Thursday, June 7, 2007

चाकरी आणि चाकोरी...............


आज पुन्हा वेळेवर उठलो (बहुधा माझा अलार्म झाला आहे।)दाढी करता-करता आरसा म्हणाला, "सारे काही स्मूथ चालले आहे ना रे?"मीही आणिक कलोन हसलो....................

आज पुन्हा नेहमीप्रमाणेसिग्नलवरच्या मध्ययुगातिल म्हातारीलाइग्नोअर केले(हळवे होणे कमजोरीचे लक्षण असते।)धूळ झटकली सभ्यपणे ऍलन सोलीची निर्मनुष्य झालो, पुढे निघालो......................

ऑफ़िसमध्ये आल्याआल्यामाझ्या सहकारी इग़्जेक्युटिव भिकारड्यांना पाहुन स्मितलोहायहलोने चेहेरे पुसले............

मग याद्या केल्या "कुणाकुणाला भेटायाचे"(ज्यांना भेटावे वाटत नाही असेच सारे) "कुणाकुणाशी बोलायाचे"(उत्तर देणाऱ्या यंत्राचे बरेच असते)"टकाकटकटक" टकटकणारी बोटे धावत सुटली (अम्हा फिरविसी जगदीशा).................

आज पुन्हा या तिन्हिसांजेच्या उदास छायाखुणावल्या नाहीत मलाही(पण उदास होण्यापरी काहीही नव्हते,ऐसेही नाही)..................

आज पुन्हा मगमी माझ्या केबिनच्या त्या प्रशस्तश्या आकाशामधुनी झेप घेतली रस्त्यावरतीअंगावरती येणाऱ्या वारुळातली मी मुंगी झालो(मावळलेल्या सूर्याला तेव्हा आम्ही मुंग्यांनी गिळले होते)...................

आज पुन्हा मी निजण्याआधी हिशेब केलाकामे कुठली झाली, राहिली कोणती...............

केबलटीवीवाल्याचेही पैसे चुकते झाले लॉंड्रीमधले कपडे आले इत्यादी, इत्यादी इत्यादी, इत्यादी पण,राहुन गेले एक काम नेहमीप्रमाणे................

जगता आले नाही कारण,तेच पुराणेवेळ मिळाला नाही..............

No comments: