Saturday, July 21, 2007

मातला तो चंद्र होता......


मातला तो चंद्र होता
चांदण्यात दंग होता
शुभ्र रात्री घट उलगडले
तुझ्या आठवणी अथांग होत्या।
सोबतीची सारी पाने चुरली
फूल फूल मोहरुन आले
एकाकी त्या श्वासामधुनी
गंध तुझा दरवळला होता।
हे देहाचे शाप विषारी
मिटल्या नेत्री बाधत जाती
गहिवर साठून कोरडा होता
कोण्या अनाम देही विरघळला होता।
धीर सुटावे मना शरीरी
कठोर काजळ साचत गेले
अश्रू लपता लपला नाही
रंग बदलून ओघळला होता.

No comments: