Saturday, July 14, 2007

नकोस इतके प्रेम करू........

तो: नकोस इतके प्रेम करू
मी तर एक मेघ दीवाणा
कसा कुणाचा आधार व्हावा
जो अनिकेत भटकणारा! II १ II

ती: ह्याचसाठी तुजवरी जीव जडला
की मेघ तू उन्मुक्त विहरणारा
जन्मोजन्मी जी तुझ्यासवे,
तीच असे मी जलधारा. II २ II
तो: मी कधी एक जागी रमलो?
मी कधीही ना स्वस्थ थांबलो!
कुठवर मजसवे येणार तू?
मी देशविदेश भटकणारा! II ३ II
ती: हे नीलनभातील प्रवासी,
हे प्रेम तुला कळे ना कसे?
मी साथ तुझी सोडेन ना मुळी
जोवर ना म्हणशी, "हरलो" असे! II ४ II
तो: विसरतेस का भान प्रिये?
बनलीस ध्येय जरी जन्माचे
ती: परतून आता मी जावे कसे?
तोडले तुजसाठी पाश सर्व जगाचे! II ५ II
तो: नकोस इतके प्रेम करू
मी तर एक मेघ दीवाणा!
ती: जन्मोजन्मी जी तुझ्यासवे,
तीच असे मी जलधारा! II धृ II


No comments: