवण्याची वेळ आली होती. झाले काय होते की, फाईल समजुन मी हॉटेलातील भले मोठे मेन्यु कार्डच उचलुन आणले होते !! सर्व वेटर्स ची नजर चुकवत हळूच जाउन परत ती 'फाईल' ठेवुन आलो. आजही त्या हॉटेल समोरुन जातांना त्या 'फाईल'ची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
*********************************************************************************************
असाच एक दिवस साखर झोपेत असतांनाच मोबाईल गुरगुरला। ऍप्लिकेशन मध्ये एक गोंधळ झाला असुन तो त्वरित ठिक करणे भाग आहे, हे सांगणाऱ्या बॉस चा फोन होता. नाइलाजाने उठलो, आवरले आणि खाली येउन स्टॉपवर कॅबची वाट पहात उभा राहिलो. सकाळच्या प्रसन्न वेळी बरेचसे लोक पायी फिरायला जात होते. जातांना प्रत्येक जण माझ्याकडे पहात होता. सिनेमातील नायका प्रमाणे आपण काही तरी विसरुन तर नाही ना आलो या भीतीने मी स्वतःकडे अनेक वेळा बघितले पण काही कळायला मार्ग नव्हता. खरोखरचं आपल्यामध्ये काहितरी पाहण्यासारखे आहे हे जगाला पटलेले दिसते या आनंदाने मी खुललो. पण त्यांची 'विचित्र नजर' मला अस्वस्थ करत होती. आता मात्र मी त्याचा विचार करणे थांबवले आणि जरा इकडे तिकडे बघु लागलो. हळुच माझी नजर माझ्या सावली कडे गेली. आणि मला 'त्या' हरणाची गोष्ट आठवली ज्याला आपल्या पायाचे प्रतिबिंब बघुन वाईट वाटले होते पण शिंगाचे सौंदर्य बघुन त्यांचा अभिमान वाटला होता. 'पण शेवटी पायानेच वाचवले ना' असा विचार करत असतांना माझी नजर माझ्या शिंगाकडे (अर्थात डोक्याच्या सावली कडे) गेली, आणि क्षणार्धात मला लोकांच्या त्या विचित्र नजरेचे कारण कळले. घाईने बाहेर पडत असतांना मी छोटासा कंगवा वापरुन भांग पाडत होतो आणि घराला कुलुप लावतांना तो कंगवा केसात तसाच राहिला होता. याचाच अर्थ मी गेले काही मिनिटे अर्थवट पींजारलेले केस आणि त्यात अडकलेला कंगवा अश्या परिस्थितीत स्टॉपवर उभा होतो. त्या तश्या अवस्थेत मी कसा दिसत असेन हे आठवले की हसुन हसुन पुरेवाट होते....
*********************************************************************************************
वरचे सगळे लिहुन झाल्यावर एकटाच हसत होतो तर ऑफिसात बसलेली मोजकीच टाळकी माझ्याकडे बघायला लागली. भर दुपारच्या २.३० वाजता ऑफिसात कंटाळा आला असतांना आपल्याच वेंधळेपणाचे किस्से आठवुन हसण्यात काय मजा आहे त्यांना कसे कळणार !!

झोप............

संध्याकाळचे साडेसहा सात वाजलेत। नुकताच अंधार होवू घातलाय. संधिप्रकाशाने आसमंत व्यापलाय. आजूबाजूची गर्द हिरवाई जाग्या होत असलेल्या अंधारामुळे अधिकच गर्द दिसू लागलेय. आम्ही अकरा जण रांगेत उभे आहोत. सगळ्यांच्या चेहेर्‍यावर "दमणूक" हीच चार अक्षरं दिसतायत.... आम्ही बसत का नाही? छे, शक्यच नाहीये ते..... एका बाजूला कडा आणि दुसर्‍या बाजूला दरी. मधे जेमतेम दोन पावलं मावतील एवढी जागा एकामागोमाग अकरा जागा व्यापून आम्ही उभे....काय गरज होती trek ला यायची? तोपण इतका अवघड. घरी आरामात तंगड्या वर करून बसलो असतो आणि TV पाहिला असता....
थोडावेळ आजूबाजूचं भानच जातं। कालपासूनचा घटनाक्रम डोळ्यासमोर येतो. काल अनंतचतुर्दशी, शुक्रवार. घर ते ठाणे, संध्याकाळी साडेसातची लोकल. ठाणे ते पुणे रात्रीची एस्टी......छे लाल डब्यात झोप काही ती मिळत नाही....मग दगडूशेटची मिरवणूक. दोन तीन तास पायपीट. सकाळी लेट झालेली एस्टी. तोरण्याचा पायथा. सापांपासून सावध राहायला सांगणारा तो पोलिस. तीन तासांत तोरणा सर. जेवण. समोर दिसणारा राजगड. तोरण्यावरचा बुधला आणि बुधल्याच्या डाव्या बाजूने खाली उतरणारी पायवाट. मग जीतोड चाल. फक्त चाल चाल आणि चालच.........जांभई येतेय का? इथे? आता? कधी झोपलो होतो शेवटी? परवा. बरोबर, जांभई.....
पुढे गेलेल्या दोघांच्या हाका उरलेल्या अकरांची गुंगी उडवतात। राजगड तर समोर आहे, अगदी समोर. कड्यांपर्यंत जाऊ शकतो, पण वर जायला वाट नाही. दहा जणांची गुंगी आणि अकराव्याची झोप उडते.......जेवढं अंतर आलो तेवढं परत चालायला लागणार. मघाशी वाटलं होतं वाट चुकलो म्हणून.........सव्वीस पावलं माघारी वळतात. समोर एक आदिवासी पाडा दिसतोय. सर्वानुमते थांबायचा निर्णय होतो......पण त्या पाड्यापर्यंत जायचं म्हणजे अजून एक तास तरी जाणार, मग गडावरच का जाऊ नये.....
तेवढ्यात एक मावळा समोरून येताना दिसतो। तो तेराही जणांना गडावर पोहोचवायचं आश्वासन देतो, अवघ्या शंभर रुपयात.....फक्त शंभर रुपये? गंडवत तर नाहीये ना? नसेल.......आता तेरामध्ये दोन तट पडतात. काही म्हणतात आज राजगड शक्य नाही. खाली राहूया. दुसरे म्हणतात. ही तर हार. राजगड सर करायचाच...... थांबावं की जावं?.....पाय म्हणतात थांबावं, मन म्हणतं जावं. मी पायांना थोपवतो आणि मनाला मानतो.
आता आम्ही चौदा। पुढे मावळा, मागे तेरा.......हा कुठे चालला झाडीत? ह्याला तरी माहिती असेल ना राजगडाचा रस्ता? बहुतेक असेल......झाडीत शिरल्यावर अंधार. विजेर्‍या बाहेर येतात. चौदा जणांकडे मिळून तीन. पहिली मावळ्याच्या हातात. दुसरी तेराव्याकडे आणि तिसरी मध्ये कुठेतरी.......कुठे चाललोय? चढतोय खरे म्हणजे वरंच जात असणार....
एक छोटंसं पठार। दोघंतिघं विश्रांती मागतात. दिली जाते. पाणी. पाणी संपतंय. रेशन करायला हवंय. सातव्याच्या पायांत गोळा आलाय. सातवा सगळं पाणी पितो. उरलेल्यात मीठ घालून त्याच्या हातात दिलं जातं..... नक्की पायांत गोळा आलाय का पाण्यासाठी? छे, सातवा असं करणं शक्य नाही......
पुन्हा मावळा पुढे आणि तेरा मागे। सातवा मधून मधून रडतोच आहे. पुन्हा चौदा उतरायला लागतात.....उतरणं नको. जेवढं उतरू तेवढंच पुन्हा चढायला लागणार.......पाय नाराज. मावळा समोरचा डोंगर दाखवतो. ही टेकडी पार केली की चिकटलोच गडाला. पायांची नाराजी थोडीशी कमी.....ह्याला नक्की रस्ता माहितेय का?...
टेकडी पार होते। छोटंसं पठार.....दिवे? हा दिवा कसला? रायगडावर दिवे होते माहीत होतं राजगडावर कधी?.......झुडुपांतून बाहेर पडल्यामुळे वाढलेल्या प्रकाशाला डोळे सरावतात. पांढर्‍या दिव्याच्या जागी पौर्णिमेचा चंद्र दिसायला लागतो..... अप्रतिम. पांढरा शुभ्र दुधासारखा. डागही किती स्पष्ट दिसतायत. अरे कुठे गेला? झाडाआड?.... चौदा पुढे चालत राहतात. आता शेवटचा वाटावा असा खडा चढ. पाय पुन्हा रडतात. सातवाही रडतो. दोघांना वर असलेल्या थंड पाण्याच्या टाक्यांची गाजरं.
...पोचलो....संजीवनी माची। पाण्याच्या टाक्या....चांगलं असेल का पाणी? कसंही का असेना....ग्लूकोजचे पुडे आणि त्यावर हवं तेवढं पाणी. पाय शांत, पोट शांत, मन शांत. विडीकाडीवाले विड्या शिलगावतात. मावळा पण एक विडी घेतो. पांढर्‍या विडीचं त्याला नवल. तो सगळं पाकीट ठेवून घेतो. दुसर्‍याला खरं तर त्याचं पाकीट परत हवं असतं. पण गडावर पोहोचल्याच्या खुशीत तो दिलदार होतो.
मावळा परततो। आता पहिला परत पहिला होतो. त्याच्या पाठून बारा बालेकिल्ल्याच्या दिशेने निघतात. बालेकिल्ला बाजूला ठेवून तेरा पद्मावतीच्या दिशेने चालतात. थोडा वेळ चालल्यावर पद्मावती माची येते.....देवळात राहायचं होतं पद्मावतीच्या. आहे का जागा? आत लोकं झोपलेयत. आता काय ह्या थंडीत उघड्यावर झोपावं लागणार की काय? दारूखाना बघूया. दारूखान्यात एक दोनच आहेत.....
सगळे तेरा दारूखान्यात शिरतात। मी माझी सॅक खाली ठेवतो. उघडून आतलं हंतरूण, पांघरूण काढतो. पांघरूण जमिनीवर पसरतो. हंतरूण पांघरायला घेतो......चला पोचलो एकदाचे. आहाहा. पाठ टेकल्यावर जमिनीला काय बरं वाटतंय........................................
पुढे?

सकाळ......

बटाट्याच्या चाळीतील काही आठवणी.. पु.ल. देशपांडे

"गच्चीसह---झालीच पाहिजे" ह्या लेखातील एक मजेदार प्रसंग
________________________________________________
मेंढे पाटलांच्या बंगल्यात दारात त्यांच्या प्रचंड अल्सेशियन कुत्र्याने शिष्टमंडळाचे भरगच्चस्वागत केले। प्रथम द्वारकानाथ गुप्त्यांच्या कोटाची चव त्याने घेऊन पाहिली, त्यानंतरसोकरजींना पुढल्या दोन पायांनी आलिंगन दिले आणि बाबा बर्व्याचा पंचा ओढला.(बाबांचा पंच्यापासून काचा सुटला, पण कमरेपासून पंचा सुटला नाही!!) काही वेळाने एकगुरखावजा भय्या अगर भय्यावजा गुरखा घावत आला आणि त्याने नुसत्या "अबेटायगर--" एवढ्या दिन शब्दांनी त्या भयानक जनावराला लोळण घ्यायला लावली.
भय्याच्या (अगर गुरख्याच्या) थाटावरून हेच मेंढे पाटील अशी सोकरजी त्रिलोकेकरांची समजूतझाली आणि त्यांनी त्याला गुड मॉर्निंग केले। मेंढे पाटलांच्या 'आश्वासनाच्या सभे'तसोकाजीराव हजर नव्हते. गुप्ते एक डोळा कुत्र्यावर व दुसरा गुरख्यावर ठेवून होते. शेवटीबाबांनी तोंड उघडले,
"नमस्ते---"
"क्या हे?" गुरखा।
"हम बटाट्याची चाळकी ओरसे शिष्टमंडळ के नाते श्रीमान मेंढे पाटीलजी के दर्शनके लिये आये है--" आचार्य।
"हम सोकाजी त्रिलोकेकर ओर बाबा बर्वे आचार्य होएंगा--" त्रिलोकेकरांनी हिंदीची चिंधी केली।
"जरा थांबा हं--" आचार्य बाबांनी त्यांना आवरले, "हमारी प्रार्थना है कि श्रीमान मेंढे पाटील हमें दर्शन देनेकी कृपा करेंगे!"
"हम करेंगे या मरेंगे--" गुप्ते उगाच ओरडला।
"गुप्तेसाहेब, जरा--" बाबांनी त्यांना थांबवीत म्हटले, "जनताकी मांग हम श्रीमानजी के प्रती निवेदन करने का स्वप्न-स्वप्न-
"हमारे ऊर मे बाळगते है!" त्रिलोकेकरांनी दुसरी चिंधी फाडली।
इतक्या सभांषणानतंरही गुरख्याच्या डोक्यात काही प्रकाश पडला नाही।काय आहे राव, निट सांगा की--" गुरख्याच्या (अगर भय्याच्या) तोंडून अस्खलीत मराठी ऎकुन पाद्याने अथर्वशीर्ष म्हटल्याच्या धक्का तिघांनाही बसला,
"माफ करा हं। मला वाटलं, आपण गुरखे आहा--
"किंवा भय्ये!"

________________________________________________
"उपास" ह्या लेखातील सुरुवातीचा प्रसंग
________________________________________________
साधारण दिड तास त्रिलोकेकर बडबडून गेले आणि चाळीतले नाट्यभैरव कुशाभाऊ आले। त्यांनी तर 'एकच प्याला' तल्या 'सुधाकर, तुम्ही आमचे पाठचे भाऊ. आम्ही तुम्हांला सांगु नये; पण तुम्ही दारु सोडा!' ह्या चालीवर सुरुवात केली.
"पंत- (इथे कुशाभाऊंनी माझ्या पाटीवरुन हातही फिरवला।) पंत, ऎका माझं. दोन घास खाऊन घ्या." (ह्या वाक्याने काही अत्यंत सुतकी संकेत माझ्या मनात डॊकावले!)
"अहो पण--"
"पण नाही नि परंतु नाही। पंत, आपण चाळीत इतकी वर्षे राहिलो ते भावाभावांसारखे. आमची ही आताच म्हणाली, की तुम्ही उपवास सुरू केला आहे, जेवत होतो , तसाच उठुन आलो! नाही, पंत--तुम्ही जेवायचं नाही, तर कुणी? पंत, ऎका माझं. बाबा बर्व्याच्या नारुची मुंज आठवा . विस वर्षे होऊन गेली. पंचावन्न जिलब्या उठवल्या होत्या ना तुम्ही?" इथल्या 'तुम्ही' वर कुशाभाऊने एक हुंदका देखील काढला. कुशाभाऊंचा तो कळवळा पाहून आमच्या कुटुंबाने आत डोळे पुसले. "ते काही नाही पंत, तुम्ही जेवंल पाहीजे--- उपासानं काय होणार" अहो जनोबा रेग्याचं बोलणं एवढं काय मनावर घेता?"
"जनोबाचा काय संबंध?"
माझे हे वाक्य पुरे व्हायच्या आतच नाटकातल्यासारखा "काय संबंध!" एवढेच शब्द उच्चारून कुशाभाउ नाट्यभैरवाने एक प्रदीर्घ उसासा टाकला।
"कळल्या आहेत, कळल्या आहेत मला सा-या गोष्टी! टमरेलची चोरी ती काय! अरे, जाताना बरोबर थोडीच न्यायची आहे आपल्याला ही चीजवस्तु ? सांर इथंच टाकून जायंच आहे बंर!"--कुशाभाऊ
"टमरेल?"
"पंत उजाडल्यावर टमरेल--नाही टमारेल उजाडल्यावर कोंबडं झाकलं काय उजाडल्या राहतंय थोडचं ! तिन दमडीचं टमरेल ते काय आणि त्याच्या चोरीचा आळ तुमच्यावर?"
"चोरी?" मला काही कळेना।
"पंत, तुम्ही नका कष्ट करुन घेऊ। मी जनोबापुढं शभंर टमरेलं भरून ठेवतो. वापर म्हणांव दिवसभर, पण पंत, तुम्ही हा उपासाचा नाद सोडा---ही अन्नब्र्म्हाची उपेक्षा आहे, पंत."
"मला काही ऎकायचं नाही नि बोलायचं नाही। मला फक्त एकच पाहायचं आहे ते तुम्हांला भरपूर जेवताना. पंत, सोडा हा नाद --नाही हो, अंतःकरण पिळवटुन सांगतो मी तुम्हांला. नका, पंत, नका ह्या उपासापोटी आपल्या प्रकृतीचा सत्यानाश करू!"
________________________________________________
"भ्रमण मंडळ"ह्या लेखातील एक प्रसंग
________________________________________________
काही वेळाने कल्याण आले। बाबुकाकांना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची आठवण झाली. सोकाजी त्रिलोकेकरांनी कुठलासा डोंगर दाखवुन तिथे हाजी मलंगाची समाधी असल्याचा व्रतातं सांगतिला. काशिनाथ नाडकर्ण्यानां केव्हापासुन तहान लागली होती. त्यांच्या खिडकीसमोर चहावाला आला आणि कोचरेकरमास्तरांनी शेजारच्या मावळ्याशी दोस्ती केली.
"कुठं पुण्याला चाललात का?"
"आपुन कुटं चालला?" कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर द्यायचं नाही ह्या शेतकरीधर्माला जागुन त्याने उलट प्रश्न केला।
"पुण्याला। तुम्ही?"
"आम्ही लोणावळ्याला। तिथं गाडी बदलून तळेगावला जायाचं."
"तळेगावाला असता वाटतं आपण?"
"नाही।" कुठे असतो हे उत्तर नाही.
"मग?"
"दुसरंच गाव हाय!"
"कोणतं?"
"ढोरवाडी-- म्हंजी ही पिराची ढोरवाडी नव्हं। ती आली अंदा-या मावळाच्याअंगाला. आमची फकिराची ढोरवाडी."
"दोन ढोरवाड्या आहेत वाटतं?"
"तिन! येक पिराची, येक फकिराची, आन एक जंगमाची ढोरवाडी हाय। ती पार खाल्ल्या अंगाला हाय."
"खाल्ल्या अंगा" चे कोडे कोचरेकरानां उमगले नाही। परंतु "अस्सं!" असेम्हणुन जंगमाची ढोरवाडी कुठे आहे हे आपल्या नेमके लक्षात आल्याचा त्यांनी चेहरा केला.
"आपून काय ब्य़ांडात असता का पोलिसात?" कोचरेकरमास्तरांच्या 'ड्रेसा' कडे द्र्ष्टी टाकीत शेतकरीदादांनी सवाल केला।"नाही, शिक्षक आहे मी."
"म्हंजी मास्तुर! पुन्याच्या साळंत?"
"नाही, मुंबईच्या।"
"हा-- मोठी असल साळा! आमच्या गावाला गुदस्तसाली झाली साळा, परमास्तर लय द्वाड हाय। च्यायचं खुटायवढं कारटं धाडलय मास्तर करुन, काय पोरं हाकनार?"
असे म्हणुन बसल्या ठिकाणाहुन मास्तराच्या निषेधार्त त्याने एक तंबाखूची पिंक खिडकीबाहेर तोंड काढुन टाकली। 'पोरं हाकणं', 'खुटाएवढं कारटं'वगैरै शब्दप्रयोग कोचरेकरमास्तरांना तांदळांतल्या खड्यांसारखे लागत होते. प्रवासातपंडितमैत्री होते अशा अर्थाचा श्लोक त्यांनी पाठ केला होता. त्यांच्या वाट्याला मात्र हाशिक्षकांविषयी एकेरी उल्लेख करणारा इसम आला होता. परंतु पुण्यात 'पंडित' नक्कीभेटतील ह्या आशेवर ते तग धरुन काशीनाथ नाडकर्ण्यांच्या पेटा-यावर बसले होते.
"आपण ढोरवाडीला काय करता?"
"शेती हाय आमची!"
विचारलेल्या प्रश्नाला सरळ असे पहीलेच उत्तर मिळाल्याचा कोचरेकर-मास्तरांना माफक आनंद झाला!
"जपानी भातशेतीविषयी आपलं काय मत आहे?" आणखी एक प्रयत्न कोचरेकरमास्तरांनी केला।
"जपानी?"
"आपल्या देशात सध्या जो प्रयोग चालला आहे जपानी भातशेतीचा---"
"खुळ्याचा कारभार आहे समदा। त्यो आमचा पुतन्या कुठं शेती कालिजात शिकूनशाणा झालाय, त्यानं चलविलंय काय तरी श्येतावर ह्यो जपानी खुळच्येटपणा--"
"पण आपण नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय प्रगती होणार कशी? प्रयोगहा प्रगतीचा पिता आहे।" वर्गाताल्या भिंतींवर लिहीलेल्या अनेक वाक्यांपैकी एकवाक्य कोचरेकरमास्तर म्हणाले.
"घ्या!" कोचरेकरमास्तरांच्या प्रश्नाला चोळलेली तंबाखु हे उत्तर मिळाले।
"नाही। तंबाखु खात नाही मी."
"आमच्या साळंतला मास्तुर इड्या फुंकीत बसतो। नकायवढं मास्तुर--थुत!"
________________________________________________

Friday, May 11, 2007

अल्टर+कंट्रोल+डीलीट

मे महिन्याचे काही दिवस सुट्टी घेऊन नितीन घरी आलेला. मस्त उशीरा उठायचे, आईच्या हातचे जेवण,दुपारची झोप, संध्याकाळचा चहा, जुन्या मित्रांशी कट्ट्यावरच्या गप्पा आणि रात्रीच्या जेवणानंतरचे पान........ :-) मला तर कल्पनेनेच स्वर्गात पोचल्यासारखे वाटतंय. पण नितीनला मात्र मोठी सुट्टी घेऊन घरी राहायचं नव्हतं. तसे त्याला सुट्टी मिळणे अवघड नव्हते पण कित्येक दिवसांपासून टाळलेला विषय त्याला यावेळी टाळता आला नव्हता. लग्नाचं वय उलटून १-२ वर्षे होऊनही गेली होती. नितीनला मात्र कुठली मुलगी पसंत पडत नव्हती. आता त्याच्या म्हणण्यानुसार आजकाल या इंजिनियर मुलांना त्यांच्याच क्षेत्रातली मुलगी हवी असते. त्यामुळे त्याला त्यांच्यासारख्या छोट्या गावातली मुलगी त्याला नकॊ होती तर शहरातली कुठली मुलगी त्याच्या गावी राहणाऱ्या आई-बाबांना पसंत नव्हती. तर असा हा तिढा कित्येक वर्षे सुटत नव्हता.
त्याचं म्हणणं मी एखादी कामाची गोष्ट बोललो तर बायकोला समजली पाहिजे ना? कामाची वेळही पक्की नसते, मग कधी परदेशी जावं लागतं, इ. त्याच्या म्हणण्यानुसार दोघंही एकाच क्षेत्रातले असले की समजून घ्यायला सोपं असतं. त्याला वाटे की इथे कोणाला काही समजत नाही आपलं म्हणणं. इथल्या लोकांत तो त्यालाच वेगळा वाटायचा. तर त्याच्या आई-बाबांचं म्हणणं असं की,"अरे आपली राहणी वेगळी, शहरातली वेगळी.सण-वार, नातेवाईक,घरंच सगळं करणारी मुलगी हवी ना?" त्यावर चुकून तो असंही म्हणाला की," तिला कुठे तुमच्या सोबत रोज राहायचं आहे. तुम्ही असंही घर सोडत नाही." हे मात्र आईला फारच लागलं आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून शेवटी एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष लावूच म्हणून ४ आठवड्यांची सुट्टई घेऊन तो घरी आला होता. रोज मग जवळच्या किंवा जरा दूरच्या गावांत जाऊन मुली पाहणे, कधी मुलींचे आई-बाबा मुलाचं घर पाहायला येणे असा काहीसा कार्यक्रम होणार होता.
कित्येक वर्षात तो निवांत असा घरी राहिलाच नव्हता.शिक्षण,नोकरीसाठीची धावपळ यात दिवाळीला, गणपतीला जमेल तसं २-४ दिवस राहायचं, त्यातही निम्मा वेळ झोपण्यात, टी.व्ही. पाहण्यात जायचा. उरलेल्या वेळात आपल्या मुंबईतल्या मित्रांना,मैत्रिणींना फोन करण्यात, मेसेज करण्य़ात जायचा. त्याच्या आईला कळायचं नाही की हा घरी असतानाही कामाबद्दल आणि ऑफिसातल्या लोकांशी का बोलतो? आता घरी येऊन त्याला आठवडा झाला होता आणि त्याला आळसाचाही कंटाळा आला. कधी नव्हे ते तो सकाळी लवकर उठायला लागला आणि त्याला वेगळाच अनुभव येत होता. खूप दिवसांनी त्याला जाणवलं होतं की आपल्या आई-बाबांचा दिवस आजही सकाळी ६-६.३० ला सुरू होतो. आजही आई दारात रांगोळी काढते, बागेतली फुले कुणी चोरून तर नाही ना नेली हे तपासून पाहते आणि आपल्या इतक्या वर्षांच्या दूधवाल्याशी आजही तसाच वाद घालते. प्रदूषित शहरापेक्षा इथली सकाळची सुद्ध हवा माणसाला किती प्रसन्न करते आणि रेडियोवरच्या पुणे-सांगली केंद्रावरची आपली आवड आजही तिच मराठी गाणी लावते......
सकाळी सायकलवरून जाणारी मुले, जुनेच शिक्षक (बरेचसे पिकलेले केस) जुन्या आठवणी ताज्या करून गेले. त्याच्या मनावरचा ताण आता बराच कमी झाला होता. त्याला जणू आपल्या अस्तित्वाचा उगम सापडला होता. हळूहळू त्याला हे ही जाणवलं की शिक्षकच कशाला आपल्या आईचेही केसही आता बरेचसे पिकलेत आणि बाबांनाही बाहेरून आल्यावर दम लागलेला असतो. माणूस स्वत:मध्ये किती गुरफटलेला असतो नाही? एरवी घरी आल्यावर फक्त आपले कपडे धुवायला टाकायचे आणि जाताना इस्त्री केलेले कपडे घेऊन जायचे हे माहीत होतं. यावेळी प्रथमच त्याला जाणवलं की कामवाल्या काकू आल्या नाही तर आई स्वतः:च कपडे धुऊन इस्त्रीवाल्याकडे देऊन येते.चक्क त्याने आईला रागावून सांगितलं की मला काही लगेच कपडे लागणार नाहीयेत आणि लागले तरी बाहेरच देऊ धुवायलाही हवं तर. प्रत्येकवेळी तो म्हणायचा की किती जुना झाला आहे सोफा, किती वर्षांची जुनी भांडी आई अजून वापरतेच आहे.घराला नवा रंग लावून घ्यायचा होता. आता मात्र त्याने घराचा मक्ता आपल्या हातात घेतला आणि कामाला सुरुवात केली. पण ते करणंही सोपं नव्हतं......
त्याने घराचा नवीन रंग कोणता हे ही दुकानात जाऊन ठरवून घेतलं. रंगारी कुठून आणणार? त्याला शंभर वेळा फोन लावला पण कोणी उचलेना. शेवटी स्वत:च धडपड करून चार लोक शेजारच्या गावातून बोलावले घेतले. एरवी ४० लोकांची टीम सांभाळणाऱ्या नितीनला या चार लोकांना कसं कामाला लावावं हे कळत नव्हतं. :-) दुपार झाली की हे आपले तंबाखू चोळत गप्पा मारत बसत. बरं यांना काही अप्रेलजचीही धमकी देता येत नव्हती ना. :-) कसेबसे एका खोलीतले काम पूर्ण करून घेताना त्याच्या नाकी नऊ आले होते. तेच नाही अजूनही बाकीची कामे करताना लक्षात आलं की वातानुकूलित कचेऱ्यांत बसून काम करण्यात आणि या रोजच्या व्यवहारात किती फरक आहे ते. किराणा माल, भाज्या निवडून विकत आणण्यापासून घरात एखादी वस्तू घेण्यापर्यंत. त्याने किती तरी वेळा घरी येताना काही ना काही गिफ्ट आणले होते. बाबांसाठीचा परफ्यूम, आईसाठी घेतलेले वॉशिंग मशीन हे सगळं त्यांच्या साध्या आयुष्यात कुठे बसतंच नव्हतं. सॊफ्टवेअर मध्ये एखादा प्रोग्रॅम चुकीच्या दिशेने जातोय असं कळल्यावर मागे जाऊन आपल्या गरजा किंवा गृहीत काय आहेत याला 'Requirement Review' म्हणतात. तर नितीनला रोजच्या जीवनातही त्याची आवश्यकता वाटू लागली.
घरी येणारे,येता-जाता बोलणारे, आवर्जून त्याची चौकशी करणारे लोक इथे होते.कसं ना,इथे कोणीही विनाकारणही भेटायला येऊ शकतं?तो घरी नसताना आई-बाबांना अशा मित्रांची आणि नातेवाईकांचीच तर सोबत होती. नातेवाईक,समाज या गोष्टींचा प्रभाव त्याला आताशी कुठे नव्याने कळत होता.एके दिवशी बाबांचे एक मित्र घरी आले होते.असेच बातम्या बघायला आणि गप्पा मारायला.म्हणजे संध्याकाळी सातच्या मराठी बातम्या जणू तो विसरूनच गेला होता. त्या संपल्यानंतर त्यावरच्या चर्चा....आणि त्यांचे बोलण्याचे विषय फार विचार करायला लावणारे वाटले त्याला. :-) रोज ८-८ च्या नोकरीमध्ये स्वत:साठीच वेळ नव्हता तर मग बाकीच्यांसाठी काय असणार?म्हणजे "या लोकांना काय कळतंय" असं मी म्हणतो पण मला तरी चार संगणकाच्या बटणांपलिकडे काय माहीत आहे? आयुष्य म्हणजे केवळ २४ बाय ७ सोफ्टवेअर सपोर्ट देणे नव्हतं हे त्याला जाणवू लागलं होतं. "काय मग कसं चालंलय नितीनराव? तुमचा कंप्युटर काय म्हणतो? आमची स्वाती पण करते बरं का कंप्युटरवर कामं." काकांनी किती तरी वेळा त्याला हे सांगितलं होतं. पण प्रत्येकवेळी ते मोठ्या अभिमानाने आपल्या स्वातीबद्दल सांगत. तिने बी.कॊम. नंतर गावातच एका ठिकाणी संगणकाचे शिक्षण घेतले होते. तशी ती स्मार्ट होती आणि काही टायपिंगचेही कोर्सेस करुन तिथेच एका ब्यांकेत नोकरीही मिळवली होती. तर तिच्या या कंप्युटरच्या कामाची तारीफ नितीनला नेहमी ऎकायला लागायची.
१५-१६ दिवस उडून गेले. मुली पाहतानाचा त्याचा दॄष्टीकोण बदलला होता. आता त्याच्याच क्षेत्रातली मुलगी हवी असा त्याचा हट्ट कमी झाला होता. त्याचबरोबर घराच्या सुधारणेची कामेही चालू होतीच. काही कामासाठी त्याने आपल्या खात्यातून बाबांच्या लोकल बँकेतील खात्यावर पैसे जमा केले होते. पण चेक टाकून ८ दिवस झाले तरी पैसे काही आले नव्हते. आता बँकेत जाऊन पाहायलाच हवं म्हणून तो स्वत:च एक दिवस तिथे गेला. ७-८ लोकच रांगेत होते,धोतर, नऊवारी साड्या अशा कपड्यातील मंडळीही तिथे दिसत होती. अर्ध्या तासात काम होईल असं वाटून तो जरा विसावला. पण तास भर झाला तरी काही रांग संपेना. शेवटी त्याने शेजाऱ्याला काय झालं म्हणून विचारलं. "काय तर कंप्युटर मध्ये घोळ हाय म्हणत्यात. अन साहेबबी बाहेरगावी गेल्यात. "आज काही पैसे काढता येणार नाहीत असं कॅशियरने सांगितले.
लोकांच्या खात्यांची माहीती असलेला प्रोग्रामच उघडत नव्हता. कॅशियर तसा माहीतीचाच होता,तो नितीनकडे पाहून हसला.त्याने विचारले," अरे नितीन तूच बघतोस का काय झालंय ते?आज गावाचा बाजार असतो. ही मंडळी शेजारच्या छोट्या गावातून येतात. त्यांना आज पैसे नाही मिळाले तर आठवडाभर खायची बोंब होते." सर्वांचे अपेक्षेने पाहणारे डॊळे पाहून नितीने पुढे झाला. हेच जर त्याला कंपनीत सांगितले असते तर त्याने उत्तर दिले असते," मला प्रोजेक्टची माहीती पाठवून द्या इ-मेलने.मी समजून घेऊन मग impact analysis करतो.त्यावरून मग दुरुस्तीला किती वेळ लागेल हे सांगू." त्यातही प्रोजेक्ट प्लान वगैरे बनवून, टीममेंबर नेमून देऊन काम पूर्ण व्हायला आरामात ८-१० दिवस घालवले असते. :-) पण इथे इज्जतका सवाल असल्याने सगळे प्रश्न गिळून तो संगणकाकडे बघू लागला. आता पहिल्या खिड्कीवरच त्याला कळले की प्रोग्रॅम खूप हळू चालतो आहे, म्हणजे 'Performance Tuning' आलंच. :-) त्याने जरा माऊस हलवून पाहीला पण सगळ्या खिडक्यांनी मान टाकलेली होती. मग त्याने उगाचच तो प्रोग्रॅम कुठल्या संगणकीय भाषेत आहे हे पाहीलं. अर्थात हे पाहूनही त्याला काही करता येणार नव्हतं म्हणा. गेल्या कित्येक वर्षात त्याने प्रत्यक्षात संगणकावर काम केलंच कुठे होतं? नुसत्या उंटावरून शेळ्या(की Human Resource) हाकल्या होत्या.
थोडा वेळ त्याने काही फाईल्स उघडूनही पाहील्या पण त्याला काही कळत नव्हतं. मग त्याने सर्वात शेवटचा पर्याय अवलंबला. कोणता? 'Alt+Ctrl+Det'. :-) Shut Down. संगणक चालू झाला आणि पहिल्या एक-दोन खिडक्या नीट उघडल्याही.सर्वांनी हुश्श केलं पण ते काही जास्त वेळ टिकलं नाही. तेव्ह्ढ्यात त्याला स्वाती दिसली. तिने लोकांना जरा थांबवून ठेवलं आणि संगणकाकडे आली. तिने शेजारचा एक पंखा ओढून आणला आणि प्रोसेसरच्या मागे जोरात लावून दिला. "प्रोग्रॅम ठीक आहे नितीनसाहेब पण तुमच्यासारख्या वातानुकुलित केबिन्स नाहीत ना. त्यामुळे जरा त्रास देतोच हा संगणक. त्यासाठी हा पंखा पुरेसा आहे. "दुपारच्या उन्हात तापलेला तो प्रोसेसर पुन्हा सुरळीत सुरु झाला आणि १० मिनीटांत एकेकांना पैसे मिळायला सुरुवात झाली होती. आपले पैसे घेऊन जाण्यासाठी नितीन कॅशियरजवळ आला तेव्हा स्वाती हळूच म्हणाली,"कधी कधी गोष्टी साध्याच असतात पण आपल्यालाच सोपी उत्तरं माहीत नसतात. आणि हो "अल्टर+कंट्रोल+डीलीट" नेही फक्त समस्या तात्पुरत्या सुटतात....कायमस्वरुपी नाही."
:-)
परतताना नितीन एकदम खूष होता। कदाचित गुंता सर्व मनातच होता. त्याने स्वत:ला एकाच साच्यात बसवून घेतले होते आणि त्यातून बाहेर पडणं त्याला अवघड झालं होतं.आणि कोणी त्याला काही वेगळं सांगायला लागलं की तो स्वत:ला 'शट डाऊन' करुन घ्यायचा. गेल्या काही दिवसांनी त्याला जगण्याचा नवा दॄष्टिकोन दिला होता. पुन्हा एकदा सगळं सोपं वाटत होतं, पूर्वीसारखं,आपलं वाटत होतं. आज परत आल्यावर त्याने वधुपरिक्षेसाठी लिहीलेली प्रश्नांची यादी फाडून टाकली होती. आईच्या गळ्यात पडून तो म्हणाला,"मग कधी सून घेऊन येणार तुझ्यासाठी?

तुझं वय झालं आता."

कानावर पडलेल्या दोन गोष्टी!!!!

गोष्ट पहिली
एका तरुणाला लोकांसाठी, समाजासाठी काही तरी करावे असे वाटत असते। त्यासाठी तो राजकारणांत उतरण्याचा विचार करतो. त्याच्या वडिलांना त्याचे राजकारणांत जाणे पसंत नसते. मुलाला समाजसेवाच करायची असेल तर त्याने एखाद्या अशासकीय सेवाभावी संस्थेचा सभासद व्हावे असे त्यांना वाटत असते. पण मुलाला ते मान्य नसते.
शेवटी मुलगा ऐकत नाही हे पाहून वडील त्याला म्हणतात की तो राजकारणांत जायला लायक आहे की नाही हे पहाण्यासाठी त्यांना त्याची परीक्षा घ्यायची आहे। त्यांत तो उतरला तर ते त्याच्या आड येणार नाहीत. मुलगा हे मान्य करतो.
वडील त्याला आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर जाऊन बाल्कनींत उभे रहायला सांगतात। स्वतः बाल्कनीच्या खाली उभे राहतात आणि त्याला बाल्कनींतून खाली उडी मारायला सांगतात.
मुलगा बिचकतो। इतक्या उंचावरून उडी मारली तर मोठी दुखापत होईल असे वडिलांना सांगतो. वडील त्याला तू कशाला घाबरतोस मी सावरतो ना तुला म्हणून सावरण्याच्या पवित्र्यांत राहतात. वडिलांनी आश्वासन दिल्यामुळे मुलगा बाल्कनींतून खाली उडी मारतो. त्या क्षणी वडील त्याला सावरण्याऐवजी मागे सरकतात व त्याला पडू देतात. मुलाला बरीच दुखापत होते.
मुलगा रागावतो. वडिलांकडे रागाने पाहात म्हणतो तुम्ही धरतो म्हणालात म्हणून मी उडी मारली तर तुम्ही मागे सरलात.
वडील हसतात नी म्हणतात, तू राजकारणांत जायला योग्य नाहीस। बापावरही विश्वास ठेवायचा नसतो हा राजकारणांतला पहिला नियम आहे.


गोष्ट दुसरी
एक आई, वडील व दोन मुलगे असे चौघांचे कुटुंब असते। मुले अभ्यासू असतात. मोठा मुलगा चांगला शिकतो व अमेरिकेला जातो. तेथे स्थिरस्थावर झाल्यावर आपल्या धाकट्या भावालाही बोलावून घेतो. घरांत फक्त आईवडील राहातात.
एकदा आई आजारी पडते। पैशाची कमतरता नसते. पण महागांतले महाग डॉक्टरी उपचार करूनही ती वाचत नाही. ती वारल्याची बातमी मुलांना अमेरिकेंत कळवली जाते. धाकटा मुलगा सुटी काढून तातडीने भारतांत येतो.
तो एकटाच आल्याचे पाहून वडील विचारतात, "काय रे दादा नाही आला?" त्यावर धाकटा मुलगा सांगतो, "नाही आला. तो म्हणाला, दोघं दोघं कशाला? यावेळी तू जा. बाबा गेले की मी जाईन.

मलाही वाटते.........


कोणितरी जवळ असावसं वाटतं
आपलंही स्वतःचं कोणी असावसं वाटतं

एखाद्या संध्याकाळी ढग दाटून येतात
मन असंच आनंदात भिजतं
सर्वान्ना हवासा छान पाऊस पडतो

मलाही मग कोणातरी सोबत चिंब भिजावसं वाटतं
एखादं गाणं ऐकताना एखादा स्वर भावून जातो

मनाला शांत करणारा गारवा देऊन जातो
अशावेळी दाद देणारं कोणी हवं असतं

कारण मलाही असं शांत व्हायचं असतं
कधितरी दिवस असाच वाईट जातो

एकट्या या मनाला आणखी दुखावून जातो
अशावेळी कुशीत शिरुन रडावंसं वाटतं

माझं तेव्हा कोणितरी असावंसं वाटतं
अशातंच शेवटी निघायची वेळ येते

कोणितरी थांबवणारं असावंसं वाटतं
निघून गेल्यावर रडणारं कोणितरी असावंसं वाटतं


म्हणूनच मला दुकटं व्हावंसं वाटतं................

ज्याने त्याने करीत जावे............


ज्याने त्याने करीत जावे, अपुल्या बेटांवरती वस्तीरक्त सांडुनि लिहू कशाला? शाई आहे जेव्हा सस्ती

रोज धावते आशाभरलीतुडुंब भरून लोकल वेडीचाळीमधल्या कठडयावरतीस्वप्नभरारी भिजून गेली

ज्याने त्याने करीत जावे ,अपुल्या बेटांवरती वस्ती बिजली असो वा नसो आहे अंगामध्ये मस्ती

काळी माती लिहून गेलीजवार भरली गीते काहीदुष्काळाच्या देवा अपर्ण प्राण किसानाचा होई

ज्याने त्याने करीत जावे ,अपुल्या बेटांवरती वस्तीशिवरायांच्या पोवाडयांना येईल दुष्काळात भरती

पर्वतीस फेरा घालुनीहातामध्ये सकाळ धरतेपेशवाईची झापड घेऊन पुण्य दुपारी घोरत पडते

ज्याने त्याने करीत जावे, अपुल्या बेटांवरती वस्तीभरल्या पोटी फिदा व्हावे, चर्चेच्या चकलीवरती

झाले देवांना कोंडून मोठे काही छोटे मोठे देव्हारेमाणुसकीच्या बिया शोधतीआता रूजण्या नवी शिवारे

ज्याने त्याने करीत जावे ,अपुल्या बेटांवरती वस्तीरोज नियमाने गात रहावी, पोटभऱ्याची तीच आरती

उरल्या सुरल्या शिरगणतीचीआहे तमा इथे कुणालाबारीक ठिपका नकाशातलादिसला किंवा ना दिसला

भरून घ्यावी अपुली घागर ,अपुल्या अपुल्या नळावरती ज्यांने त्यान करीत जावे अपुल्या बेटांवरती वस्ती

उमटवुन गेले निशान काळ्जात............


सच्चेपणा होता शब्दांत माझ्या, आणि आसवातही होता बेईमान झालेल्या जिवलगांची, मला फिर्याद करायची नाही


उमटवून गेले निशान काळजात, ते क्षण ओराखडा काढणारे अलविदा केलेल्या क्षणांना मला पुन्हा साद घालायची नाही


कधी स्मित फुलवायची चेहृयावर, किनार्याकडे धावणारी लाट आता मात्रा मला पुन्हा, त्या सागराची गाज ऐकायची नाही


उलट फिरले तेच सारे, ज्यांच्या जिवाला जीव दिला होता कबूल तेही, मला त्या वेदनांची कुणाकडे दाद मागायची नाही


बोलनंही बंद केलंय मी आता , त्या नकोशा दुस्वप्ना:बद्दल कारण माझ्या पराभवाची कहाणी मला, लिलावात काढायची नाही

मी शिशीराची पान बनून गळतो आहे...........


Thursday, May 10, 2007

Amby Valley ( Khandala )

Thursday, May 3, 2007

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे

नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे

Tuesday, May 1, 2007

माझो गोवा