Friday, June 29, 2007








Wednesday, June 27, 2007

कॅपुचिनो आणि चॉक्लेट फ़ॅंटसी............

मी ५'९" आणि ६७ किलोचा धश्ट-पुष्ट मराठी मुलगा। ती ५'१०" सडपातऴ देखणी तमिऴ मुलगी. In short मी कुठल्याही सामान्य पुणेरी रस्त्यावर सापडणारा केर आणि ती म्हणजे पॅरिसच्या एखाद्या फ़ॅशन शो मधून अवतरलेली मॉडेलच जणू. तिच्या कडे एकदा पाहिलं की बघतच रहावसं वटतं. माझ्या कंपनीत ही एकच सुंदर मुलगी आहे असे वाटत नव्हते. पण कुठेही गेली तरी सर्व नजरा हिच्याच दिशेला निरखून बघत.
एक दिवस काही मित्रांनी rock concert ला जायचा बेत केला। आणि सोबत "मॉडेल" पण येणार होती…सोन्याहून पिवळं!! पण एकतर अनोळखी circumstances आणि त्याहून जास्तं माझ्या shy स्वभावामुळे माझी भलतीच त-त प-प झाली. तशी ती माझ्याच वयाची आणि थोडी फ़ॉर्वर्ड अस्ल्याने तिने मला बोलतं केलं. गप्पा रंगात आल्या…मला rock शो चा विसरच पडला. तिचंही स्टेजवर चालू असलेल्या घडामोडींकडे फ़ार लक्ष नव्हतं. चार-पाच bands ने उत्तम perform केल्याचे मला नंतर समजले. मी मात्र शो संप्ल्यावरही तिच्याशी बोल्ण्यात हरवलो होतो.
शो संपला होता। दुसरा दिवस उजाडला. पण मी तिच्याशी बोलायची आणखीन एखादी संधी मिळते का, याच्या शोधात होतो. आणि संधी देखील समोरून चालून आली. ती marketing डिव्हिजन मध्ये अस्ल्याने ती वेगळ्या सेक्शन मध्ये बसत असे. पण आज अचानक तिचं माझ्या बिल्डिंग मध्ये काम होतं. कुणाला तरी भेटायच्या निमित्ताने का होईना पण ही difficult to approach चीज आज आपल्याला भेटणार म्हणून मी आणखीनच सुखावलो. बराच वेळ अळम-टळम कॉन्वर्सेशन झाल्या नंतर मी तिला हळूच "would you like to have the rest of this talk over coffee?" असा मोजून-मापून प्रष्ण विचारला. तिने तिची ती captivating की कायसं म्हण्तात ती smile दिली आणि "sure, why not!" म्हणता म्हण्ता आपली फ़ाइल उचलली आणि आम्ही ऑफ़िस मधल्याच एका "कॉफ़ी डे" कडे चालू लागलो. मझ्या ह्या माफ़क फ़ॉर्वर्डपणाचा हिने वाईट अर्थ तर नसेल न घेतला? माझ्या पोटात जणू वादळ चक्रावत होतं.
तिथे पोहोचताच मी तिच्यासाठी बसायला म्हणून खुर्ची मागे खेचली तर ती खुद्कन हसलीच। "you are a courteous boy" म्हणून तिने पुन्हा ते स्मीत-हास्य दिलं. माझ्या पोटातलं वादळ आणखीन वेगाने सुरू होऊ पहात होतं. तित्क्यात एका वेटर ने आमच्या समोर मेनू ठेऊन "what would you like to have" असे विचारल्यावर माझं थोडं दुर्लक्ष झालं. तिच्या त्या कॉम्पिमेंट ने भान सावरायला थोडा वेळ लागला. त्या काळ्या युनिफ़ॉर्म मधल्या smart waiter कडे बघत मी ऑर्डर दिली.
टू कॅपुचिनोज ऍन्ड वन चॉक्लेट फ़ॅंटसी…

जयोऽस्तु ते.........


जयोऽस्तु ते! जयोऽस्तु ते!
श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुतां वंदे!
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्यही तूची
स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहम् यशोयुतां वंदे!
मोक्ष-मुक्ती ही तुझीच रूपे तूलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहम् यशोयुतां वंदे!

-विनायक दामोदर सावरकर

My Favorite Song


powered by ODEO

Tuesday, June 26, 2007

गोष्ट एका प्रेमाची............

रात्रीचे ९ वाजले तरी स्वाती अजून ऑफिसमध्येच होती. एक काम केव्हापासून संपवायचे होते पण कितीही प्रयत्न केले तरी तिला प्रोग्रॅममधल्या चुका मिळत नव्हत्या. बरं ती सीनियर म्हणून ही असली किचकट कामे तिच्याकडेच यायची. नेहमीप्रमाणे त्यांच्या मॅनेजरने तिला गोड बोलून ते काम करायला पटवलंच होतं. रिलीज कर म्हटलं प्रोजेक्टमधून की कसा टाळतो....च्यामारी... ! तिने त्याला शिव्या देत अजून एकदा घड्याळाकडे बघितलं आणि परत डोकं स्क्रीनमध्ये खुपसलं. पण सकाळी ९ वाजल्यापासून चाललेलं तिचं डोकं आता काही साथ देईना.शेवटचा उपाय म्हणून ती चहा घेऊन आली. आज तिला सगळ्य़ांच गोष्टींची चीड येत होती, त्यात असला पाणचट मशीनचा चहा. चहा घेऊन जागेवर परत येताना तिला त्यांच्या टीममधला नवीन मेंबर अजूनही जागेवर बसलेला दिसला. काहीतरी वाचत बसला होता. त्याने तिला स्माईल दिलं आणि परत वाचायला लागला, तिच्या ओठांवर मात्र हसू येणं अवघडच होतं.तिने मनातल्या मनात म्हटलंही, 'यालाच द्याना काम, अशीही त्याला उशीरापर्यंत बसायची हौस दिसतेय'.
ती खडाखडा काहीतरी टाईप करत असताना तिला मागून आवाज आला,"लाइन २२० मधला सिंटॅक्स चुकलाय"।


तिने दचकून मान वर करून पाहिलं, तोच तो नवीन पोरगा होता। त्याने अगदी आत्मविश्वासाने सांगितलं आणि काहीशा कुत्सितपणेही की 'असली फालतू चूक कळत नाही का' अशा आविर्भावाने. तिने पाहिलं तर खरंच २२० लाइनवर चूक होती. पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काही तिला आवडले नाहीत. 'तू बैस बारा तास काम करत म्हणजे कळेल डोक्याचा कसा भुगा होतो', असं मनातल्या मनात म्हणत तिने दुरुस्ती केली. मग त्याने तिची परवानगी घेऊन थोडेफार बदल करत प्रोग्रॅम चालू करून दिला. :-) चला कसं का होईना आपलं काम तर झालं ना म्हणून ती खूश झाली. तिने थॅंक्स म्हणण्यासाठी हात पुढे केला पण तिला त्याचं नावंच आठवेना......'हृषि'..... त्यानेच हसत सांगितलं. त्यानेच तिला विचारलं 'तुमचं जेवण नाही झालंय ना अजून?' मग ते दोघेही सोबतच खाली उतरले.जेवण झाल्यावर स्वातीला रिक्षा मिळेपर्यंत तो तिच्यासोबत चालतही राहिला. स्वातीला घरी परतताना जरासं बरं वाटलं.

महिन्याभरात बरेचदा असं झालं।स्वातीला उशीर झाला की हृषि यायचाच तिच्यासोबत बसायला, बोलायला, जेवण करून मग घरी सोडायला.ते दोघं वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहायचे, तासनतास. कधी गाण्य़ांबद्दल, कामाबद्दल, घरच्यांबद्दल.....कधी स्वाती त्याला कामाबद्दल सल्ले देत असे तर कधी तो तिला नवीन टेक्नॉलॉजीवर सांगायचा. तिला त्याच्या बोलण्यात एक उत्साह जाणवायचा आणि तितकाच त्याचा निरागसपणाही. त्याचं मनमोकळं हसणं तिला आठवतं राहायचं तो नसतानाही. त्याचबरोबर तिला तो जरा आकडूही वाटायचा तर कधी तो त्याच्या बालिशपणाच तर नाही ना असं वाटून ती सोडूनही द्यायची. एकूण काय, तर तिला तो एक मित्र म्हणून फारच जवळचा वाटू लागला होता.

एरवी मात्र त्यांचं फारसं बोलणं व्हायचं नाही. तो त्याच्या मित्रांसोबत तर ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत असायचे. कारणही तसंच होतं म्हणा. ती त्याच्याहून तीनेक वर्षांनी मोठी, त्यामुळे ती तिच्या आतापर्यंतच्या ग्रुपबरोबर तर तो त्याच्या.दुपारी आपापल्या ग्रुपमध्ये बसून जेवताना त्यांची नजरानजर मात्र व्हायची, तीच काय ती दिवसभराची त्यांची ओळख. तसा स्वातीच्या वाढदिवशी त्यांनी प्रयत्न केला होता तिच्या मित्र-मैत्रिणीत सामावण्याचा पण ते फारच विचित्र वाटत होतं. तो सर्वांसोवत बसल्यावर त्यांना जाणवलं की तो बाकी लोकांपेक्षा किती वेगळा आहे ते. पण माणूस एकदा प्रेमात पडायला लागला की नजर अजूनच भिरभिरी होते, एकमेकांचा शोध घ्यायला आतूर होते. मग नेहमीच्या वेळा सोडूनही ते भेटू लागले, कारणं काढून रात्री उशीरापर्यंत थांबू लागले.
स्वातीने नम्रताला, तिच्या जवळच्या मैत्रिणीला सांगितलं होतं त्याच्याबद्दल।स्वाती त्याच्याबद्दल बोलताना एकदम उत्साहात असायची. पण नम्रताने तिला बरेचदा त्यांच्या वयाबद्दल आठवण करून दिली होती. स्वातीला आधी जरा दु:ख व्हायचं, पुढे काय करावं याचा विचार करत बसायची. त्याच्यासोबत असताना मात्र ती हे सर्व विसरून जायची. नंतर नंतर तिने त्याबद्दल विचार करणंच सोडून दिलं होतं. कविता करणं, फुले देणं यासारख्या कॉलेजमधल्या प्रेमाच्या कौतुकाच्या गोष्टी तो तिच्यासाठी करताना पाहून तिला हसू यायचं, तसंच त्याच्याबद्दल प्रेमही वाटायचं. तिला सगळ्यात जास्त हसू यायचं ते त्याच्या एका गोष्टीवर. स्वाती तशी खूप वर्षे बाहेर राहिलेली त्यामुळे बरीच धीट झालेली होती. त्याला मात्र तिला प्रत्येक ठिकाणी जपायचं असायचं. एकदा दोनदा तिने प्रयत्न केला समजावण्य़ाचा, तेव्हा त्याचा हिरमुसला चेहरा पाहून पुढे तिने ते बोलणं टाळलेलंच.


त्यांचं प्रेम असं फुलताना २-३ महीने उलटले असतील। लोकांनीही आता त्यांच्याबद्दल बोलणं सोडून दिलं होतं. त्यांना काय बातमी जुनी झाली की नवीन बातमीच्या शोधात. असो. एकदा स्वाती सकाळी आली तशी गप्प गप्पच होती. तिच्या मैत्रिणीने विचारलेही की काय झाले म्हणून, पण स्वातीला माहीत होतं की तिने काही सांगितलं तर नेहमीप्रमाणे भाषण ऎकून घ्यावे लागेल. आज सकाळपासून हृषिही कुठे दिसला नव्हता. दुपारपर्यंत तिने प्रयत्न केला न बोलण्याचा, अगदीच राहवेना तेव्हा स्वातीने नम्रताकडे विषय काढला. "काल असंच माझं आणि हृषिचं बोलणं चाललं होतं पैशांच्या गुंतवणुकीबद्दल. बरेच दिवस झाले मी काही पैसे गुंतवायचा विचार करतेय. म्हटलं नक्की करायच्या त्याच्याशी बोलून घ्यावं. मी काही बोलायला लागले तर तो 'तुला काय कळतंय' असं काहीसं म्हणाला. मग मी ही चिडले आणि म्हटलं की याआधी माझं मीच करत होते सर्व ना? मुलगी असले म्हणून काय झालं मलाही वाचता येतं, विचार करता येतो आणि निर्णय घेता येतो. मग काय साहेबांना आला राग. हा मोठ्ठा फुगा फुगलाय. रात्रीपासून फोनच नाही उचलला. म्हटलं सकाळी भेटून निवांत बोलता येईल, तर आलाच नाहीये आज. मला उगाचच त्याच्यावर चिडले असं वाटतंय म्हणून सकाळपासून अस्वस्थ होते".

एव्हढं सगळं बोलल्यावर काय नम्रताने नेहमीचा पावित्रा घेतला. "हे बघ स्वाती आता मी बोलले की तुला राग येतो नाहीतर मग तू लक्षंच देत नाहीस. अगं तुमच्या दोघांत हे वयाचं अंतर आहे म्हणून तर होतं हे सर्व. आता बघ, पूर्वीपासून मुलींचं लग्न त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलाशी करतात याचं काहीतरी कारण असेल ना.आता तो तुझ्यापेक्षा लहान आहे त्यामुळे तुझा अनुभव त्याच्यापेक्षा जास्त आहे तसेच तुझ्यात जास्त प्रगल्भताही आहे. याच जागी कुणी तुझ्याहून मोठा मुलगा असता तर कदाचित तू त्याचं ऎकलंही असतंस कारण त्याचा अनुभव तुझ्यापेक्षा जास्त असता आणि मग तुमचे वादही कमी झाले असते. मुख्य म्हणजे नवरा हा मोठा असल्यावर जसा त्याचा मान असतो तसा लहान असल्यावर राहील का? तसं पाहिलं तर मला हृषि अजूनही बालिश वाटतो. त्याचं वागणं,बोलणं,सर्वच. म्हणतात ना मुलगी ही वेलीसारखी असते, तिला एका भरभक्कम झाडाचा, खांद्याचाच आधार हवा आयुष्य काढायला. बघ अजूनही विचार कर. ही तर सुरुवात आहे, नंतर तुम्हालाच त्रास होईल".
कधी ना कधी बोलणं गरजेचं होतं त्यामुळे स्वातीने आज नम्रताला समजावलं," मला मान्य आहे गं की तो माझ्यापेक्षा लहान आहे, पण किती थोडासाच ना? आज २४ चा आहे कधी ना कधी तरी तो ३० चा होईलच ना? कधी ना कधी त्यालाही असेच अनुभव येतंच राहतील ना, तो ही हळूहळू शिकेल ना सर्व आपल्यासारखंच? आयुष्यभर तरी तो लहान राहणार नाहीये ना? अगं मी माझ्या बाबांनाही विक्षिप्त वागलेलं पाहिलंय, एकेकाचा स्वभावधर्मच तो, कोण बदलणार तो? आता बाकी लोकांची जी लग्न होतात त्यांत काय भांडणं होत नाहीत? महत्चाचं काय असतं शेवटी, एकमेकांवरचं प्रेम आणि त्यातून एकमेकांना समजून घेण्याची इच्छा।जर तुम्हाला एकमेकांबद्दल, आपल्या मतांबद्दल, भावनांबद्दल आदर असेल तर मानापमानाचा मुद्दा येतोच कुठे. नवऱ्याच्या पाया पडलं म्हणून त्याला मान दिला एव्हढीच का व्याख्या त्याची? मला नाही वाटत असं. आणि समज तरीही तो माझ्याहून लहान राहिला आयुष्यभर तरी मी त्याचं झाड व्हायला तयार आहे. आहे तशी खंबीर मी. आता एव्हढं तर तू तुझ्या मैत्रिणीला ओळखतेस ना? मग?" नम्रता नुसतीच हसली.


"बाकी राहता राहिली त्या गुंतवणुकीची गोष्ट. अगं हे पुरुष सगळे असेच आखडू तसेच काहीसे निरागसही. त्यांना वाटतं पैशाच्या व्यवहारात सगळं त्यांनाच कळतं. हे कळत नाही की वर्षानुवर्षे मिळेल त्या पैशात घर चालवण्याचं काम स्त्रीच करते. त्यांना जरासं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की आपलं काम झालं. किती मोठा असो की लहान, जरा भाव दिला की लहान मुलासारखे खूश होतात.मला तरी त्यात काही मोठा प्रॉब्लेम वाटत नाहीये. आज बघ तो आल्यावर. ":-)
दुपारी उशीरा आल्यावर रागारागाने काम करणाऱ्या हृषिला स्वातीने कसं पटवलं हे सांगायला नकॊ. स्वातीने गुंतवणूक, शेअर मार्केट यातलं आपलं अज्ञान पाजळलं होतं आणि माफीही मागितली होती. तो आज तिच्यासोबत बॅंकेत जाणार होता, तिची मदत करायला.

तुझ्यासोबत............


कधीतरी पहाटे एखाद्या भयानक
स्वप्नातून जाग यावी, आणि दचकून
उठताना तुझी मिठी अजूनच घट्ट व्हावी,
यासारखं सुख ते काय?
कधीतरी भांडताना
एखादी गोष्ट तू
नकळत बोलून द्यावी,
आणि ती छॊटीशी जखम
दिवसभर छळत रहावी,
यासारखं दु:ख ते काय?
कधीतरी रविवारी
सगळं घर पसरलेलं,
आणि दुपार नुसतं पडून
आळसात घालवावी,
यासारखी मजा ती काय?
कधीतरी रडताना
तू एखादं वाक्य टाकावं,
आणि मी रडता रडता हसले
की पटकन कवेत घ्यावं,
यासारखा आधार तो काय?
कधीतरी लढताना
सगळे माझ्या विरुद्ध,
आणि तुझ्याकडे
आशेने पाहिल्यावर
एका नजरेतंच समर्थन मिळावं,
यासारखं बळ ते काय?
कधीतरी चुकताना
मला तू वेळोवेळी बजावावं,
आणि तू सांगूनही मी चुकल्यावर
पुन्हा एकदा समजून सांगावं,
यासारखं प्रेम ते काय?
कधीतरी हसताना तुझ्या डोळ्यांत पहावं,
आणि आजपर्यंतच्या सर्व कष्टांचं
सार्थक झालं असं वाटावं,
यासारखं समाधान ते काय?
कधीतरी जगताना जुन्या आठवणींना जागवावं,
आणि जे हवं ते सर्व तू दिलंस
असं म्हणता यावं, यासारखं आयुष्य ते काय?

’फ़क्त तुझ्यासाठीच’ माझी ’ही’ कविता....

तुझ्या आठवणीच्या पावसात
भिजणारी ही कविता
तुझ्या डोळ्यात बरसलेली
ही कविता,
अश्रुंच्या शब्दात भिजलेली
ही कविता।
राहुन राहुन डोळ्यांच्या
कडातुन ओघळण्यास बैचैन
ही कविता,
मोहक डोळ्यांच्या रगांत
रंगलेली ही कविता।
तुझ्या पापण्यांच्या
सावलीतुन पुढे सरकणारी
ही कविता,
तुझ्या आठवणींचे थेंब
डोळयातुन बरसवणारी ही
कविता
तु दिलेल्या वेदना हसत
मुखाने झेलणारी ही कविता
वेदनेच्या डोहात खोलवर
बुडणारी ही कविता,
बघा जरा काय सांगु पाहते
ही कविता।
मनातल्या सा-या वेदना
सांगु पाहणारी ही कविता,
तुझ्या आठवनीची जाणीव
करणारी ही कविता
जिंकल्यावरही ’फ़क्त
तुझ्यासाठीच’ हरणारी ही कविता
तुझ्यासाठी आता शेवटचं
रडणारी ही कविता.......

पोचुनी दारी तुझ्या................


पोचुनी दारी तुझ्या मी

परत जायचे

मी असे आता कितीदा

करत जायचे?

रेखतो चित्रे अनोखी तो

सभोवती

त्यांत केवळ रंग आपण

भरत जायचे...

किर्र काळोखात बुडल्या

दशदिशा, तरी

स्वप्न किरणांची उराशी

धरत जायचे!

शुष्क पर्णासारखा गेलो

गळून; पण

सांग कुठवर जीवनी मी

तरत जायचे?

रोज मृत्यूच्या दिशेने

वाटचाल; पण

हसत-खेळत रोज थोडे

मरत जायचे

जीवनाने, अनुभवाने

शिकवले, तरी

गुरुजनांचे शिकवणेही

स्मरत जायचे!

Monday, June 25, 2007

वर्षासहल : वॉलरीना रेझ्रोट, लोणावला


काहीक्षण मुंबई-पुणे महामार्गावरील.....

Thursday, June 21, 2007

तशी ती..............


तशी ती देखणी
गुलाबाची कळी
मनाने मात्र ह्ळवी
जाई-जुइची वेली
तशी ती हट्टीच
आंबट आंबट कैरी
राग तर तिच्या नाकावर
लाल लाल चेरी
तिचं हसणंच असतं
तिच असणं
तिचं रुसणं तर
बापरे!
ती अबोलीच असते
सदाफुलेली
तशी ती देखणी
गुलाबाची कळी
मनमंदीरातली
सुगंधी अगरबत्ती

मैत्री..............

अमित आणि अरविन्द, बालपणा पासुनचे जीवश्च कंठ्श्च मित्र। शालेय शिक्षण जसे एकत्र एकाच बाकावर बसून तसेच पुढे महाविद्यालयीन शिक्षणही एकत्र. कोणाचीही दृष्ट लागावी अशी अतूट निरपेक्ष मैत्री. दोघांचीही शिक्षण संपल्यावर देशसेवेसाठी लष्करात भरती होण्याची महत्त्वाकांक्षा. बुद्धिमत्ता आणी शरीरयष्टीच्या बळावर दोघेही लष्करात भरती होतात.
योगायोगाने लष्कराच्या एकाच तुकडी मध्ये दोघानंही प्रवेश मिळतो। दिवसागणीक मैत्री अधिक दृढ होत चाललेली असते. अशापरिस्थित देशावर अरिष्ट येऊन युद्धाचे ढग जमा होऊ लागतात आणी कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण होते.
दोन्हिदेशामधे चाललेल्या वाटाघाटी फ़िसकटत जाऊन अखेर शेजारी राष्ट्राशी घमासान युद्ध सुरू होते। अमित आणि अरविंद एकाच तुकडीमध्ये असल्याने युध्धभुमिवरही एकाच आघाडीवर नियुक्ति होते. दोन्हिबाजुने रोजची तुफान धुमश्चक्रि चालू असते. अश्यांतच तो दिवस उजाडतो...
अमित अरविंद ची तुकडी शत्रूने काबीज केलेला एक एक प्रांत प्रसंगी रक्ताचे पाट वाहवून आपल्या मातृभूमीकडे सुपूर्त करत जिगरबाजणे पुढे निघालेली असते। अचानक एकाठिकाणी शत्रूचा अंदाज काढणे कठिण होऊन बसते. दोन्हीकडून गोळीबार चालू असतो. शत्रूचा अचूक ठावठिकाणा काढणे अवघड होऊन बसते. कोणीतरी धाडसाने पुढे घुसणे हाच पर्याय उरतो. अमित क्षणाचाही विलंब न करत एकटे पुढे घुसण्याची वरिष्ठ अधिकाऱ्यास विनंती करतो. धोका जीव गमावण्याचा असल्याने वरिष्ठ आधीकारी परवानगी देण्यास साशंक असतात. अखेर अमितच्या जिद्दी स्वभावापुढे माघार घेऊन त्याला परवानगी देतात.
पूर्णं तुकडी अमितकडे श्वास रोखून पाहतं असते। अमित एक एक पाऊल सावधपणे उचलून शत्रूच्या दिशेने कुच करू लागतो. जेम तेम दहा वीस फूट अंतर चालून जातो आणी कुठुनशि एक बंदुकीची गोळी सुं...करत अचानक येते आणी अमितच्या मस्तकाचा अचूक वेध घेते. त्याच्या वाटचालीवर लक्ष ठेवून असणारी त्याची तुकडी क्षणभर स्तब्ध होऊन जाते. अरविंदच्या तर काळजाचा ठोका चुकतो. आपला जीवाभावाचा मित्र आपल्या समोर कोसळलेला पाहून त्याचा धीर खचू लागतो.
अमित जमीनीवर कोसळून, क्षिण आवाजात त्याला हाक मारत असतो। आतामात्र त्याला राहवत नाही धावत जाऊन अमितला भेटण्यासाठी अरविंदचे मन आतुर होते. तो त्याच्याकडे धाव घेणार इतक्यात वरिष्ठ त्याला अडवतात. "गोळी मस्तकात लागली आहे, जीव वाचण्याची तीळमात्र शक्यता नाही.मी आत्ताच एक आधीकारी गमावला आहे मला अजून एका अधिकाऱ्याचा जीव पणास लावायचा नाही आहे!" वरिष्ठांचे तर्कास पटणारे परंतु मनास न पटणारे उत्तर.
अरविंदची प्रचंड द्विधा मनस्थिती। एकीकडे वरिष्ठांचा ठाम नकार, तर दुसरीकडे मित्राची क्षिण होत चाललेली हाक. मन सून्न होऊन जाते, मेंदू बधिर होऊन जातो आणी अचानक निर्णय घेतो, बस्स!! मला त्याच्या हाकेला प्रतिसाद दिलाच पाहिजे. प्राणाची आणी वरिष्ठांची पर्वा न करता तो अमितच्या दिशेने झेपावतो. अमितजणु त्याची वाटच पाहतं असल्याप्रमाणे त्यांला भेटताच दोन शब्द बोलून जगाचा निरोप घेतो. अरविंद विमनस्कपणे माघारी फिरतो.
वरिष्ठ त्याच्या ह्या कृतीचा जाब विचारतात, "मी आधीच कल्पना दिली होती, तो वाचणे अशक्य होते। विनाकारण तु तूझा जीव का धोक्यात घातलास?"
"त्याचे शेवटचे शब्द माझी भेट सार्थक ठरवून गेले।" अरविंद
"असे काय म्हणाला तो?" वरिष्ठ
तो फक्त एवढेच म्हणाला,
"अरविंद, मला खात्री होती तू येणार!!"

जादू............


कधी आपण
उदास असतो
चेहरा रडका
भकास असतो

तेव्हढ्यात नेमका
मित्र येतो
आपल्याला काय
झाले पुसतो

आपण आपले
गप्प बसतो
आपण सांगायला
तयार नसतो

पण मित्र
हुशार असतो
त्याला आपला
गोंधळ दिसतो
तो गालातल्या
गालात हसतो

मग म्हणतो;
मला नाही सांगणार?
माझ्याशी
परक्या सारखं वागणार?

मग काय?
आभाळ भरून येतं..
डोळ्यांवरचा
बांध तुटतो
संकोचाचा
अंधार फिटतो
आपण सगळं
सांगत सुटतो

शव्द ओले
ओले असतात
हृदयातुन
आलेले असतात

जादू त्याच्या
शव्दात असते
हळुच निराशा
खुदकन हसते

क्षणात सगळे
चित्र बदलते
जसे काही
झालेच नव्हते

मन हलकं
हलकं होतं
गिरक्या घेतं
गाऊ लागतं

जसं काही
झालंच नव्हतं

यातली गम्मत
कळण्यासाठी
अशी मैत्री
व्हावी लागते

आणि मित्र
मिळण्यासाठी
जरा वाट
पहावी लागते

मैत्री व्हायला
काळवेळ नसते
मैत्री योगायोगाचा
खेळ असते.

आणि मुक्या ढाल जिंकतो............

मुक्या नेहमीप्रमाणे त्याच्या दोस्तांसोबत खेळत होता। धुळीने अंग माखून निघाले होते. तिकडून आईच्या हाका सुरू होत्या. संध्याकाळचा काळोख पडायच्या आत खेळ संपवून निघायचे होते. अंगणात शेजारच्या कंपाउंडर काकाच्या रेडिओवर हिंदी बातम्या चालल्या होत्या. नाना-मुकादम त्यांच्याकडे आलेला होता. पायरीच्या एका कोपऱ्यावर बसून डाव्या हातातली तंबाखू उजव्या हाताच्या अंगठ्याने मळत समोरच्या कडुनिंबाच्या उंच शेंड्याला न्याहाळत किलकिले डोळे करून कान रेडिओकडे रोखून धरत खरखरणाऱ्या रेडिओतून आलेले सगळे समजत आहे अशा अविर्भावात नाना काकांच्या हो ला हो मिसळत होता. काकांनी टाळ्या पिटल्या तशा नाना सुद्धा वाहवा करत टाळ्या पिटू लागला. मुक्याला पण काहीतरी विशेष घडले आहे असे वाटले व त्याने कुतूहलाने काकांना विचारले,"काय झाले आहे हो काका?"
काका मात्र त्या कार्ट्याला हातानेच शांत राहण्याचा इशारा करून पुन्हा बातम्यांत मग्न झाले। नानाला पृच्छा करण्यात काही अर्थ नाही कारण त्यांना हिंदी समजत नाही हे त्याला ठाऊक होते. तरी पण उगीच ताटकळत उभा राहण्यापेक्षा प्रयत्न केलेले बरे म्हणून मुक्याने नानाला विचारले,"नाना, तुम्ही तरी सांगा काय बातमी आहे ते?"
"तुला रं काय काय करायचंय? जा तिकडं तुझी माय हाका मारायतीय तुला।"
"नाना, बातमी काय आहे ते कळले नाही असं म्हणा ना सरळ," बेरक्या मुक्याने नानांच्या मर्मावर घाव घातला तसा नानांचा चेहरा पडला व काकांना खुदकन हसू आले।
"नाना सांगा ना त्याला की आपल्या पी। टी. उषाने सुवर्णपदक जिंकले म्हणून", शेवटी काकांनी नानाला आधार दिला.
"हे सुवर्णपदक काय असते?" पुन्हा मुक्या उत्तरासाठी उतावीळ झाला।
"आपल्या गावच्या जत्रात रामू पहिलवानाला कुस्तीत ढाल मिळाली ना तशीच मिळाली हीला," नानांनी पुन्हा आपली अक्कल पाजळवली होती व काका पुन्हा बातम्यांत हरवले होते।
मुक्या घरी आला खरा पण त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते। काकांना या उषाच्या विजयात येवढा आनंद का झाले असेल बुवा? कदाचित त्यांच्या नात्या-गोत्यातली असेल ती. पण तिला रामू पहेलवानासारखी ढाल कशी बरे मिळाली असेल? छे, ती कुस्ती नसेल खेळली, काही तरी दुसरा खेळ असेल. पण काका तर सुवर्ण पदक म्हणाले? खरेच सोन्याचे ताट असेल का ते? काका शहरात राहिलेले एकमेव जाणकार आहेत. त्यांना सगळे माहित असते. पण ते आपल्याला सरळ उत्तर देतील याचा भरोसा नाही... जर ते सोन्याचेच ताट असेल तर ती स्वतः जेवणार का त्यात, कथेतल्या राजकन्येसारखी? का आई-वडिलांना जेवायला देणार ते ताट? जर ती एकटीच त्या ताटात जेवली तर तिचे बहीण भाऊ नाही का भांडणार तिला? अशा कितीतरी विचारात असताना छपराकडे बघत-बघत मुक्याला झोप लागली होती.
गुरुजींनी फळ्यावर लिहून दिलेला उतारा सर्वांनी लिहून घेतला तसा मुक्याने पण घेतला होता। गुरुजी म्हणाले, "परवा आपल्या वर्गात मी उत्कृष्ट वाचन स्पर्धा घेणार आहे. या स्पर्धेत हा उतारा सर्वांनी वाचून दाखवायचा आहे. जो कोणी हा उतारा न अडखळता स्पष्ट व शुद्ध वाचून दाखवील त्याला आपल्या केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस मिळणार आहे. बक्षिसाच्या खर्चासाठी सर्वांनी उद्या चार-चार आणे घेऊन यायचे आहेत."
"गुरुजी, बक्षीस काय असणार आहे?" मुक्याने न राहवून विचारले।
"ते बक्षीस देतानाच कळेल," गुरुजींनी मुक्याच्या उत्कंठतेत भर घातली होती।
सगळी मुले स्पर्धेच्या तयारीला लागली। बिचारा मुक्या मात्र डोळे आल्यामुळे वाचू शकत नव्हता. कसेतरी बाहेर पाहू शकत होता तेही मोठ्या मुश्कीलीने. गुरुजींनी आज त्याला मागे कोपऱ्यात बसायला सांगितले होते व कोणीही त्याच्या जवळ जायचे नाही असे बजावले होते. मधल्या सुट्टीत त्याने गुरुजींच्या वायरच्या पिशवीत हळूच डोकावून पाहिले होते. त्यात जेवणाचा डबा, मोठा पांढरा रुमाल आणि काहीतरी होते.
"सुवर्णपदक असेल का? का छोटी ढालच असेल?" मुक्या अंदाज बांधायचा प्रयत्न करत होता।
स्पर्धा सुरू झाली। सगळी मुले धडाधड जाऊन वाचून येऊ लागली. शेवटी गुरुजींनी मुक्याला बोलावले. मोठ्या कष्टाने डोळे चोळत मुक्या गेला व डोळ्यांची पर्वा न करता उतारा वाचून आला, अगदी सहजतेने. केंद्रावरून आलेल्या हजारे गुरुजींनी बक्षीस जाहीर केले. मुक्याचे नाव घेताच मुक्याला कोण आनंद झाला. बक्षीस घ्यायला जाताना सगळ्या वर्गाने टाळ्या पिटल्या होत्या. पण बक्षीस मिळाल्यावर मात्र मुक्याचा भ्रमनिरास झाला. फक्त पेन होता तो. शाळा सुटल्यावर शहरातून आणलेला भारीचा पेन पाहण्यात त्याच्या मित्रांनी धन्यता मानली होती तरी मुक्या मात्र संतुष्ट नव्हता.
पुढे मुक्याचे ते गुरुजी बदलून जाऊन नवीन गुरुजी आले। या नव्या गुरुजींना शाळेत रस जरा कमीच असे. त्यामुळे नंतर त्यांच्या गावच्या त्या शाळेत स्पर्धा वगैरे काही झाले नाही. मुक्या मात्र नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा पहिल्या नंबरात पास झाला. आता पुढच्या वर्गासाठी मुक्याच्या दाद्याने त्याला शहरातल्या शाळेत घालायचे ठरवले. त्याचा दाद्या शहरातच कामाला असायचा.
मुक्याला घेऊन दाद्या शहरातल्या शाळेत गेला। मुख्याध्यापकांनी त्याची गुणपत्रिका न्याहाळत मुक्याला काही प्रश्न विचारले. महाराष्ट्राची व भारताची राजधानी तसेच जगातला सगळ्यात मोठा देश विचारून झाल्यावर काही भागाकार-गुणाकाराची गणिते करून झाली. एक ओळ लिहायला लावून वाचून घेण्यात आली व मुख्याध्यापक दाद्याकडे वळले.
"पोरगा हुशार आहे। त्याला विशेष तुकडीत टाकू या. या वर्गात टाकल्यावर संस्कृत शिकायला मिळेल तसेच हा मेरिटच्या अपेक्षित विद्यार्थ्यांचा वर्ग असल्याने शाळा सुटल्यावर सुद्धा क्लास घेतले जातील. तुम्हाला खेड्यातून ये-जा करून जमणार नाही. याला इथेच ठेवावे लागेल. तसेच शाळेचा गणवेश व पायात चप्पल असणे आवश्यक आहे," त्यांनी मुक्याच्या अनवाणी पायाकडे इशारा करत सुचवले. तसा दाद्यानेही होकार दिला. मुक्यालाही आनंद झाला. शाळे बद्दलचे अनेक विचार, अनेक स्वप्ने पाहत मुक्या घरी आला. मोठ्या शाळेत शिकायला मिळणार. या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा होत असतील, त्यात भाग घ्यायला मिळणार म्हणजेच ढाल जिंकायची संधी! मुक्या मनातच हुरळून गेला.
खेडवळ दिसणाऱ्या मुक्याला सुरुवातीला जेमतेमच मित्र होते। पण त्याच्या खेळीमेळीच्या स्वभावामुळे व हुशारीला पाहून गावातल्या एवढे नसले तरी त्याला बरेच मित्र मिळू लागले.
मुक्याच्या अपेक्षेप्रमाणे या शाळेत स्पर्धा होत असत। पण अजून ढाल तर सोडाच शाळेतल्या निवड फेऱ्यांतच तो बाद होत होता. खेडवळ उच्चार आहेत म्हणून वक्तृत्व स्पर्धेतून बाद, सुभाषिते/श्लोक वापरता येत नाहीत म्हणून निबंधात बाद, समान उंचीत अक्षरे येत नाहीत म्हणून हस्ताक्षरातून बाद... बाद, बाद, बाद... इथली मुले घरीच सुभाषिते शिकून येत. मुक्याच्या तर बालाही सुभाषिते येत नव्हती. गावात याच्या बोलण्याचे कौतुक व्हायचे. तसेच याच्या पेक्षा सुंदर अक्षर याच्या गुरुजींचे सुद्धा नव्हते हे त्यांनीच कित्येकदा कबूल केलेले. गावातल्या शाळेत असताना कोणत्याही स्पर्धेत निर्विवाद पहिला असणारा मुक्या मागे पडत असल्यामुळे कधीकधी खचून जायचा. पण पुन्हा त्याला आठवायचा त्याचा दाद्या. गरीब असला तरी वरच्या जातीतला असल्याने मुक्याला वसतिगृहाने प्रवेश नाकारला तेव्हा तो दाद्यासोबतच राहायला गेला होता. मुक्याला अभ्यासात व्यत्यय नको म्हणून दाद्याने कामावरल्या आपल्या सहकाऱ्यांना सोडचिठ्ठी देऊन परवडत नसताना सुद्धा स्वतंत्र खोली केली होती. गावी मुक्याच्या घरातल्या एका खोलीत राहणाऱ्या कंपाउंडर काकांचे वर्षात होत नसेल येवढे भाडे मुक्याच्या दाद्याला शहरात एका महिन्यात द्यावे लागायचे. बाकीचेही खर्च खूपच होते. तरीही दाद्या याला शिकवायचेच यावर ठाम असे.
आता मुक्याला ढाल व पदकातला फरक समजू लागला होता। त्याने मित्राच्या घरी टीव्हीवर व पेपरात ढाल-पदके मिळवणारे अनेक खेळाडू पाहिले होते. त्यासाठी काय करावे लागते हे सुद्धा माहित झाले होते. खेळात त्याची शाळा मागे होती. त्यांच्या शाळेत मैदानी खेळांच्या स्पर्धेत उतरून तयारी करण्यासाठी मैदान व साहित्य नव्हते. व ते असणाऱ्या महागड्या शाळा मुक्याच्या नव्हे पण त्याच्या दाद्याच्या आवाक्याच्या बाहेर होत्या. पण एके दिवशी त्याला आशेचा किरण दिसला. त्यांच्या शाळेत जिल्हा स्तरीय अडथळ्यांच्या स्पर्धेची सूचना फिरवली गेली. मुक्याने लगेचच संबंधित शिक्षकांशी संपर्क साधला. त्या मराठीच्या शिक्षकांनी त्यांना होती तेवढी माहिती दिली.
"मुक्या आज बोलत का नाहीस रं?" दाद्याने रात्री झोपताना मुक्याला विचारले।
"दाद्या, मला बूट पाहिजेत। पळायची स्पर्धा आहे."
"किती लागतील?"
"माझ्या मित्राने स्वस्तातल्या कंपनीचे घेतले दोनशे रुपये मोजून। पण बिनाकंपनीचे घेतले तर ६० रुपयाला मिळतात. मी बघून आलो सुभाष रोडला आज."
आणि दोघेही डोळे बंद करून झोपल्याचे नाटक करता करता झोपून गेले होते।
दुसऱ्या दिवशी मुक्या संध्याकाळी खोलीवर आला तर त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता। दाद्या त्याच्यासाठी ते जोडे (शूज) घेऊन आला होता.
स्पर्धेचा रविवार उजाडला। सूचने प्रमाणे मुक्या सकाळी सहालाच जिल्हा परिषद मैदानात पोचला. प्रसन्न वातावरणात श्वान-वराहांच्या व्यतिरिक्त कोणीही इतर प्राणी हजर नव्हते. "हुशारांच्या" वर्गातला असल्याने त्याचा कोणी वर्गमित्र येणे अपेक्षित नव्हतेच. थोड्या वेळाने त्याच्या शाळेतले इतर काही मुले हजर झाली होती. स्पर्धा सातला सुरू होणार होती. पण आठ वाजेपर्यंत कोणीही मैदानावर न फिरकल्याने यांना परत जावे लागले होते. दुसऱ्या दिवशी शाळेत चौकशी केल्यावर कळले की स्पर्धेचे ठिकाण बदलून पोलिसांच्या कवायतीचे मैदान झाले होते. पण मराठीच्या शिक्षकांकडून स्पर्धांची जबाबदारी इतिहासाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आली असल्याने ही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही...
स्पर्धेचा रविवार उजाडला। सूचने प्रमाणे मुक्या सकाळी सहालाच जिल्हा परिषद मैदानात पोचला. प्रसन्न वातावरणात श्वान-वराहांच्या व्यतिरिक्त कोणीही इतर प्राणी हजर नव्हते. "हुशारांच्या" वर्गातला असल्याने त्याचा कोणी वर्गमित्र येणे अपेक्षित नव्हतेच. थोड्या वेळाने त्याच्या शाळेतले इतर काही मुले हजर झाली होती. स्पर्धा सातला सुरू होणार होती. पण आठ वाजेपर्यंत कोणीही मैदानावर न फिरकल्याने यांना परत जावे लागले होते. दुसऱ्या दिवशी शाळेत चौकशी केल्यावर कळले की स्पर्धेचे ठिकाण बदलून पोलिसांच्या कवायतीचे मैदान झाले होते. पण मराठीच्या शिक्षकांकडून स्पर्धांची जबाबदारी इतिहासाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आली असल्याने ही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही...
पुन्हा स्पर्धेचा दिवस उजाडला। मुक्या व त्याची दोस्त मंडळी स्पर्धास्थानावर पोहचली व तिथे आलेल्या बाकी स्पर्धकांना बघून यांना स्वतःवरच हसू येऊ लागले. बाकी जवळपास सगळे स्पर्धक मोठ्या वयाचे व बलदंड शरीराचे होते. त्यांनी मोठ-मोठे ढगळ बनियन व अर्ध्या विजारी घातल्या होत्या व त्यांच्या समोर ही पोरे-टोरे म्हणजे डेव्हिड-गॉलियथच्या कथेतल्या डेव्हिड सारखे वाटू लागले. त्यांच्या सायकली तर मुक्या आणि कंपनीने स्वप्नातही कधी पाहिल्या नव्हत्या अशा दिसण्यातच चपळ होत्या.
व्हायचे तेच झाले. स्पर्धा सुरू झाल्यावर एक-दोन मैलाच्या अगोदरच ते स्पर्धक समोर दिसेनासे झाले व या मित्रमंडळाला मग मुक्याच्या रस्त्यात असणाऱ्या शेतात जाऊन बोरे-टहाळ-सिताफळे-हुरडा या रानमेव्याने विजयोत्सव साजरा करून परत येण्याची वेळ आली.
अशा अनेक स्पर्धा झाल्या। पण मुक्याचे ढाल मिळवण्याचे स्वप्न काही केल्या पूर्ण होत नव्हते.

एके दिवशी शाळेतून परतताना नेहमी प्रमाणे मुक्या सार्वजनिक वाचनालयात वर्तमानपत्रे वाचत होता। त्याच्या नियमित वाचनाला व पुस्तकांच्या निवडीला पाहून वाचनालयातल्या एका कर्मचाऱ्याला चाणाक्ष मुक्या आवडायचा. त्याने एके दिवशी मुक्याला बातमी दिली,"आपल्या वाचनालयाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आम्ही मोठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेत आहोत. तुझे वाचन चांगले आहे. तू नक्की भाग घे."
मुक्या सोडणार थोडाच होता। शाळेतही काही दिवसांनी ही सूचना फिरवण्यात आली. त्याने आपले नाव नोंदवले. त्याच्या त्या हुशारांच्या वर्गातल्या सर्वांनीच यात भाग घेतला. पहिली फेरी लेखी लेखी परीक्षेची होती. अनेक शहरात अनेक मोठमोठ्या शाळांना परिक्षाकेंद्रे बनवले होते. मुक्या आपल्या केंद्रावर उत्साहाने नेहमीप्रमाणे पोहचला. हजारो विद्यार्थ्यांच्या त्या इवल्याशा समुदायातून उत्साह भरभरून वाहत होता. अनेकजण आपले काही खरे नाही या भावनेने भेदरलेले दिसत होते. मुक्याला असे नव-नवे वातावरण बघायची आता सवयच लागली असल्याने त्याचा चेहरा मात्र शांत होता. परीक्षा झाली. हजारो विद्यार्थी गळाले. मुक्याचे नाव मात्र दुसऱ्या फेरीच्या यादीत होते. तसे त्याच्या वर्गातल्या त्या हुशार मुला-मुलींचे पण होते. आता दुसऱ्या फेरीत वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या विभागात परीक्षा द्यायच्या होत्या. मुक्या पुन्हा सज्ज. त्याच्या वर्गमित्रांची पुन्हा तयारी सुरू झाली. मुक्याला मात्र ही "तयारी" म्हणजे काय ते माहित नव्हते. त्याने वाचनालयातल्या त्या कर्मचाऱ्यास गाठले व तयारीबद्दल विचारले. "या वाचनालयातली सगळी पुस्तके वाच" एवढेच तो म्हणाला!!
अवघड वाटणारी दुसरी व तिसरी फेरी सुद्धा मुक्या लीलया पार करून गेला। त्याच्या त्या हुशार वर्गमित्रांतले बरेच रथी महारथी सुद्धा गळाले होते. "याचे काय खरे आहे. चुकून पास झाला आहे तो." अशा अविर्भावात त्याच्याकडे बघितले जाऊ लागले. तेव्हा आता शेवटची चौथी फेरी पार करणे त्याला आवश्यक वाटू लागले होते. शेवटची फेरी मोठमोठ्या विभूतींच्या समोर मंचावर होणार होती.
आणि तो दिवस उजाडला। वार्ताहर, छायाचित्रकार यांची गर्दी मंचासमोर होती. मंचावर संयोजक, पाहुणे तसेच परीक्षक येऊन विराजमान झाले. प्रास्ताविक झाले व शेवटच्या फेरीतील स्पर्धकांना मंचावर आमंत्रित करण्यात आले. मुक्याचे नाव घेतले गेले. तसा मुक्या गर्दीतून वाट काढत पुढे सरकू लागला. दाद्या कामावरून सुट्टी घेऊन आज पहिल्यांदा मुक्यासोबत स्पर्धास्थानावर आला होता. मंचावर चढताना दाद्याच्या प्रेमळ हाताची थाप पाठीवर पडली तसा मुक्या पाठमोरा वळला. दाद्याच्या डोळ्यात त्याने प्रचंड आत्मविश्वास चमकलेला पाहिला.
शेवटी स्पर्धा सुरू झाली। चार स्पर्धक व एक बक्षीस, असंतुलित समीकरण होते. पहिल्या फेरीत सगळी उत्तरे बरोबर आली तशी मुक्याची गुणतालिका आघाडीवर गेली. पण दुसरी फेरी होती संगीताची. दुसऱ्या व तिसऱ्या परीक्षेच्या वेळी या विषयातले प्रश्न पाहिले असल्याने अंतिम फेरीतही हा विषय येणार हे त्याला माहित होते. संगीतातही प्रकार असतात, राग असतात, चाली असतात हे त्याला अशातच कळले होते. पण प्रश्न आला "हा राग ओळखा"... आणि मुक्या मागे पडला. त्याला आठवली ती पी. टी. उषा. कुठल्या मागास भागातून आलेली म्हणून सुरुवातीला जगाने हिणवलेली. सुरुवातीला प्रस्थापितांच्या मागे पडलेली व नंतर जिंकलेली. स्पर्धे दरम्यान दोन पावले मागे पडताच दुसऱ्याच क्षणाला चार प्रतिस्पर्ध्याच्या पुढे चार पावले जाणारी. मुक्याने क्षणभर डोळे मिटले. त्याला पुन्हा त्याचा दाद्या दिसला, काबाडकष्ट उपसणारा, पळण्यासाठी बूट आणून देणारा, हप्त्यावर सायकल घेऊन देणारा... अन आठवली त्याला दाद्याच्या काबाडकष्टाने खरबरीत झालेल्या हाताची प्रेमळ थाप मंचावर चढताना पडलेली. पुन्हा एकदा अपयश? छे, शक्य नाही हे पचवणे आता...
"आता पुढची व अंतिम फेरी", सूचना झाली तसा मुक्या भानावर आला। या फेरीत सर्वांना एकच प्रश्न विचारला जाणार होता व सर्वांत चांगल्या उत्तराला गुण मिळणार होते. मुक्याने गुणतालिकेकडे नजर टाकली. त्याचे व प्रशांत नावाच्या त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे गुण सामानच होते ४८०.
प्रश्न आला, "तुमच्या जीवनाचे ध्येय काय?"
प्रशांत शांत व धिरगंभीरपणे उत्तरला, "माझ्या आई-वडिलांना अभिमान वाटवा असा व्यक्ती बनणे।" टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यात मुक्याचीही होती.
आता माईक मुक्याच्या हातात आला। सगळे स्तब्ध झाले. काय बोलावे हे मुक्याला कळेना तेव्हा त्याने हे काम त्याच्या अंतरात्म्यावर सोडून दिले व नकळत त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडले, "परं वैभवं ने तुमे तत् स्वराष्ट्रम्!"
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला, होतच राहिला, कदाचित न संपण्यासाठी!
"आणि प्रथम विजेता आहेSS.... मुकुंद पुजारी!!"... पहिल्यांदाच मोठ्या भोंग्यातून आपले नाव ऐकून मुक्याला स्वतःच्या कानावर विश्वास बसेन। मुक्याने एकदाची ढाल जिंकली होती. पाहुणे उठले, आयोजक पुढे झाले, छायाचित्रकार पुढे सरसावले. प्रशांतला पुष्पगुच्छ मिळाला होता. आता मुक्याला पुढे बोलावण्यात आले... मुक्याने पाहुण्यांना चरणस्पर्श करून ढाल स्वीकारली. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशने एका अनोळखी चेहऱ्याला पहिल्यांदाच उजेडात आणले.
माईक पुन्हा मुक्याच्या हातात दिला गेला। त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. अन गहिवरलेल्या गळ्यातून थरथरत्या ओठांच्या मधून शब्द बाहेर पडले,"दाद्या इथे ये..."
गर्दीतून वाट काढत डोळे पुसत कुणीतरी कृष तरूण मंचावर जाताना गर्दीने पाहिला. मुक्या पुढे झाला व दाद्या ढाल दाद्याच्या चरणावर ठेवली,"हीची जागा इथे आहे..." टाळ्यांच्या गजरात हे शब्द दाद्याच्या कानावर पडले व त्याने आपल्या या लहानग्या भावाला कडकडून मिठी मारली.

हवी आहेत : भूते

जाहीरात:

एका भूतकथाप्रेमी वाचकाला हवी आहेत घाबरवणारी भूतकथांतील अथवा लोककथातील अथवा अनुभवातील भूते।

पात्रता: उलटे पाय, ३६० अंश फिरणारी मान, लाल/पांढरे/अतीफिकट हिरवे डोळे आणि गडगडाटी हास्य।(इतर पात्रता चांगल्या असल्यास यापैकी काही/सर्व बाबींत सवलत देण्यात येईल.)

चमकलात का जाहीरात वाचून? काय करावे हो, पूर्वी सारखी खानदानी भूते राहीली नाहीत आता॥म्हणून जाहीरात द्यावी लागते..प्रेमकथा सर्वत्र आहेत, रहस्यकथा सर्वत्र आहेत, पण भूतकथा मात्र हल्ली वाचायलाच मिळत नाहीत..

लहानपणापासून भूतकथा आणि भूतचित्रपटांचे मला जबरदस्त आकर्षण। रात्री उशिरापर्यंत बैठकीच्या खोलीत भूतकथा(मा.नारायण धारप लिखीत) वाचून मग आता झोपण्याच्या खोलीत न घाबरता कसे जायचे?मग पॅसेजचा दिवा लावून बैठकीच्या खोलीतील दिवा घालवून पळत पळत पॅसेजमधे जायचे॥आता स्वयंपाकघरातल्या अंधारात न पाहता पळत पळत झोपण्याच्या खोलीत जाऊन एक मंद दिवा लावून पॅसेज मधे परत यायचे..पॅसेज मधला दिवा घालवून पळत पळत झोपण्याच्या खोलीतला मंद दिवा घालवून डोक्यावरुन पांघरुण घेऊन गुडुप्प झोपून जायचे.

आमच्या लहानपणी 'झी' 'स्टार' इ।इ. बाळांचा जन्म झाला नव्हता. दूरदर्शन हा एकमेव वाली. आणि मग मंगळवारी रात्री ९ ला लागणारी 'किले का रहस्य' मालिका श्वास रोखून पहायची. पण 'किले का रहस्य' ने शेवटी हे एक कटकारस्थान आहे असे दाखवून भूत संकल्पनेचा बट्ट्याबोळ केला. नंतर 'झी' वाहीनीवर बराच गाजावाजा करुन 'द झी हॉरर शो' आला. त्याचा पहिला भाग 'दस्तक' डोळे बंद ठेवून मधून मधून उघडून('आई, भूत अचानक दारामागून आलं कि मला सांग.नंतर मी डोळे उघडते.') पाहीला. 'भूते' हि केवळ स्मशान आणि कब्रस्तान यापुरती मर्यादीत न राहता कपाटातही (कपाट उघडल्यावर हात पुढे करुन नायिकेचा गळा दाबण्यासाठी)असतात आणि खाण्याच्या बशीवर नुसते मुंडके(स्वत:चे) पण ठेवू शकतात हा शोध लागला. मग काही महिने कपाट उघडताना आधी हळूच एक इंच उघडायचे॥मग एकदम वेगाने पूर्ण उघडून वेगाने मागे सरायचे..आणि कपाटात कोणी नाही याची खात्री करुन मग पुढे सरकायचे.. (भूताला चकवण्यासाठी हा उपद्व्याप बरे का!) रामसे बंधूंचा 'विराना' चित्रपट आणि इव्हील डेथ:भाग १ व २(३ अगदीच पुळचट होता..) यानी भूताना मानाचे स्थान मिळवून दिले. इव्हील डेथ पाहून झाल्यावर पलंग खिडकीपाशी होता तो सरकवला. त्या काळात एकदा थोड्या झाडीयुक्त प्रदेशातून घरी परत येत असताना झाडामागून लघुशंका करुन परत येणार्‍या पांढर्‍या सदर्‍यातल्या माणसाला मी असली सॉलीड घाबरले होते ना!! अशावेळी मी हळूच पाय पाहून घेते उलटे आहेत का. ती माझ्यादृष्टीने विश्वसनीय चाचणी असते. रामसे पटांत'अमावस्या' आणि कुत्रे रडताना आणि नायिका रात्री गाणे गुणगुणत आंघोळहौदात शिरली कि भूताचा सन्माननीय प्रवेश कथानकात होणार हे माहीती असायचे.. पण 'जुनून' चित्रपटाने 'पौर्णिमा' आणि 'वाघभूत' यांचा परस्परसंबंध जोडून 'अमावस्येला भूत येते' या रामसेबंधू गुरुसूत्राला दणदणीत हादरा दिला. (हा हंत हंत! वो भूत भूत हि क्या, जो अमावस कि रात ना आये??) 'झी हॉरर शो' हळूहळू 'हास्यमालिका' बनू लागला. यंत्रमानवासारखी चालणारी आणि भितीदायक न दिसता मतिमंद दिसणारी भूते येऊ लागली.आता सोनी वाहीनी वर 'आहट' मालिका आली. 'आहट' नेही अपेक्षा खूप वाढवल्या पहिल्या भागात मुंडकेविरहीत तरुण मुलीचे भूत दाखवून. पण नंतर 'आहट' पण विज्ञानमालिका आणि रहस्यमालिका प्रकाराकडे झुकायला लागले आपले 'भूतमालिका' पद सोडून.

मला आतापर्यंत आवडलेले एव्हरग्रीन भूत म्हणजे ड्रॅक्युला। अहाहा॥ काय ते सुळे..काय ते त्याचे पांढरे डोळे.काय त्याचे 'एकमेका सहाय्य करु,अवघे धरु सुपंथ' या उदात्त धोरणाने जास्तीत जास्त माणसांचे रक्त शोषून त्याना ड्रॅक्युला पंथाची दिक्षा देण्याचे सत्कार्य!! ड्रॅक्युला कल्पनेवर आधारीत कथा नारायण धारपानी लिहीली ती 'लुचाई'. तीही घाबरवण्याच्या चाचणीत १०० पैकी १०० मिळवून गेली. ड्रॅक्युला ने ड्रॅक्युला बनवलेले पूर्ण गाव, आणि शेवटी त्या गावात उरलेला एकटा नायक आणी एक लहान मुलगा, जे दिवसा गावाला आग लावून रात्र होण्याच्या आत तिथून बाहेर पडतात. तुम्हीपण अवश्य वाचा मिळाल्यास. नारायण धारपानी काही अप्रतिम भूतकथा दिल्या, पण हल्ली त्यांच्या कथा 'सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा संघर्ष' आणि 'समर्थानी ध्यान करुन दिव्य आत्म्याना आवाहन केले आणि त्या आत्म्यांनी दुष्ट शक्तींचा नायनाट केला' अशा सौम्य बनल्या आहेत. (नारायण धारपांच्या चाहत्यानी या वाक्यासाठी मला क्षमा करावी.) इथे आंग्ल ग्रंथालयात स्टिफन किंग चे 'पेट सिमेट्री' वाचले आणि मला शोध लागला कि आहट चा एक भाग 'कॉपी टू कॉपी माशी टू माशी' आहे त्या कथेचा. योगायोगाने एका रविवारी रात्री ११ वाजता झोप येत नाही म्हणून वेडे खोके लावले तर त्याच कथेचा चित्रपट लागला होता. मग काय...'रविवार रात्र' 'उद्या लवकर उठायचे आहे' 'रात्री भिती वाटल्यास इथे कोणी नाही' वगैरे सर्व विसरुन तो पूर्ण पाहीला. कथा 'माणसे जिवंत करण्याची शक्ती असलेल्या दफनभूमीवर' आधारीत. मग रात्री परत घाबरणे आणि गायत्रीमंत्र..

इथे आल्यावर एकदा अशीच फिरत फिरत(दिवसा) किरिस्ताव स्मशानभूमीत जाऊन आले 'कब्रस्तान' प्रत्यक्ष बघण्यासाठी। 'किरिस्ताव' भूत भेटले तरी मी हिंदू असल्याने ते माझ्यापेक्षा त्याच्या धर्माच्या आणि त्याची मातृभाषा कळणार्‍या माणसाला जास्त पसंत करेल हि माझी कल्पना. पण ते कब्रस्तान कमी आणि बाग जास्त वाटत होती. पेन्शनर जोडपी आणि तुरळक प्रेमीयुगुले तिथे फिरत होती. झाडे फुले नीट निगा राखून सुंदर ठेवली होती. पण सौंदर्य असले तरी तिथे खिन्नता होती एकप्रकारची.

ड्रॅक्युला हे किरीस्ताव भूत जबरदस्त असले तरी आपल्याकडची भूतेही कमी नाहीत। 'गिरा' हे समुद्रकिनार्‍यावरील भूत(गिर्‍याची शेंडी कापून कपाटात ठेवली कि तो ती परत मिळवण्यासाठी आपल्याला हवे ते देतो.),मुंजा,वेताळ,हडळ,ब्रम्हराक्षस इ.इ. आपल्याकडची भूतेही प्रसिद्ध आहेत.

माझ्या सारखा मीच.......

Wednesday, June 20, 2007

अरसिक किती हा...

अरसिकाशी गाठ नको रे बाप्पा!
हे लोक रंगाचा बेरंग करतात। कदाचित नकळत असेल, पण करतात खरे. ’छावा’ या नाटकाचा ठाण्यातला पहिला आणि एकुणं दुसरा प्रयोग; पहिला आदल्याच दिवशी रवींद्र ला झाला होता. रांगेत उभे राहून, ओळख काढून मोक्याच्या जागेची तिकिटे मिळवली होती. नाटक सुरू झाले. मराठ्यांचा युवराज मुघल आणि स्वकीय या दोहोंचा पाठलाग चुकवीत परागंदा झालाय आणि तो आपल्या महाराणीला जंगलातील एका मंदिरात भेटतोय असा प्रसंग होता. महाराणींनी प्रवेश केला मात्र, आमच्या पुढील रांगेतून कुजबुज सुरू झाली - "अय्या! अग स्मिता तळवलकरची नारायण पेठ बघ काय सुंदर आहे ना?". "हो ना!अग नाटक नवीनच आहे ना, सगळे कपडे कोरे करकरीत असतील." "बरी मिळाली हो, मी मागे किती शोधली पण हा रंग मिळालाच नाही कुठे". " हात्तिच्या! इतका काही दुर्मिळ नाहीये काही हा रंग, आता दोन महिन्यापूर्वी माझ्या जावेने अगदी अश्शीच घेतलीन मुलाच्या मुंजीत" "तुझी जाऊ काय बाई रोज सुद्धा घेईल; दीर जकात विभागात आहेत ना!" आता इथे पुलंची आठवण होणे अपरिहार्यच होते! पु. ल. असते तर त्यांनी लिहिले असते की ’हे ऐकल्यावर मराठ्यांचा राजा आपल्या हाताने साखळदंडात स्वतः:ला जखडून औरंगजेबासमोर हजर झाला असता’. तसं म्हटलं तर यांना अरसिक तरी कसे म्हणावे? साडी पाहताच इतका तपशील आठवला ही रसिकताच नाही का? मग अस्थायी असली तर काय झाले?
माझा एक बालमित्र आहे। काहींबद्दल असे म्हणतात की लेकाचे हवेत उडत असतात, यांचे पाय जमिनीला लागतच नाहीत. हा प्राणी त्याच्या नेमक्या विरुद्ध प्रकारात मोडणारा. याचे पाय काय वाटेल ते होवो, जमीन सोडणार नाहीतच पण चुकून कुणी हवेत तरंगायला लागलाच तर त्याचे विमान हा हमखास जमिनीवर आदळणार. एकदा आम्ही शनिवारी रात्री छानपैकी तळ्यावर गप्पा मारत बसलो होतो, सात आठ जण होतो. शिक्षण संपवून नुकतेच सगळे नोकरीला लागलेले, लग्न वगैरे अजून कुणाचेच झालेले नव्हते. असाच विषय निघाला आणि प्रत्येकजण आपापले स्वप्न वा सुखाच्या कल्पना सांगू लागला. आमचा एक स्वप्नाळू मित्र म्हणाला, ’एक छोटंसं स्वप्न आहे. तळ्यावर एक छोटासाच पण स्वतःचा बंगला असावा. अशी मस्त पैकी गच्चीत मित्रांची मैफल जमावी, आजूबाजूला बगीचा असावा, गच्चीत रातराणी दरवळत असावी... ’नको रे, गच्चीत झाडं नकोत! फार डास येतात झाडं असली की’ - आमचे ’जमीनदोस्त’ बोललेच!. सांगणारा असा काही उखडलाय; म्हणाला, स्वप्नांत कसले आलेत रे डास? ग, म, भ च्या बाराखडीतले लडिवाळ शब्द ऐकून बावरलेला तो सद्गृहस्थ निरागसपणे म्हणाला, ’तस नाही रे पण आपलं सांगितलं. खरोखर सांगतो, डास चावायला लागले तर मग काही मजा नाही रे, उठायला लागेल ना गप्पा सोडून’.
हा मनुष्य एरवी अतिशय सज्जन, स्वभावाने गरीब, पण नको तेव्हा नको ते बोलणे हे याचे ब्रीदवाक्य! चार लोक कौतुकाने पाहत असलेल्या, ऐकत असलेल्या वा बोलत असलेल्या संभाषणात हा अचानक असे काहीतरी भुईसपाट करणारे वाक्य बोलायचा की रंगाचा बेरंग झालाच पाहिजे। आणि पुन्हा याला आपण असे काही अक्षम्य वर्तने केले आहे मान्यच नसायचे, ’मी आपलं सांगीतलं’ हे त्याच पालुपद असायचंच. एकदा तर याने कहर केला. घरी कुणी नव्हते, गप्पा मारत जेवू म्हणत चार मित्र जमवले. हे महाशय आमचे परममित्र, हे पाहिजेतच. काही पदार्थ मंडळी घेऊन येणार होती, काही मी केले होते, भात लावला होता. नुसती वाट पाहायची तर एकीकडे मधुबालाची तबकडी चढवली. गाणी पाहत असतानाच मंडळी आली. ’अरे वा! मधुबाला! वावावा...’ मंडळींची खुशी चेहऱ्यावरून ओसंडली. काय घाई आहे जेवायची? जरा मधुबाला बघू चार घटका म्हणत सगळे आसनस्थ झाले. इकडे ’गुजरा हुआ जमाना’ लागले, ’ह्म्म्म’ असा सुस्कारा सोडत आम्ही व्याकुळ चेहऱ्याची मधुबाला पाहत असतानाच आमच्या मित्राने त्याचे मौलिक विचार प्रकट केले: ’देवानं उंट हा प्राणी किती कुरूप निर्माण केला आहे ना?’. इथे आमचे शब्दच संपले! ज्याला पडद्यावर मधुबाला असतानाही तिच्या आजूबाजूचे उंट दिसू शकतात त्या महापुरुषाविषयी काय बोलणार?
हे झाले लौकिकार्थाने अरसिक समजले गेलेले। पण ’दुसऱ्या’ प्रकारच्या अरसिकांचे म्हणजेच ’अतिरसिकांचे’ काय? हे पहिल्या प्रकारातले परवडले पण हे दुसरे शहाणे नकोत! आता कल्पना करा, गाडीने निघाला आहात. आजूबाजूला नेहमीचे वाहतुकीचे कडबोळे आहे, रस्त्यात खड्डे आहेत, बेदरकारपणे मालमोटारी उजवी बाजू हट्टाने लढवत आहेत. या सर्वाकडे शक्यतो दुर्लक्ष करून आपले डोके शांत राखण्यासाठी आपण गाणी ऐकत आहोत, मदन मोहन ची ध्वनिफीत वाजते आहे, आपण ’किसी की याद मे दुनिया को है भुलाये हुए’ च्या तालावर डोलत आजूबाजूचे जग विसरू पाहतोय आणि...... आणि शेजारी बसलेला रफीच्या सुरांना बेसूर करत आपले तोंड उघडतो " हा अमुक राग बरं! काय चीज आहे. अरे काय सांगू दोस्ता या रागाची गोडी........" इकडे माझ्या जीवाचा संताप होतोय. हे सद्गृहस्था, मी अडाणी तर अडाणी, पण काहीतरी कानावर पडतंय, बरं वाटतंय म्हणून ऐकतोय, जरा आजूबाजूचा कोलाहल विसरतोय तर हे डोस कशाला रे? कुठलाका असेना राग! आता हा राग कोणता, त्याची लक्षणे काय, त्यात काय वर्ज्य वगैरे वगैरेशी मला काय देणे घेणे आहे? अहो, एखादी रमणी तुमच्या कडे पाहून एखादे स्मित देते आहे, तुम्ही ’कलिजा खलास झाला’ वगैरे अवस्थेत जाऊ घातलाय आणि अशा वेळी जर तुमच्या बरोबरचा सांगायला लागला, ’अरे हसणं म्हणजे काय वाटलं लेका? जबड्याच्या एकंदरीत एकशे बहात्तर स्नायूंचे आकुंचन प्रसरण व्हावे लागते त्यासाठी" तुम्हीच सांगा तुमची काय स्थिती होईल? हे लोक आपले ज्ञान नको तिथे नको तेव्हा का दाखवतात?
मी एक पथ्य पाळून असतो। मी गाण्याच्या कार्यक्रमाला कुठल्याही जाणकारा बरोबर जात नाही. चित्रपट पाहायला इसाक मुजावर, शिरीष कणेकर वा राजु भारतनचा गृहपाठ करून आलेल्यांबरोबर कदापि जात नाही. काव्यवाचनाला कधी कवी वा समीक्षकाबरोबर जात नाही, कपडे घ्यायला पत्नीबरोबर जात नाही, जेवायला शिस्तीच्या माणसाबरोबर जात नाही. अगदी मौसम मधल्या कजलीच्या शब्दांत सांगायचं तर ’इज्जत वाल्यांमध्ये उगाच आपली मात्र बेइज्जती होते’. सिनेमाचार्यांबरोबर चित्रपट पाहायचा म्हणजे कठीण. इकडे ’दो घडी वोह जो’ चालू झालं की तिकडे हे ज्ञानी पुरूष आपला कान कुरतडायला सुरुवात करतात - तुला ह्या गाण्याचा किस्सा माहीत आहे काय? राजेंद्र कृष्ण एकदा बसमधून चालला होता. बस वरळी च्या समुद्राच्या काठाने जात होती आणि अचानक या पट्ठ्याला शब्द सुचले. बरं लिहायचं म्हटलं तर जवळ वही वगैरे काही नाही. मग याने बस च्या तिकिटावर गाणं लिहून काढलं, अस काही गाजलंय यार...’जणू काही ते गाणं तिकिटावर लिहिल्यामुळेच गाजलेलं असतं आणि हा इतिहास माहीत असल्याखेरीज त्या गाण्याचा अर्थ समजणार नसतो! पण या रसिकांचे रसग्रहण इतके आकंठ झालेले असते की कधी कोण सापडतोय आणि कधी मी माझ्या रसाची पिंक टाकतोय. चित्रपट पंडितांबरोबर चित्रपट पाहण्यातला आणखी एक धोका म्हणजे हे लोक बहुधा तो चित्रपट अगोदरच पाहून, त्याचे परीक्षण वगैरे वाचून कोळून प्यायलेले असतात. यांच्या तावडीत सापडलात तर अख्खा चित्रपट काळाच्या पुढे जाऊन पाहावा लागतो. म्हणजे आता काय संवाद आहे किंवा कोणते गाणे आहे हे सगळे ते आपल्याला आगाऊ सुनावतात. वर हाच प्रसंग दुसऱ्या चित्रपटात त्या अमक्या दिग्दर्शकाने कसा सोनं करून दाखवला हेही अधिकारवाणीने ऐकवतात; तेही भर चित्रपट गृहात, आपण पैसे मोजून चित्रपट प्रथमच पाहत असताना. यांच्या पेक्षा मुले बरी, हातात लाह्यांचा पुडा वा वेफर दिले की आवाज बंद.
एखाद्याला एखादा छंद असणे, एखाद्या गोष्टीतले ज्ञान असणे, एखाद्या कलेची आवड असणे हे उत्तमच, पण ते काळवेळ न बघता दुसऱ्यावर थापणे मात्र वाईट। आमरस सर्वांनाच आवडतो, पण तो वाडग्यात घालून गरमा गरम पुऱ्यांबरोबर दिला तर. एखाद्याच्या डोक्यावर वाडगाभर रस ओतला तर तो तुमचे कौतुक कितपत करू शकेल? गुलाबाचे फूल सुंदर असते, पण ते बगिच्यात वा काटे काढून प्रेमाने हातात दिले तर, जर भस्सकन अंगावर फेकले तर ते कुणाला आवडेल? आपली कला, आपले ज्ञान सादर करायचे आहे ना? मग एक छानसा कार्यक्रम आयोजित करा, आम्हीही सहभागी होऊ, तुमचे कौतुक करू, तुमच्या कलेचा आस्वाद घेऊ, पण असे खिंडीत गाठून पकवू नका! यांत तुमचा अपेक्षाभंग आणि आमचा रसभंग. पण नाही, असे करतील तर ते अतिरसिक कसले? म्हणजे अरसिक हा कोरडा दुष्काळ तर हे अतिरसिक म्हणजे ओला दुष्काळ, मधल्या मध्ये आमचे मात्र हाल.
म्हणूनच म्हणावेसे वाटते, अरसिकांशी गाठ नको रे बाप्पा.

कोलंबस आणि खाकी चड्डी..............

अस्मादिक साधारण ४ थी किंवा ५ वीत असतील। 'इति करी हास, भूगोल करी पास आणि इंग्रजी गणित करी सर्व विषयांचा सत्यानाश' अशी म्हण त्या काळात म्हणजे १९८०च्या दशकात, खूप प्रसिद्ध होती. ह्या काळात जवळ जवळ सगळ्या पुण्यातली होतकरू शाळकरी पोरे ’रेषा मारायला’ आ.दे., रे.स्व, हु.पा., से.स. विभागात लक्षी रोडच्या आजुबजूबाजुला घुटमळायची, असा तो काळ. समवयस्क, पुणेरी, चाणाक्षं आणि अनुभवी वाचकांना लक्षात आले असेलच. असो, मुख्य विषया कडे वळूयात: इतिहासाच्या तासाला मास्तरांनी शिकवले ’कोलंबस ने अमेरिका शोधून काढली’, माझ्या मनात आशेचा किरण चमकला... मला अशा हरवलेले (मला उगाचच वाटले, अमेरिका हरवली होती ती ह्या पठ्ठ्याने शोधून काढली) शोधून काढणाऱ्याची नीतांत गरज होती. लालेलाल झालेली आणि हुळहुळणारी माझी पाठ दोरीवर वाळत घातलेली आणि हवेने उडालेली शाळेची खाकी चड्डी शोधण्यात आलेल्या अपयशा मुळे आईने दिलेल्या बक्षिसाची आठवण करून देत होती. मी ठरवून टाकले, कोलंबसाला खाकी चड्डी शोधण्या साठी रवाना करावयाचे. आनंदही झाला, मी विचार केला बरे झाले ह्याला नाही सापडली तर आई ह्याची पाठ लाल करेल, आपण तर सुटलो. आपण फक्त ह्या कोलंबसाला शोधून काढले म्हणजे झाले. ह्या कामगिरी वर इतिहासाच्या आदलिंगे मास्तरांची मदत घ्यायची असे पक्के ठरवले. आदलिंगे मास्तर हे पूर्णं विनोदी आणी आम्हा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मास्तर होते. विद्यार्थ्याचे असे बरेच गहन प्रश्न ते चुटकी सरशी सोडवत असत. मी मास्तरांना मधल्या सुट्टीत गाठले. त्यांना माझी गहन समस्या समजवून सांगितली आणि कोलंबसाला माझी मदत करण्याची गळ घातली, त्या बदल्यात कोलंबसाला मी ५ गोट्या आणि २ लिमलेटच्या गोळ्या देण्याचे कबूल केले. मास्तर खुपाच गंभीर पणे मला धीर देत म्हणाले ’समस्या गंभीर आहे, पण तू काळजी करू नकोस, मी कोलंबसाला टाकोटाक निरोप पाठवतो आणि शाळा सुटायच्या आत तो तुझी खाकी चड्डी आणून देईल याची व्यवस्था करतो. तू वर्गात जाऊन बस’॥दगडु शिपाई घंटा वाजवून शेवटचा तास संपल्याची घोषणा करतो. मी चिंतित अवस्थेत ’आपण कोलंबसच्या कुवती वर जरा जास्तच विश्वास दाखवला तर नाही ना’ असा विचार करत होतो आणी समोरून आदलिंगे मास्तर येताना दिसतात, मास्तरांच्या चेहेर्या वरचे हसू आणी हातातले पुडके मला येणाऱ्या आनंदी बातमीची नांदी देतात.
मास्तर ’हे घे तुझी खाकी चड्डी, त्याने इस्त्री पण करून दीली’।
मी आनंदात ’संध्याकाळी घरी येतो ५ गोट्या आणी २ लिमलेटच्या गोळ्या घेऊन।’
मास्तरांच्या प्रतिक्रियेची वाट न बघता मी घरा कडे धूम ठोकतो.. कधी एकदा आईला भेटेन असे झालेले असते. आईला एका दमात सगळा किस्सा सांगून हातात चड्डीचे पुड्के ठेवतो. आईची हसून हसून मुरकुंडी वळते. मी गोट्या आणी गोळ्या घेऊन मास्तरांच्या घरी जायला निघतो, आई माझ्या हातात काही नोटा कोंबते ’मास्तरांना दे, त्यांना सांग कोलंबसाला द्यायला, माझ्या कडून बक्षीस... अजून खूप काही शोधण्याची कामे येतील त्याचे कडे....

करदोरा............एक ग्रामीण कथा

कडाक्याची थंडी पडली होती। म्हातार्‍या माणसांना थंडी जास्तच वाजते, म्हणूनच पर्वती अन् कुंडलिका मुंबईत एका आलिशान बंगल्याच्या बाल्कनीत उन्हाला बसले होते. गळ्यात सोन्याचं डोरलं, हातात पाटल्या अंगावर चांगलं लुगडं नेसून खुर्चीत ती बसली होती. दोघं येणार्‍या-जाणार्‍या मोटार गाड्या पहात होते. सुनबाई सुद्धा मोठ्या गुणाची होती. ती प्रेमानं त्यांची सेवा करीत होती. यशवंता आला. तो आई-वडिलांच्या पाया पडला. 'आई येतो गंs' म्हणून तो कामासाठी बाहेर गेला. त्याच्या पाठमोर्‍या आकॄतीकडं बघत त्यांना आपली तीस वर्षापूर्वीची परिस्थिती आठवायला लागली.... खरंच त्यांची त्यावेळची परिस्थिती पाहिली तर ही प्रगती कुणाला न पटणारीच होती....
"आवं घरात दान्याचा कण नाही, शिजवावं तरी काय?" पारी आपल्या कारभार्‍याला सांगत होती। अंगावरलं कांबरून त्यानं बाजूला सारलं, चूळ भरली.
"आलो काय तरी जमतंय काय बघतो।" म्हणून तो बाहेर पडला. मे महिन्याचे दिवस. कोल्हापूर पासून दहा कोसावरलं गाव. काम शोधून मिळत नव्हतं. अशी गावची स्थिती. गेलेला धनी दुपार झाली तरी परत आलेला नव्हता. सकाळपसून पोराच्या पोटात फक्त पाणीच होतं. पोटाला टॉवेल गूडाळून तो कोपर्‍यात बसला होता. त्याच्या पोटात कावळ्यांनी धुमाकूळ घातला होता. पोराची हालत पाहून तीचा जीव तळमळत होता. त्याला काय तरी करून घातलं पाहिजे म्हणून तिच्या जीवाची घालमेल होत होती. सूर्य तर आग ओकत होता. ती पोराजवळ जायची. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवायची. तिची ती घालमेल यशवंत किलकिलं डोळं करून पाहत होता. गेली वर्षभर पार्वती घरात होती. तिला एका बाजूला लकवा मारलाता. चांगलं चार घास खाऊनपिऊन असलेलं घर हिच्या आजारपणात घाईला आलेलं. दाव्याची जनावरं कधीच विकलीती. आजारपणातून थोडी बरी झालती, पण तोपर्यंत संसाराचा कणाच मोडलाता. मोठ्या हिम्मतीनं तिनं संसार उभा केलता. पण आजारी पडल्यानं वर्षाच्या आतच मोडून पडलाता. डोळ्यातनं टिप गाळण्यापेक्षा ती काही करू शकत नव्हती. दुपारी तीनच्या सुमारास कुंडलिकराव घराकडे येताना दिसलं. कायतरी धनी घेऊन आलं असतील. आता पोराच्या पोटात दोन घास पडतील, या आशेने ती उठली. ते घरात आलतं. दोन कणसांशिवाय त्यांच्या हातात काही नव्हतं. ती कणसं तिनं घेतली. चुलीजवळ गेली. शेणपूट घालून चूल पेटवली. कुंडलिकरावांनी पोराला पाहिलं तसं त्याना रडूच कोसळलं. ते हूंदके देऊन रडाय लागले. पोराला जवळ घेतलं अन् हुंदके देतच,
"हे देवा परमेश्वरा काय हे दिस दाखावलंस? माझा पोटचा गोळा उपाशी ठेवलास। मी काय करू?"
एवढ्यात दारावर धाकलं पाटील आलंत। "कुंडलूतात्या गार उपसायची हाय, आबांनी तुला बोलावलंया।"
त्याला देवच आपल्या मदतीला धावून आलाय असं वाटलं। संध्याकाळच्या जेवणाची सोय झाली म्हणून त्यानं डोळं पुसलं.
"मी आलोच मालक। तुम्ही व्हा पुढं."
माणसं जमाय संध्याकाळ झाली। सहा वाजता गार उपसायला सुरवात झाली. प्रत्येक बुट्टी टाकताना त्याला त्रास होत होता. पोटात आग पडलीती. अंगात त्राण नव्हता, तरीसुद्धा पोराच्या पोटात चार घास पडतील म्हणून जीव ओतून तो गार उपसत होता. पहिली ट्रॉली एका तासात भरली. ट्रॉली शेतात ओतायला गेली. टिपूर चांदणं पडलं होतं. तरीबी ते चांदणं त्याला भकास वाटत होतं. पाटलीनं बाईनं चहा दिला. आज दिवसभरात पाण्याव्यतिरिक्त त्याच्या पोटात चहा चालला होता. त्याच्या पोटातलं कावळं जरा शांत झालं. पुन्हा ट्रॉली भराय सुरवात झाली. घड्याळाचा काटा पुढं सरकतं होता. तसतसं त्याला आपल्या उपाशी बायका पोराचं केविलवाणं चेहरे दिसत होते. कधी एकदा गार उपसून होतीया अन् तांदूळ घरला घेऊन जातोय असं झालंतं. नऊ वाजता गारीचा तळ लागला. त्याला आनंद झाला. हातपाय धुतलं तसं थोरलं मालक म्हणालं,
"कुंडलिका, हतासरशी येताना शेतातली लाकडं टाकून आणा जावा ट्रॉली येताना रिकामी येतीया।"
"जी मालक" म्हणून तो ट्रॅक्टरच्या मागं चालू लागला। विचाराचं काहूर डोक्यात माजलंत. यायला वेळ झाला अन् दुकान बंद झालं तर? ट्रॉली मागून चालताना आपल्या डोक्यावरती कुणीतरी दहा मणाचं ओझं दिलंय असं वाटाय लागलं. पैसे मिळणार या आशेने तो वाड्यात शिरला, पण पाटलांना गाढ झोप लागली होती. जड अंतःकरणानं तो घराकडे चालला. त्याला वाटलं पाटलीन बाई कडून भाताचा हेंडा पोराला मागून घावा. पण धाकट्या वैनी साहेबांच्या पुढ्यात मागायचं कसं, त्याला लाज वाटाय लागली. त्याचं पाय पुढे सरकत नव्हतं. आता पोराच्या पोटात काय घालायचं याचा विचार त्याला सतावत होता. पोरगं वाट बघत दारातच बसलं होतं. बाला येताना बघून त्याला आनंद झाला. ते पळत त्याच्याकडं गेलं. पण हातात काहीच नव्हतं. पोराला उचलून घेतलं. त्याचं दोन मुकं घेतलं. त्याच्या चेहर्‍यावरून हात फिरवताना त्याच्या मनाची घालमेल सुरू झाली. डोळ्यातनं टिप गाळीतच तो आत आला. बायकोच्या गळ्याला जाऊन पडला.तो रडाय लागला. बायको समजावण्याच्या सुरात म्हणाली,
"धनी, नका काळजी करू आजच्या दिस पाणी पिऊनच रात्र काढू।"
माठातलं पाणी तिघंबी प्याली अन् अंथरुणावर पडली। यशवंता या कुशीवरून त्या कुशीवर होत होता. त्याला भूक अनावर झालती.
सकाळपासून फक्त मक्याचं दाणं पोटात गेलंतं। त्याला आता कोतमिरेनी रानात केलेली कलिंगडं दिसू लागली. ती कलिंगडं काढायला आल्यात हे त्यानं पाहिलं होतं. सकाळी यशवंता उठला आईला सांगितलं,
"आलो जरा इथनं।"
तो गेला कलिंगडच्या रानात। कोतमिरे कलिंगड राखणदारीला असायचा. पण तो नव्हता. या संधीचा फायदा त्यानं घेतला. इकडं तिकडं बघितलं, तिथलं एक मोठं कलिंगड तोडलं. लांब झाडीत बसून त्यानं ते दगडानं फोडलं. जसजसं कलिंगड पोटात जाऊ लागलं तसतसं त्याला बरं वाटू लागलं. एवढयात पाठीमागून म्हादबानं त्याच्या पेकटात लाथ घातली. तसं ते 'आईs गं' करतच ओरडलं.
"चल तुला दावतो इंगा, चल चावडीत।"
असं म्हणत त्यानं त्याला ओढाय सुरुवात केली। यशवंता हात जोडून म्हाणाला.
"एवढ्या डाव चूक माफ करा। परत अशी चूक आईच्यानं हुणार नाही."
"चूक करतंस नी माफी मागतंस। तुझ्या आईला तुझ्या", असं म्हणत त्यानं ओढायला सुरुवात केली.
शेतातनं गावात आल्यावर म्हादबाला चेव चढला। परत कोणी आपल्यात चोरी करताना दहा वेळ विचार करावा म्हणून त्यानं मारायला सुरुवात केली. यशवंता रडत होता. लोक विचाराय लागली.
"काय झालंरं म्हादबा?"
"कलिंगड चोरूज खाईतं नव गा। गावलंय सरपंचाकडं नेतो." सरपंचाला म्हादबानं वॄत्तांत सांगितला. त्यानी शिपाई पाठवला. तो गेला बोलावाया.
"कुंडलिका सरपंचानी बोलावलंय।"
"कारं काय काम हाय?"
"तुझ्या पोरग्यानं प्रताप केलाय।"
"काय केलं त्येनं?"
"कलिंगड चोरलं, म्हादबाच्या शेतातलं।" हे ऐकताच कुंडलिका मटकन् खालीच बसला. शिपाई त्यातनं म्हणालाच, "असलं पोरगं जन्माला आलं तवाच नरडं का दाबलं नाहीस." कुंडलिकाला माहिती होतं पोरगं असं का वागलं. शिपायाच्या पाठीमागून चालताना तो नशिबाला दोष देऊ लागला. आणखी काय काय बघायला लावतोस देवा? झटकन् त्यानं म्हादबाचं पायच धरलं.
"एवढा डाव माफ करा मालक, बारकं प्वार हाय त्येला काय कळतंया। एवढ्या डाव चूक पोटात घाला मालक."
यात आपल्या पोराची काय चूक नाही हे माहीत असूनही त्यानं जड अंतःकरणानं त्याला मारलं। ते रडत म्हणाय लागलं.
"बाबा परत नाही असं करत, उपाशी पाणी पिऊन राहतो। पण मारू नगंस, बाबा लय लागतंया मारू नगंस."
त्यानं हातच जोडलं तसं कुंडलिकाला कालवल्यासारखं झालं। त्याला आपणच रडावं असं वाटाय लावलं. चाबकाच वाद आपणच मारून घ्यावं असा विचार त्याच्या मनात आला. हात सैल झाल्याचं पाहून यशवंता पळत सुटला. त्याचा गाव आता खूप लांब राहिलाता. पळत-पळत रेल्वे स्टेशनवर आला. भितभितच त्यानं रेल्वेच्या डब्यात प्रवेश केला. कोपर्‍यात जाऊन बसला. थोड्याच वेळात रेल्वे सुरू झाली.
सकाळी त्याला जाग आली तेव्हा रेल्वे थांबलेली होती। तो बाहेर आला. लोकांचा महापूर दिसत होता. सर्वजण गडबडीत होते. भितभितच चड्डी अन् अंगरखा घातलेला यशवंता मुंबईच्या गर्दीत घुसला.
सुरवातीचे दोन दिवस त्यानं भिकच मागितली। संध्याकाळी फुटपाथवर झोपायचा. तिथेच बुट पॉलिश करणारी मुलं झोपायची. ती फार पैसे खर्च करायची. नवीन नवीन पदार्थ खायची ते पाहून त्यालाही वाटू लागलं. आपण बूट पॉलिस करावं. पण साहित्य खरेदीसाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. आपण काय करावं अन् पैसे जमा कारावेत? भीक मागावी का? इतक्यात त्याचा हात कमरेला गेला. त्याच्या कमरेला एक चंदीचा करदोरा होता. त्याच्या आईन सोन्याचं डोरलं विकून पितळेचं डोरलं केलं. पण पोराच्या कमरेचा करदोरा विकला नव्हता. यशवंताला हे माहीत होतं. याचं पैसे येतील. त्यानं त्यातल्याच एका पोरग्याला विचारलं.
"मला चांदीचा करदोरा विकून बूट पॉलिस साहित्य घ्यायचं आहे। हा कूठं विकूया?"
ते म्हणालं, "मीच घेतो।
तुझ्याकडं पैसे झालं की परत माझं मला पैसे दे, अन तुझा करदोरा परत घे।"
त्यानं करदोर्‍याच्या बदल्यात याला साहित्य घेऊन दिलं। बूट पॉलिशचा धंदा सुरू झाला. पहिल्याच दिवशी त्यानं चांगला तीस रुपयांचा धंदा केला. चौथीची परीक्षा पास झालता. त्या चौथीच्या पुस्तकातलं इतिहासाचं पुस्तक त्याचा जीव की प्राण होतं. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला की त्याला वीरश्री चढायची. म्हणूनच त्यानं पहिल्या कमाईचं इतिहासाचं पुस्तक खरेदी केलं. रोज सकाळी कामावर जाताना त्या पुस्तकातल्या महाराजांच्या फोटोच्या पाया पडायचा अन् जायचा. त्यामुळे त्याच्यात वेगळंच बळ यायचं.
इकडे आईनं अंथरूण घरलं होतं। 'यशवंता यशवंता'चा जप करत होती. कुंडलिका हिचं दु:ख पाहायचा अन् परगावी राहणारी लोकं गावी आली की विचारायचा,
"आमचा यशवंता कुठं दिसला का?"
अशातच यशवंताला एक गाववाला भेटला। त्या गाववाल्यानं सगळी हकीकत यशवंताला सांगितली. त्याच्याकडून त्यानं घराकडे शंभर रूपये पाठवले. त्या शंभर रुपयापेक्षा आपलं पोरगं व्यवस्थित हाय हे ऐकून ती उठून बसली. सगळीकडं सांगत सुटली,
"माझ्या यशवंतानं पैकं पाठवलं पैकं।" दोघंबी त्या नोटकडे बघत आनंदाश्रू गाळू लागली.
इकडे पावसाळा सुरू झाला होता। सर्वांनीच बुट पॉलिस बंद करून छत्री दुरुस्तीचा धंदा सुरू केला. वर्षात तसे त्याचे तीन धंदे व्हायचे. बुट पॉलिश, छत्री दुरुस्ती बरोबर तो स्टोव्ह रिपेअरी सुद्धा करायचा. पैसे मिळत होते. इतर मुलांच्या प्रमाणं हा चैनी करत नव्हता. ती पोरं याला सिगारेट ओढायला सांगायची, पण पैसे लागत्यात म्हणूनही तो तिकडे कानाडोळा करायाचा. मित्रांच्या ओळखीनं बँकेत खातं उघडलं. पैसे साठाय लागले. गावकडे पैसे पाठवायचा. त्यानं जीवनात एक ठरवलं व्यसन कुठलं लावून घ्यायचं नाही.अन् काय वाटेल ते झालं तर चालंल पण चोरी करायची नाही. फक्त कष्ट आणि कष्ट करायचं. एखादे संकट आलं की चौथीचं इतिहासाचं पुस्तक काढून शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायचा. पुन्हा त्याच्यात हिमंत यायची, त्याचं बळं वाढायचं.
दिवसामागून दिवस जात होते। आज त्याच्या जीवनातला महत्वाचा टप्पा होता. त्यानं रिक्षा घेतली होती. रिक्षाची चाकं फिरू लागली. पैसे जमाय लागलं. वर्षात तीन धंदा करणारा यशवंत गप्प बसंना. सहा महिन्यातच त्याच्या लक्षात आलं. जुन्या रिक्षा देणे-घेणेचा धंदा आहे. हा कमिशन बेसिसवर चालतो. मग काय त्यानं रिक्षा चालवत चालवत कमिशन बसिसवर रिक्षा देणे-घेणेचा व्यवसाय सुरू केला. ज्या स्टॉपवर रिक्षा थांबायची तिथे ओळखी करून घ्यायचा. कुणाची रिक्षा द्यायची आहे? कुणाला पाहिजे आहे काय? विचारायचा. अशानं ओळखी वाढल्या. विक्री वाढली. रिक्षा विकून त्यानं टॅक्सी घेतली. टॅक्सी देणे-घेणेचा सुद्धा व्यवसाय सुरू केला. कुणाला न फसवता धंदा करायचा. लोकांचा विश्वास वाढल. जो-तो म्हणायचा,
"टॅक्सी पाहिजे, आमचा दोस्ता हाय की यशवंता। जावा त्याच्याकडं."
प्रगतीची एक एक पायरी चढत होता। लग्न झालं मुलगा झाला. एकाच मुलग्यावर ऑपरेशन केलं. आज यशवंता चाळीस वर्षाचा झालता. दादर मध्ये एक घर घेतलं. स्वतःचा कार बाजार सुरू केलता. आजची परिस्थिती पाहून आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते.
यशवंता ज्यावेळी मुंबईत आला, त्यावेळी त्याच्याजवळ फक्त होती चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास, प्रामाणिकपणा अन् करदोरा. तो करदोरा त्यानं जपून ठेवलाय. आजही ज्या ज्या वेळी त्याच्यावर संकट येतात त्यावेळी तो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचतो अन् संकटाला दोन हात करतो.

सुट्टीचे प्लॅनिंग...................

सुट्टी!!
लहानपणीपासून आतापर्यंत केवढया सुट्ट्या आल्या आणि संपल्या पण मला आठवते ते म्हणजे सुट्ट्यांचे 'प्लॅनिंग'। अचाट, अफाट, सुसाट अशा शेकडो टकारांती योजना आम्ही बनवत राहिलो आणि मी तरी अजूनही बनवत आहे. आजच्या पिढीला आधी हे सांगायला हवे की सुट्टीचे प्लान म्हणजे चित्रकलेचा वर्ग, कराटेचा वर्ग, व्यायामाचा वर्ग आणि वर्गमुळात काही नाही असा नसायचा. आणि हापूसच्या आंब्याला लाजवेल एवढ्या चवीने हा चाखला जायचा. परीक्षा जवळ आलेल्या आहेत, अभ्यासाची बोंब लागली आहे, सर्वविषय-वासनांचा वर्षाच्या सुरुवातीपासूनच त्याग झालेला आहे, कोणते धडे यावेळी मानगुटीवर बसले आहेत हे शोधण्याची धडपड चालू आहे अशी परिस्थिती. नापासांची चिंता करणार्‍या चाटेंचे दर्शन घ्यावे लागण्याइतपत वाईट अवस्था नसली तरी वर्गातली थोडी अब्रू जपणे तर भाग होतेच. आता टवाळक्या पुरे, आता फक्त अभ्यास. अर्जुनाच्या एकाग्रतेने मी पोपटरूपी अभ्यासावर नेम धरायचो. अभ्यास एके अभ्यास. माझ्या त्या एकाग्रतेने आणि निष्ठेने इंद्रालाही आपले स्थान डळमळीत झाल्यासारखे वाटायचे बहुदा. आणि लगेच 'सुट्टी' नामक अप्सरेची माझ्या बालमनाला भुरळ घालण्याच्या कामी नियुक्ती व्हायची. घरात, रस्त्यात, शाळेत, मैदानात कुठेही ही अप्सरा प्रकटायची आणि आईचा राग, रस्त्यातला खड्डा, सरांचा खडू किंवा एखादे जोरदार "आऊट" तिला बाद करेपर्यंत ती पिच्छा पुरवायची.
मनाला भुलवणारे सुट्टी रंग तरी किती वेगवेगळे। कधी आई, बाबा, तहान, भूक इ.इ. सगळे थोपवून अख्खा दिवस खेळायला मोकळा. त्यात पूर्णवेळ माझी बॅटिंग चालू आहे. मी तडातड फटके मारतोय आणि सीमापार गेलेला चेंडू इतर मुले विनातक्रार आणताहेत. इमारतींच्या काचा चेंडूप्रूफ झाल्यात आणि खालच्या मजल्यावरचे वसकणारे पिल्ले अंकल आंटी आमचे जप्त केलेले सगळे चेंडू परत करून कौतुकाने खेळ बघताहेत. वा वा वा! किती मजा. कधी समोरच्याला संधी न देता कॅरमच्या सगळ्या सोंगट्या मी घालवतोय तर कधी पतंगाने वटवाघुळांना पळवतोय. हे जरा विचित्र वाटतेय ना पण लहानपणी माझ्या सुट्टीच्या प्लान मधे ही एक अजब गोष्ट नेहमी असायची. त्याचे असे होते की आमच्या इमारतीवरून रोज मावळतीनंतर संधिप्रकाशात वटवाघुळांचा मोठा थवा (?) पश्चिमेकडून पूर्वेकडे उडत जायचा. पतंगाने वटवाघुळांना भिववायचा मी बराच प्रयत्न करायचो पण हे बेटे कधी घाबरतील तर शप्पथ. दिवस मावळल्यावर वारे पण पडायचे आणि पतंगही त्यामुळेही बेत फसायचा. याशिवाय विज्ञानाचा अभ्यास करताना आमच्या बालवैज्ञानिकामधला बाल झोपायचा आणि वैज्ञानिक एडिसनने लावले नसतील एवढे दिवे लावायचा.
सुट्टीचे प्लानिंग असे झोपेत जागेपणी उठता बसता चालायचे। शहाण्या मुलासारखा रोज लवकर उठून व्यायाम करायचा असे संकल्पही व्हायचे. रात्र थोडी सोंगे फार अशी प्लानिंगची गत होते ना होते तोच परीक्षांचा दिवस उजाडायचा. घोडा मैदान दिसताच सुट्टी आमची रजा घ्यायची. अभ्यासाची अन् परीक्षांची रणधुमाळी चालू झाली की तहान भूक हरपून मी युद्ध करायचो. भरपूर वेळ असला तर खुलेआम मैदानात नाहीतर हा प्रश्न ऑप्शनला टाक, तो धडा गाइड मधून वाच असा गनिमी कावा वापरायचा. भवानीमातेच्या आशीर्वादाने कधी तोंडघशी पडू दिले नाही. पुन्हा एखाद्या आठवड्यात एवढा अभ्यास केल्यावर एकदम ज्ञानी झाल्याचा साक्षात्कार व्हायचा आणि पेपर चांगला गेल्यावर विषय आवडू बिवडू लागायचा. घरी पण जरा जास्तच लाड चालू असायचे परीक्षेच्या काळात. कधी नव्हे ते बाळ अभ्यास करतोय तर जेवण खाण एकदम बसल्या जागी, अभ्यासाच्या खोलीच्या आजूबाजूला खास शांतता. वा वा...! अशा प्रकारे परीक्षा संपत आली की अभ्यासाबद्दलचे प्रेम भलतेच जागृत व्हायचे. आणि एके दिवशी परीक्षा संपायची.
आजवर मला कधीही कळले नाहीये का पण आजवर परीक्षेच्या नादात सुट्टीचे प्लानिंग पार धुऊन निघालेय। हम ये करेंगे वो करेंगे म्हणणारे नेते कसे निवडून आले की सुस्तावतात तसे परीक्षा झाल्यावर व्हायचे. भरपूर झोपण्याचा पहिला प्लान पहिल्याच दिवशी मोडीत निघायचा. गजर वाजण्याआधीच जाग. दर परीक्षेनंतर त्या परीक्षेचे सामान आवरणार्‍या आईने शेवटच्या परीक्षेचा ढीग आमच्यावर सोपवलेला. कालपर्यंत आवडणार्‍या अभ्यासाचे आज दर्शनही नकोसे होत असताना त्या ढिगाकडे ढुंकूनही पाहणे नकोसे झालेले असायचे तेव्हा तो आवरणे हे अगदीच अप्रिय होऊन जायचे. गावी जाणे हा एकमेव प्लान तिकिटे काढून झाल्याने निश्चित असायचा पण त्यालाही पुष्कळ अवकाश असायचा.
एकूण काय तर पहिलाच दिवस अगदी डब्बा व्हायचा आणि सुट्टीपेक्षा प्लानिंगच बरे असे म्हणावे वाटायचे.

Sunday, June 17, 2007

घर...


घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
घराभोवती सुरेख अंगण,
अंगणात त्या वृक्ष मनोहर।
पक्षी कूजने हर्षे परिसर,
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
अंगणात ही तुळस मंजिरी,
पाविझयाचे जणू प्रतीकही।
आशीर्वादे देई अभयकर
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
पारिजात मोगरा अबोली
जास्वंदी ही इथेच फ़ुलली
जाईजुईचा बहर सुखकर।
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
आम्रवृक्ष तो उभा निरंतर,
पक्षी विसावा घेती त्यावर।
कोकिळकूजन चाले सुस्वर,
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर अणि मनोहर।
सखे सोबती साद घालती,
स्नेहाची ही दृढ ती नाती।
कालचक्र परी फ़िरते झरझर,
घर ते होते असेच सुंदर,
अतिव सुंदर आणि मनोहर।
दिवेलागणी होती मग ती,
गोष्टी पाढे पावकी निमकी।
पंचपदी चे सूर शुभंकर,
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर अणि मनोहर।
आजी आजोबा प्रेमळ मूर्ती,
संस्कारे ती आम्हा घडविती।
ममतेची ही त्याला झालर
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
भांडण तंटण रुसवे फ़ुगवे,
एक्य होते त्याही मध्ये
प्रेमाची मग लाभे फ़ुंकर
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
ती वास्तू ती खिडक्या दारे
साद घालती लवकर या रे,
फ़िरुन वाटे जावे सत्त्वर।
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर।
ध्येय मंदिरी मार्ग चालता,
नवी क्षितीजे नवीन वाटा,
सौख्याचा परी इथेच अंकुर।
घर ते होते असेच सुंदर,
अतीव सुंदर आणि मनोहर.

सांगशील का जरा ?

एकदा मी कवितेलाच विचारले...

काय गं काय नातं, आहे तुझं नि माझं

ज्यामुळे मी एकटा असल्यावर

तु आणतेस तुझ्याकडे खेचुन,

आणि मी पण वेडयासारखा धावत येतो

तुझ्याकडे शब्द ओंजळीत घेऊन,

सांगशील का जरा ?

अनुभुतीच्या सुरुवातीपासुन अभिव्यक्तिच्या

सावटापर्यंतका मी हे सगळं

कागदावर उतरवतोय

कोण माझ्या लेखनीची शाई संपवतय?

सांगशील का जरा ?

तु बोलवल्यावरच कसे मनात

ते विचार येतात॥

हळुहळु स्वत:हुनच कसे

ते कागदावर उतरु लागतात

तु काही विचारलस की

मुक्या, अबोल भावना कश्या काय

पटापट बोलु लागतात

सांगशील का जरा ?

का मी एखाद्या चित्रकारासारखे

डोळयातल्या आसवाने

तुझं चित्र रेखाटायला लागलो.....

का गं ईतका मी का

'तिच्याशी' चुकिचा वागलो

सांगशील का जरा ?

तुझ्या प्रत्येक कडव्याच्या

वाटेवर फ़िरताना मी

का तिच्या आठवनीची

एक निशाणी ठेवतोय

का ? आणि कशाला ?

सांगशील का जरा ?

जमत नाही गं आता

हे सारखे सारखे तीची आठवण

काढणंजीला विसरायचा प्रयन्त करतोय

तिलाच परत शब्दांत मांडणं...

तिच्या आठवणीने जीव

माझा जाळतोय पण ॥

तुझ्यामुळे त्या वेदनेचा भाव

सर्वांना कसा कळतोय

सांगशील का जरा ?॥

सांगशील का जरा ?॥

माथेरान...........


Matheran with a population of 5,912 (census held in 2002), is a hill station in Maharashtra, India. It is the tiniest hill station in India. It is located on the Western Ghats range at an elevation of around 800 m (2,625 feet) above sea level. It is located at 18.59° N 73.18° E, around 90 km from Mumbai and about 120 km from Pune. Matheran's proximity to the two cities makes it a popular weekend getaway for urban residents. The name Matheran means either "forest on top" or "mother forest".
Matheran was discovered by Hugh Poyntz Malet, the then district collector of Thane district in May 1850. Lord Elphinstone, the then Governor of Bombay laid the foundations of the development as a future hill station. The British developed Matheran as a popular resort to beat the summer heat in the region.

Matheran is connected to the town of Neral which lies at the base of the hills. A tar road connects Neral to Dasturi Naka which is 11 km (6.8 miles) from Matheran. In order to maintain Matheran's uniqueness, no vehicles are allowed beyond this point. The other mode of transport is a 2 ft (610 mm) gauge narrow gauge railway, which links the town to Neral. Neral also has a broad gauge station which is on the busy Mumbai-Pune route. Neral is well connected by railway line with Karjat being the nearest Junction. The Matheran Hill Railway was built in 1907 by Sir Adamjee Peerbhoy and covers a distance of 20 km (12.4 miles), over large swathes of forest territory.

In the floods of July 2005, around 70% of the railway lines were damaged and did not reopen until April 2007 after repairs at a cost of Rs 2-2.5 crore[1].

Matheran has been declared an ecosensitive region by the Union Environment Ministry and can be called a Health Sanatorium in itself. The main form of transport within Matheran are horses and hand-pulled rickshaws.

Matheran lying in an elevated region, it enjoys a cooler and less humid climate which makes it popular during the summer months. Temperatures range from 32 °C (90 °F) to 16 °C (61 °F). Matheran has a huge number of medicinal plants and herbs. The town also has a large monkey population, of both the red-faced and black-faced breeds. The nearby Lake Charlotte (Matheran)|Lake Charlotte is the main source of Matheran's drinking water.

Languages spoken include Marathi, Hindi, and English. Beautiful old British-style architecture is preserved in Matheran. The roads are not metalled and are made of red laterite earth. There are many "points" (viewpoints) in Matheran which give a panoramic view of the plains below. On clear nights, the lights of Mumbai are claimed to be visible.

Thursday, June 14, 2007

माझे मराठीचे प्रयोग..........

