सध्या टिव्हिवर एक उद्वेगजनक जाहिरात लागते. कुठल्याश्या साबणाची. एक मुलगी (आता साबणाची जाहिरात आहे म्हणजे ती तरुण आहे हे सांगायला नकोच) 'मी आता उटण्याने स्नान करायला जाते' अशी घोषणा करते. त्यावर (तिच्या) घरातल्या सर्वांनाच धन्यधन्य वाटतं आणि तिची आजी येऊन तिची आरती करते! ही महान जाहिरात संपल्यावर आम्ही एकमेकांच्या चेहेर्यांकडे पाह्तो. सगळ्यांनाच ही जाहिरात पाहिल्याचा पश्चात्ताप झालेला दिसतो आणि आपसूकच पूर्वीच्या म्हणजे ऐंशी-नव्वदच्या सुमारातल्या जाहिरातींचा विषय निघाल्याशिवाय रहात नाही. घरात अलिकडे बर्याचदां हा दिषय छेडला गेला आणि भराभर एकेक जाहिराती, त्यांच्या कॅप्शन्स, जिंगल्स आणि पात्रांसकट आठवत गेल्या..एकामागोमाग एक. आणि मग आठवल्या तश्या लिहून ठेवाव्याश्या वाटल्या. काही शब्द चुकीचे असण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्हाला ते माहित असतील तर जरुर सांगा.
दिल्ली दूरदर्शन आणि फ़ारतर डीडी मेट्रो एव्हढ्यातच टिव्हिचं विश्व सामावलेल्या तेव्हाच्या काळात मस्त सिरियल्स आणि जाहिराती असायच्या। सिरियल्स शिस्तीत १३ भागांमध्ये आटपायच्या. खरं तर त्यावेळच्या सिरियल्स हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. बुनियाद, चुनौति, ये जो है जिंदगी, कच्ची धूप, खान्दान, फ़ौजी, उडान पासून ते आमच्या बालमनाला सुखावणार्या स्पायडरमॅन, विक्रम और वेताल, ही-मॅन, जंगल-बुक, डीडीज कॉमेडी शो, टेलिमॅचेस या सर्वांचे धागे जाहिरातींनी जोडले गेलेले असत. चाल, बोल, थीम या सर्वच अंगांनी परिपूर्ण असणार्या तेव्हाच्या जाहिराती कधीच संतापजनक किंवा अश्लिल वाटल्या नाहीत.
इलेक्ट्रिकल बल्ब आणि ट्युब्ज तयार करणार्या 'बजाज' ची जाहिरात मला सर्वात आवडायची। बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या तिन्ही स्टेजेस मधून आता सुमारे सत्तरीचे असलेले आजोबा सांगतात,
जब मैं छोटा बच्चा था
बडी शरारत करता था
मेरी चोरी पकडी जातीsssss
जब रोशन होता बजाज
बडी शरारत करता था
मेरी चोरी पकडी जातीsssss
जब रोशन होता बजाज
क्या रंगीन जवानी थी
इक राजा इक रानी थी
राजा रानी शर्मा जातेsssss
जब रोशन होता बजाज
इक राजा इक रानी थी
राजा रानी शर्मा जातेsssss
जब रोशन होता बजाज
अब मैं बिल्कुल बुढा हूं
गोली खाकर जीता हूं
लेकीन आज भी घर के अंदरssss
रोशन होता बजाज
गोली खाकर जीता हूं
लेकीन आज भी घर के अंदरssss
रोशन होता बजाज
तशीच बजाज स्कूटरची जाहिरात। एकेक दृश्य त्यातलं इतकं भावणारं होतं आणि ओळीही चटकन लक्षात राहणार्या. "बुलंद भारत की बुलंद तसबीर...हमारा बजाज"
अजून एक गंमतीदार जाहिरात होती। ब्रिटानिया कोकोनट बिस्किटांची. त्या जाहिरातीचे बोल असे होते:
एक नारियल पेड से टूटा
गिरते ही वो बीचसे फ़ुटा
सेक कापकर उसे पकाया
खूब कुरकुरा उसे बनाया
ब्रिटानिया कोकोनट क्रंची
गिरते ही वो बीचसे फ़ुटा
सेक कापकर उसे पकाया
खूब कुरकुरा उसे बनाया
ब्रिटानिया कोकोनट क्रंची
दुसर्या ओळीत नक्की काय शब्द होते आता आठवत नाहीत। पण शेवटी नारळ एका झटक्यात फ़ोडलेला दाखवायचे आणि आतमधून मस्त तयार गोल गोल बिस्किट्स बाहेर पडायची. आमच्या निरागस मनाला ते खरं वाटल्याने जेव्हा जेव्हा घरी नारळ फ़ोडला जायचा तेव्हा आतमधून तशीच बिस्किट्स बाहेर पडतील का असं वाटायचं.
परवा सुरभि बघताना अजून एक आवडती जाहिरात अचानक समोर आली। 'अमुल्या' ची. इतक्या वर्षांनी ती जाहिरात पाहताना इतकी मजा वाटली! तश्या अमूलच्या सर्वच जाहिरातींचा जवाब नाही पण ही जाहिरातसुद्धा छान होती. स्मिता जयकर किती यंग दिसतात यात!
वही कॉफ़ी वही चाय
पल मैं नया स्वाद जगायें...
अमूल्या..!
बस! यूं घुलमिल जाय
स्वाद निखारे
रंग जमाये..
अमूल्या...!
पल मैं नया स्वाद जगायें...
अमूल्या..!
बस! यूं घुलमिल जाय
स्वाद निखारे
रंग जमाये..
अमूल्या...!
अमूलचं नाव निघालंच आहे तर अमूलच्या जिंगल्सची उजळणी झाली नाही तर या आठवणी अपूर्ण राहतील। चारोळींच्या साध्या सोप्या जिंगल्स छोटी मुलं म्हणतात वेगवेगळ्या प्रसंगी. अमूल श्रीखंड खाण्याचे हे प्रसंग कसे विसरता येतील!
मेहेमान जो आयेंगे
मौके मिल जायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!
मौके मिल जायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!
पार्टी मनायेंगे
सबको बुलायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!
सबको बुलायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!
शादी मैं जायेंगे
बाजा बजायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!
बाजा बजायेंगे
जी भर के खायेंगे
अमूल श्रीखंड!
एरवी पान-तंबाखूचा कितिही तिटकारा असला तरी पानमसाल्याच्या जाहिराती कधीच चुकवल्या नाहीत। पानपरागची ती अशोक कुमार आणि शम्मी कपूरची जाहिरात विसरणं कसं शक्य आहे! त्यातले ते खास डायलॉग्ज.........
"सुनिये लडके के मा-बाप आये है" मुलीची आई किंवा कोणीतरी म्हणतं।
"आयिये आयिये॥" नेहेमीच स्वागत समारंभ।
" बारा्त ठिक आठ बजे पहूच जायेगी। लेकिन हम आपको एक बात कहना तो भूल ही गयें! " शम्मी कपूर।
सर्वजण टेन्शनमध्ये एकमेकांकडे बघतात। लगेच शम्मी कपूर पुढे,
"घबराइये नही! हमें कुछ नही चाहिये। हम तो सिर्फ़ इतना चाहते हैं की आप बारातियों का स्वागत पानपराग से किजीये।"
हे ऐकल्यावर रिलॅक्स झालेले अशोक कुमार पानपराग हळूच काढून म्हणतात,
"ओह हमें क्या मालूम आप भी पा्नपराग के शौकीन हैं! ये लिजिये पानपराग!"
पान-पराग पानमसाला॥ पान पराग!!
पिक्चर पहायला बाहेर थिएटरमध्ये गेल्यावर सिनेमा सुरु व्हायच्या आधी दोन जाहिराती लागल्याशिवाय सिनेमा सुरु होत नसे। एक ही पान-परागची आणि दुसरी विकोची 'कुदरत' वाली लांबलचक जाहिरात. त्यापैकी पान-परागचं 'लेकीन हम आपको एक बात कहना तो भूल ही गये' हे वाक्य आमच्या मित्रमंडळीत अजूनही वापरलं जातं.
दुसरी एक 'पान-पसंद' ची जाहिरात लागायची। छोटी आणि छान. पान-पसंद खाल्यावर माणसाचा मूड कसा बदलू शकतो ते अर्चना जोगळेकर मस्त दाखवायची, आधी रागात येऊन:
"शादी? और तुमसे? उफ़! (इथे ती सॉलिड नाक मुरडते ते शब्दांत लिहिणं कठीण आहे।) कभी नही!"
आणि मग पान-पसंद खाऊन ती तेच वाक्य लाडात म्हणते। :))
पान-पसंदचीच मला वाटतं भारती आचरेकरांचीही जाहिरात होती। त्याचे शब्द नेमके नीट आठवत नाहियेत. "मुझे गुस्सा मत दिलाओ...अपनी बीबीपर हुकुम चलाते हो?" असं काहिसं त्या प्रथम रागात आणि नंतर मऊपणे म्हणतात. :)
डाबरच्या जाहिरातीत अमिताभ असणं आता अपरिहार्य झालेलं असलं तरी त्यामुळे डाबरची पूर्वीची ही जाहिरात मी कधीच विसरु शकणार नाही। एक टिपीकल हिंदी मिडियम स्कूल आणि तीच खाकी कलरच्या गणवेशातली मुलं वगैरे. वर्गात फ़ळ्यावर मानवी दातांची आकृति काढली आहे.
मास्तरजी: बच्चोंSSS ये है हमारी दातों की बनावट। राजू! तुम्हारे दात तो मोतियों जैसे चमक रहे हैं...
(मास्तरांचे दात अतिशय वाईट आहेत)
राजू: क्यों ना हो मास्तरजी! मैं डाबर का लाल दंतमंजन जो इस्तमाल करता हूं।
हल्लीच्या कुठल्याश्या टूथपेस्टच्या जाहिरातीत प्रत्येकाची दातांची कवळी तोंड उघडल्यावर कॅमेर्याच्या फ़्लॅशसारखी चमकताना दाखवली आहे। अतिशयोक्ती हा जाहिरातविश्वाचा अविभाज्य भाग मानला तरी इतकी अतिशयोक्तीही खटकते, खरं तर हास्यास्पद वाटते. टूथपेस्टने टूथपेस्टचं काम करावं, बल्बचं नाही. म्हणून टूथपेस्टची जाहिरातही टूथपेस्टचीच वाटली पाहिजे आणि बल्बची जाहिरात बल्बचीच. बल्बवरुन आठवली जुनी ECE बल्बज आणि ट्युब्जची जाहिरात. एका गृहस्थाला बायको, शेजारीपाजारी सर्वजण ECE बल्ब आणण्याची पावलापावलावर आठवण करुन देतात.
"भूल न जाना
ECE बल्ब लाना
बाबाबा बल्ब...
ज्यादा दे उजाला
दिनोंदिन चलनेवाला
ECE bulb and ECE tube!
ECE बल्ब लाना
बाबाबा बल्ब...
ज्यादा दे उजाला
दिनोंदिन चलनेवाला
ECE bulb and ECE tube!
जावेद जाफ़रीच्या 'सिनकारा'ची जाहिरात 'ऑल टाईम फ़ेवरीट' प्रकारात मोडते। या जाहिरातीचे बोल आजही ऑफ़िसांमध्ये बोलले जातात यात शंका नाही.
"ये बेचारा
काम के बोझ का मारा
इन्हें चाहिये
हमदर्द का टॉनिक
सिनकारा"
काम के बोझ का मारा
इन्हें चाहिये
हमदर्द का टॉनिक
सिनकारा"
किंवा 'कोल्डरीन' ची जाहिरातही ऑफ़िसमध्ये एखाद्याला सतावायला उपयोगी अशीच होती। एखाद्याचे हाल कामामुळे (खरं तर बॉसमुळे) बेहाल झालेले दिसले की त्याच्याभोवती कोंडाळं करुन त्याला अजून त्रास द्यायचा.....
"ये क्या हाल बना रखा हैं"
"कुछ लेते क्यूं नही.."
मग शेवटी एकासुरात,
"कोल्डरीन ली?"
"कुछ लेते क्यूं नही.."
मग शेवटी एकासुरात,
"कोल्डरीन ली?"
जाहिरातींचा विषय 'निरमा'ची आठवण निघाल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही। सर्व वॉशिंग पावडरी, साबण बार यांची राणी म्हणजे निरमा. काळानुसार अवतीभवती कितीही बदल झाले तरी निरमाची फ़्रॉकातली मुलगी गोल फ़िरायची काही थांबली नाही. नाही म्हणायला निरमाच्या जाहिराती बदलत गेल्या पण निरमाचे "निरमा...निरमा, निरमा डिटर्जंट टिकिया, इसके झाग ने जादू कर दिया" हे बेसिक बोल विसरता येणार नाहीत. नंतरही दिपिकाची (म्हणजे रामायणातली सीता) 'निरमा सुपर' ची जाहिरात बर्यापैकी प्रसिद्ध झाली होती ज्यात दुकानदार तिला "मान गये" "किसे?" "आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोंको" अशी दाद देतो. साबणाचाच विषय निघालाय तर एक जाहिरात माझ्या डोक्यात फ़िक्स बसली आहे. पण ती रेडिओवर लागायची. मला वाटतं डबल बी किंवा अशाच काही नावाच्या साबणाची ती जाहिरात होती.
ये ढेर से कपडे मैं कैसे धोउं
अच्छा साबुन कौनसा लाऊ
कपडों को जो उजला बनायें
उम्र बढायें, चमक लायें
कोई बता दें, मुझकॊ कोई बतादें
अच्छा साबुन कौनसा लाऊ
कपडों को जो उजला बनायें
उम्र बढायें, चमक लायें
कोई बता दें, मुझकॊ कोई बतादें
दिवसातून एकदा तरी ह्या ओळी कानावरुन गेल्या नाहीत असं कधी झालं नाही। :)
खरंच तो काळ किती छान होता॥असं आता हजारदा वाटतं। निर्व्याज हास्याचा आणि निरागस बाल्याचा. संध्याकाळी खेळताना आवडत्या जाहिरातीचे सूर कानावर पडले की घरी धावत असू आम्ही. रविवार 'रंगोली' ने सुरु होऊन 'विक्रम वेताळ'सारख्या मालिकांनी अधिक रंगत जायचा. चिंता कधी केलीच तर दुसर्या दिवशी असणार्या शाळेची. त्यापलिकडे विश्वच कुठे होतं! टीव्हीचे हे दोनच चॅनेल्स आम्हांला पुरुन उरायचे. पण आता शंभर चॅनेल्सच्या गर्दीत हे दोन्ही हरवून गेलेत!!
पण अलिकडेच ऐकलं, 'व्योमकेश बक्षी' डीडी-१ वर परत सुरु केलंय म्हणे.......पहायला हवं....कदाचित त्याबरोबर जुन्या जाहिरातीसुद्धा लागतील।! :)
No comments:
Post a Comment