घरात 'मी मराठी ' वाहिनी दिसायला लागल्यापासून आमच्या रक्तात मराठी भाषेचे चैतन्य पुन्हा एकदा सळसळू लागले होते। 'अमृताशी पैजा जिंकणारी' मराठी आज वाघिणीच्या दुधाची मोलकरीण म्हणून धुणीभांडी करत फिरते आहे या जाणिवेने आमच्या रक्तातले सगळे ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत आणि राजेश मुजुमदार अस्वस्थ झाले होते. भरजरी पठणी ल्यालेल्या माझ्या मायबोलीने वर मात्र खणाची चोळी न घालता आंग्लभाषेचे बिनबाह्याचे पोलके घालून फिरावे याचे शल्य आम्हाला डाचू लागले होते. (अशी पश्चातापदग्ध आच रविवारी सकाळी अधिक बोचू लागते असा आमचा आजवरचा अनुभव आहे. आमच्या एका वैद्यकशास्त्रपंडित मित्राच्या मते त्यात रक्तातील मद्यार्कअंशाचा मोठा वाटा असतो, पण आम्ही ते मत फारसे गंभीरपणे घेत नाही) त्यातच बाबासाहेब पुरंदऱ्यांची पुस्तके वाचनात आल्याने आमच्या इतिहासाप्रमाणे आमची मराठीही घराघरांत, खोल्याखोल्यांत, फोडणीच्या - ज्याला विदर्भात मिसळणीच्या म्हणतात - डब्यांडब्यांत, एवढेच काय पण आमच्या ज्या भगिनी गरोदर असतील त्यांच्या गर्भांपर्यंत पोचली पाहिजे या जाणिवेने आम्ही बेचैन झालो होतो. गर्भांपर्यंत मराठी पोचवण्याच्या दृष्टीने प्रथम आमच्या सहनिवासातील कोणकोण महिला गर्भवती आहेत याची एक खानेसुमारी करावी म्हणून आम्ही गच्चीत उभे राहून टेहळणी सुरु केली. गच्चीतूनच चहाच्या तिसऱ्या कपाची मागणी केल्यावर सौभाग्यवतीला संशय आला. 'शोभतं का हे या वयात...' इथपासून सुरु झालेल्या ध्वनिमुद्रिकेचे 'मुलं बरोबरीला आली तरी॥ जनाची नाही तरी मनाची तरी..' हे कडवे सुरु झाल्यावर आम्ही आत आलो.
"अगं, तुझ्या भलत्या शंका! अजून माझ्यावर विश्वास म्हणून नाही॥ मी फक्त गर्भांपर्यंत मराठी पोचावी म्हणून साधारण अंदाज घेत होतो, म्हणजे त्या दृष्टीने..."
"इश्श॥मला हो काय ठाऊक? आणि आता ही कुठली नवीन एजन्सी घेतली?" भार्येचा काहीतरी समजुतीचा घोटाळा झाल्याचे आमच्या ध्यानात आले पण स्त्रीमुखातून वहाणाऱ्या अखंडित वाक्प्रपातात भेद करणे कसे अशक्यप्राय असते हे समदु:खी विवाहीत जाणतातच..
"आणि मला बोलला नाहीत ते! सदा मेलं आपलं आपल्यापाशी। कुण्णाला काही सांगायचं म्हणून नाही, काही नाही. आणि काही विचारलं की डोक्यात राख घालायची! तुमचं हे नेहमीचंच आहे हं! परवा शकूवन्सं आल्या तेंव्हाही अस्संच...""अगं, माझं ऐकून तर घे! शकूचा काय संबंध इथे? आणि ही काय भाषा की काय तुझी? एजन्सी म्हणे! अगं मराठी लोक आपण, मराठी बोलावं. मराठी शब्द वापरावेत...""मग मी काय इंग्रजीत बोलले? मराठीच तर बोलत होते...""एजन्सी हा काय मराठी शब्द आहे? किती बोजड वाटतो बघ ऐकतानाही! गुमास्तेपणा म्हणावं, नाही तर अडत म्हणावं, अगदी गेलाबाजार प्रतिनिधीकार्यालय म्हणावं... "
'शनिवार एक दिवस म्हणून मी काही बोलत नाही, पण हल्ली झेपत नाही हो तुम्हाला' हे एवढं सगळं पत्नी एका कटाक्षात बोलून गेली।
"अंघोळ करुन घ्या।" थंड पाण्याची अंघोळ हे अशा परिस्थितीवरचं उत्तर आहे हा तिचा समज आहे."न्हाणीघर रिक्त आहे का पण?""क्काय? राहुल, बघ रे बाबा असं काय करतात ते..."कुलदीपक चलतहास्यचित्रमालिका बघण्यात मग्न होते. पडद्यावरील नजर न हटवताच ते बोलते झाले. "काय बाबा?""अरे, सकाळीच तू दूरवस्तूदर्शकयंत्र काय सुरु करुन बसलायस?"पण बाबा, मी तर टीव्ही बघतोय...""तेच ते. काय रे भाषा तुमची. अरे, मराठी लोक आपण. मराठी बोलताना परभाषीय शब्द वापरु नयेत आपण. आणि गृहपाठ झाला का तुझा?""म्हणजे?""गृहपाठ म्हणजे काय कळत नाही तुला? अरे शाळेत घरी करण्यासाठी म्हणून दिलेला अभ्यास...""होमवर्क?""हां. तेच""बाबा, पकवू नका ना हो प्लीज. ए आई बघ ना गं॥आई, बाबांनी गोळ्या घेतल्या होत्या का गं काल?""अरे राहुल, मला काही धाड भरलेली नाही. मला काळजी आहे ती तुझ्या भाषेची. गृहपाठ म्हणजे काय कळत नाही तुला. ते जाऊ दे. तुमच्या चमूला त्या ह्याच्यासाठी जो विषय दिला होता त्यावर काही विचार केलास का?""कशाचा विषय, बाबा?"कसा कोण जाणे 'प्रोजेक्ट' ला प्रकल्प हा शब्द काही आम्हाला ऐनवेळी आठवला नाही. डोक्याला ताण दिल्यावर आमच्या मनात हस्तव्यवसाय हा शब्द चमकून गेला. पण घोळात घोळ नको म्हणून आम्ही तो शब्द वापरायचे टाळले.चिरंजीव अद्याप मालिकाग्रस्तच होते. अंघोळ टाळायची असेल तर सत्त्वर काहीतरी कृती करणे आवश्यक होते."अगं ए, ऐकलंस का? मी उष्णोदकयंत्र सुरु करतोय. काही पळे जाऊ देत, मग जाईन अंघोळीला. तोवर जरा संगणक उघडतो.."आतमध्ये फोडणीचा 'चर्र.. ' असा आवाज आला. लसणीचा खमंग वास आला. लबेदे पाकसिद्धीत गुंतले असावे. मी संगणकाची कळ दाबली. माझ्या मराठीची महती आता किमान माहितीजालावर तरी नोंदवावी म्हणून माहितीजालाशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु केले. पण वारंवार यत्न करुनही संपर्क प्रस्थापित होईना. 'दूरचा संगणक प्रतिसाद देत नाही' असा संदेश येऊ लागला. 'पुन्हा तबकडी फिरवा' हे बऱ्याच वेळा करुन झाल्यावर सेवाप्रदात्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे असे लक्षात आले. मी दूरध्वनी उचलला."हालू..""नमस्कार. मी काशीनाथ पटवर्धन बोलतोय. दिगंबर सहनिवास, माहिम पश्चिम येथून. माझी माहितीजाल सेवा विस्कळीत झाली आहे..""सायेब, ह्ये केबलवाल्याचं हापिस हाये..."" अहो तेच पाहिजे आहे मला. तुमच्याकडूनच मी महापट्टी माहितीजालजोड घेतला आहे. पण तो चालत नाही आहे. बहुदा तुमचा संदेशतंतुपुंज सदोष असावा...""सायब, तुम्ही काय म्हनताय कायबी कळना बगा. विंटरनेट म्हनत असाल तर सगलीकडंच डाऊन हाय. केबल फाल्ट हाय. दुरुस्त व्हायला टायम लागन.."
आमचे वैफल्यग्रस्त मन क्लैब्याने दाटून आले। विमनस्क मन:स्थितीत आम्ही गवाक्षातून बाहेर बघत राहिलो. दरम्यान आतली पाकसिद्धी संपन्न झाली असावी. "जळ्ळं मेलं एका रविवारी लवकर आवरुन घ्या म्हटलं तर ते काही ऐकायचं नाही, आता मीच जाते अंघोळीला" हे उद्गार आपल्याला उद्देशून म्हटलेच नाहीत अशी आम्ही स्वतःची समजूत करुन घेतली.
अतिथीआगमनसूचकघंटिकेच्या ध्वनीने आम्ही भानावर आलो। शेजारच्या नेने वहिनी होत्या."जान्हवीताई... अगंबाई, कुठं बाहेर गेल्यात का?" त्यांनी विचारलं.
"आं?"
"अहो, थालिपीठ करत्येय, चार कांदे पाहिजे होते..."सकाळच्या न्हाणीघराच्या उल्लेखाने झालेला घाव अद्याप ताजा होता। आम्ही दुसरा प्रयत्न करावयाचे ठरवले. "मला वाटते, ती शौचकुपात आहे॥" आमच्याकडे 'ते' व 'ते' ठिकाण एकत्र आहे.नेने वहिनी गोऱ्यामोऱ्या झाल्या. "मी... येते.." त्या निघाल्याच.
एकंदरीत आजचा दिवस काही आपला नव्हे हे माझ्या लक्षात आले. माझ्या मराठीप्रेमाला घरातूनच सुरुंग लागत असतील तर बाहेर या प्रयोगांचे काय होणार या चिंतेत आम्ही बुडून गेलो.

आठवतं तुला..?.............


ती म्हणाली,

" आठवतं तुला...त्या अनोळखी

रस्त्यांवरूनतू माझ्याबरोबर यायचास

मदत म्हणून॥

आज सारे रस्ते ओळखीचे झालेत

म्हणून तू अनोळखी व्हावं

असं थोडीच आहे?

मला रस्तेच हवे असते
तर कसेही शोधले असते

त्यासाठी कुणाच्याओळखीची गरज नव्हती

मला तुझी मदत नको,

सोबत हवी होती..."

तो उत्तरला,

"आठवतं तुला .....

तू दबकत चालत जायचीस

त्या रस्त्यावरच्या फुलांना

दुखवू नये म्हणून॥

तुझा क्षणिक स्पर्शही

त्यांना पुरेसा झाला असता...

माझ्या प्रेमाचं सार्थक करण्यासाठी।

तुला कधी समजलंच नाही

ती मीच अंथरली होती...तुझ्यासाठी।

ज्या स्वप्नांना तू अस्पर्श सोडून गेलीस

आपली नाहीत समजून

तुला कधी उमजलंच नाही

ती फक्त तुझीच होती म्हणून...."

खास तुझ्यासाठी.......................

घे भरारी

माऊऊऊऊऊऊ मनी

Saturday, June 9, 2007

पैशाचे सोंग............................

........पैशाचे सोंग आणता येत नाही असे आपण म्हणतो। म्हणजे काय? तर जेंव्हा पैश्यांची गरज पडेल तेंव्हा अचानक पैसे उभे करता येणार नाही. असे फक्त आपणच म्हणतो, की महाराष्ट्राबाहेरही हा समज आहे? पैश्याकडे पैसा जातो म्हणतात. किंवा बँकाही मुळात पैसे असलेल्यालाच आणखे पैसे उसने देतात. असे का होते? मराठी माणूस पैश्याच्या बाबतीत इतका मागे का? असा विचार मनात आला असताना, हा म टा मधला लेख वाचला.
त्यात डॉ नीतू मांडक्यांना हॉस्पिटल उभारणे शक्य झाले नाही, ह्या घटनेचा धागा पकडून लेखक सुहास फडके ह्यांनी हा प्रश्न चर्चेला म्हणून आणला आहे। ते म्हणतात:
"...मांडके यांच्या मागे आर्थिक शक्ती उभी करण्याइतकी ताकदच या समाजात नाही, हे सत्य लक्षात घ्यायला हवे। ...
मराठी माणसाने, 'ठेविले अनंते तैसेची रहावे' हा तुकाराम महाराजांचा उपदेश फारच मनावर घेतल्याचे दिसते...."
तुलनेने महाराष्ट्रात शांतता असल्यामुळे येथे देशोधडीला लागण्यांची आपत्ती फार जणांवर आली नाही। मराठी माणसेही बाहेर पडली, पण दुसरीकडे जाऊनही त्यांनी चाकरी करण्यात धन्यता मानली. ...फाळणीनंतर मोठ्या संख्येने पंजाबी देशोधडीला लागले. ॥सिंधी समाजही याच परिस्थितीत भरडला गेला. तशी पाळी मराठी माणसावर कधी आली नाही.
मराठी माणसाने लक्ष्मीची आराधना न केल्याचा परिणाम येथील साहित्य, संस्कृतीवर झाला आहे। मराठी मालिका, चित्रपट, नाटक कमी खर्चात काढावे लागतात. त्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागतात. मग आपण त्या कथेत सशक्त असतात असे सांगत फिरतो. त्यात काम करणार्‍यांना कमी पैशात काम करावे लागते.
कलेच्या सर्वच क्षेत्रात ... कर्तृत्वाला दाद देण्याइतके मराठी धनिक नाहीत। ... महिला विद्यापीठ ... ओळखले जाते श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या नावाने. ...सावित्रीबाई फुले यांचे नाव एखाद्या प्रकल्पाला देऊन त्यांना अमर करण्याइतकी आथिर्क ताकद आपल्यात नाही. मुंबईत साधे रस्ते आणि गल्ल्या यांनादेखील आपण त्या त्या भागातील आपल्या कर्तृत्ववान व्यक्तींची नावे देऊ शकत नाही ...
... मराठी शास्त्रज्ञ, कीडापटू आणि इतर क्षेत्रे गाजवणारे यांचा सन्मानही आपण त्या थाटात करू शकत नाही। एखाद्या गटाने अथवा व्यक्तीने काही वेगळे कार्य करण्याचा संकल्प सोडला तर त्याच्या मागे उभे करण्याइतके आथिर्क बळ आपल्याकडे नाही.
... मुळात लक्ष्मीची उपासना करायची ती फक्त आपल्यासाठी आणि आपल्या कुटंउबियांसाठी हा विचार छोटा आहे। व्यवसाय वाढवणे, नवीन संधी शोधणे यामध्ये सामाजिक उन्नती दडलेली असते. व्यक्तींकडे, समाजाकडे समृद्धी असेल तर निधीअभावी अडणार्‍या अनेक चांगल्या उपकमांना गती देता येते. अनेक संस्थांमध्ये, सरकारात प्राप्त होणार्‍या वजनामुळे निर्णयप्रकियेत सहभागी होता येते. ... पैसे नसले की काय अवस्था ओढवते याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईत मराठी विद्यार्थ्यांची होणारी कुतरओढ. ... मराठी मुले आपल्याच राज्यात प्रवेशासाठी वणवण फिरत असतात. मंत्रालयात पैशाच्या जोरावर अनेक कामे करुन घेतली जातात असे आपण म्हणतो, अनुभवतो. मग पैसे मिळवायला कोणी मराठी माणसाला नको सांगितले आहे का?
लक्ष्मीमुळे किती कामे होतात, समाजाची प्रगती कशी होऊ शकते याची अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर असतानाही आपण लक्ष्मीकडे का पाठ फिरवतो हे एक कोडे आहे।
हे सगळे ठीक आहे। वर्णन परिणामकारक आहे आणि कारणमीमांसाही चांगली आहे, पण पुढे काय? हे सगळे एक कोडे आहे म्हणून का थांबायचे? अनेक सामाजिक सुधारणा महाराष्ट्रातल्या विचारवंतांच्या बुद्धीतून झाल्या आहेत, हे लक्षात घेतले, तर उपाय सापडतो. 'लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यात मराठी समाज मागे आहे' हा जर काही कमीपणा किंवा मागासलेपणा म्हणून जर मराठी माणसांनी गृहित धरला तर त्यातून नवे नवे विचार नक्की सुचतील आणि एक सामाजिक सुधारणा ह्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर पैश्याचे सोंग आणण्याबाबतीतही मराठी माणूस क्रांतिकारक ठरेल असा माझा विश्वास आहे.